Current Affairs of 27 December 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (27 डिसेंबर 2016)
मराठी रंगभूमी जागतिक पातळीवर अग्रेसर :
- काही दिवसांपूर्वीच आनंद म्हसवेकर दिग्दर्शित ‘यू टर्न’ या नाटकाने सहाशे प्रयोग पूर्ण केले आहेत.
- विशेष म्हणजे, या नाटकात अभिनेता गिरीश ओक आणि इला भाटे दोनच कलाकार असले तरी या नाटकाने प्रचंड यश मिळविले आहे.
- तसेच नाटकाला महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला आहे. मागील आठ वर्षात या नाटकाने 27 पुरस्कार प्राप्त केले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
जिल्हा परिषदेसाठी जानेवारीपासून लागू होणार आचारसंहिता :
- राज्यातील 26 जिल्हा परिषदा व 10 महानगरपालिकांसाठी सात जानेवारीपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता असून 15 ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान चार टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
- खुद्द महसूलमंत्र्यांनी ही शक्यता व्यक्त केल्याने जानेवारीच्या पहिल्या किंवा अगदीच दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार हे निश्चित मानले जात आहे.
- जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली. पाटील म्हणाले, या तारखा जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम ते घोषित करतील.
- राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने जिल्हा परिषदांचे आणि महानगरपालिकांचे मतदान चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन आहे.
- तसेच ज्या जिल्ह्यात महानगरपालिकेची निवडणूक आहे तेथे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांचे मतदान एकाच दिवशी घेण्यात येईल.
- बहुतांशी सभागृहांच्या मुदती या मार्चमध्ये संपत असल्याने त्याआधी निवडणुका होऊन नवे सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
पॉपस्टार जॉर्ज मायकेल कालवश :
- अत्यंत लोकप्रिय ब्रिटिश पॉपस्टार व गायक जॉर्ज मायकेल (वय 53 वर्ष) यांचे 25 डिसेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले.
- ‘इफ यु वेअर देअर’, ‘आय एम युवर मॅन’ आणि ‘एव्हरीथिंग शी वाँट्स’ या अत्यंत लोकप्रिय गीतांनी मायकेलनी 1980 मध्ये चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले होते.
- मायकेल यांचे हृदय निकामी ठरल्यामुळे अंथरुणात निधन झाले अशी माहिती त्यांचे व्यवस्थापक मायकेल लिप्पमन यांनी दिली.
- जॉर्ज मायकेल यांनी स्वत: काही गाण्यांचीही रचना केली होती आणि त्या लोकप्रिय ठरल्या होत्या.
- जॉर्ज मायकेलची लोकप्रियता ‘व्हॅम’ या गटाने झाली. हा गट ‘क्लब ट्रोपिकाना’ व ‘लास्ट ख्रिसमस’साठी प्रसिद्ध होता. त्याने त्याच्या सहकाऱ्यासह जशी लोकप्रियता मिळवली तशीच ती ‘करिअर व्हिस्पर’, ‘फेथ’, ‘आऊटसाईड’ आणि ‘फ्रीडम 90’ या एकट्याने गायलेल्या गीतांनीही तो लोकप्रिय झाला.
शाहरुख खानला ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान :
- मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले आहे.
- विशेष म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शाहरुखला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
- हैदराबादेतील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच शाहरुखला डॉक्टरेट जाहीर केली.
- हैदराबादच्या गाचीबोवली परिसरातील कॅम्पसमध्ये मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचा 6वा दीक्षान्त समारंभ झाला. त्यादरम्यान शाहरुखला डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वांत लांब पल्ल्याचा अग्नी-5 क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण :
- भारताचे सर्वांत लांब पल्ल्याचे आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीने विकसित केलेले आणि आण्विक क्षमता असणारे अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे 26 डिसेंबर रोजी प्रक्षेपण करण्यात आले.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-5 या स्वानातीत क्षेपणास्त्राचा पल्ला 5000 किलोमीटर एवढा असून, आशियातील बहुतांश प्रदेश आणि युरोपातील लक्ष्य भेदण्याची क्षमता त्यामध्ये आहे.
- ओडिशा किनाऱ्यालगत व्हीलर बेटावरून इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या प्रक्षेपण इमारत क्रमांक चारमधील एका मोबाईल लाँचरवरून सोमवारी सकाळी या तीनस्तरीय भरीव प्रॉपेलंट क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.
- अग्नी-5 चे प्रक्षेपण ही लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ही चौथी विकासात्मक चाचणी, तर दारुगोळ्यातील धातूचे सिलिंडर वापरून घेतलेली ही दुसरी चाचणी आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा