Current Affairs of 23 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2016)

विराट कोहली आयसीसी वनडे क्रिकेटचा कर्णधार :

 • धडाकेबाज फलंदाजीने आणि कुशल कप्तानीने यंदाचे वर्ष गाजवणारा भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची आयसीसीच्या एकदिवसीय कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
 • तसेच या संघात विराटसोबतच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोन भारतीय क्रिकेटपटूंनाही स्थान मिळाले आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये या वर्षभरात एक हजारहून अधिक धावा आणि तीन व्दिशतके फटकावणाऱ्या विराटला आयसीसीच्या कसोटी संघात स्थान मिळाले नाही.
 • भारताच्या केवळ रविचंद्रन अश्विनलाच कसोची संघात स्थान मिळाले आहे.

भारतीय महिला संघाने जिंकले कांस्यपदक :

 • संगीता कुमारीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले आहे.  
 • तसेच या निर्णायक सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला.
 • कांस्यपदकासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात संगीताने 55व्या आणि 58व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले, तर याआधी अनुभवी रितूने 45व्या मिनिटाला पहिला गोल करून भारताचे खाते उघडले होते.
 • दोन्ही संघांनी बचावात्मक सुरुवात करताना पहिल्या सत्रात आपल्या आक्रमणाला मुरड घातली. यामुळे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर भारतीय महिलांनी दुसऱ्या सत्रात वेगवान खेळ करत वर्चस्व राखले.

आर. आश्विन ठरला क्रिकेट ऑफ द ईयर :

 • भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन याची 22 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड केली.
 • तसेच याशिवाय कसोटीमधील सर्वोत्कृट क्रिकेटपटू म्हणूनही त्याची निवड करण्यात आली.
 • दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक वन-डे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
 • आश्विनला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरविण्यात येईल. ही ट्रॉफी जिंकणारा आश्विन भारतात तिसरा तसेच जगात 12 वा खेळाडू ठरला.
 • याआधी 2004 मध्ये राहुल द्रविड आणि 2010 मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा सन्मान मिळाला होता.

माशाची नव्या प्रजातीला बराक ओबामा यांचे नाव :

 • अमेरिकेतल्या संशोधकांना पिवळ्या, सोनेरी रंगाच्या माशाची एक प्रजाती सापडली असून, या नव्या प्रजातीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव देण्यात आले.
 • माशांची ही प्रजाती प्रशांत महासागरात हवाई बेटांच्या संरक्षित भागात 300 फूट खोल असणाऱ्या कुरे या प्रवाळ बेटांवर आढळली आहे.
 • हे मासे यापूर्वी कधीही दिसले नव्हेत. त्यामुळे यातले काही मासे चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
 • संशोधकांना चाचणीनंतर ही नवी प्रजाती असल्याचे लक्षात आले आहे. जपानमध्ये आढळणा-या माशांच्या प्रजातीशी या माशांचे साधर्म्य आहे.
 • पापाहनॉमोक्वाकी या सागरी पट्ट्याचे संवर्धन करण्यात ओबामा यांचा सक्रिय सहभाग होता.

दिनविशेष :

 • 23 डिसेंबर 1940 रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालिन म्हैसूर राज्यात बँगलोर येथे प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी सुरू केला.
  तसेच पुढे ‘हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड’ कंपनीचे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये नामांतर झाले.
 • 23 डिसेंबर 2004 हा भारतीय माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.