Current Affairs of 22 December 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (22 डिसेंबर 2016)
पोलिस उपनिरीक्षक परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ :
- पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढविण्यात आली असून, त्यासंबंधीची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
- आता पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीकरीता कमाल वयोमर्यादा खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 31 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 34 वर्षे करण्यात आली आहे.
- राज्याच्या गृह खात्याने 19 डिसेंबर रोजी यासंबंधीचा निर्णय घेतला.
- तत्पूर्वी 7 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये 1 एप्रिल 2016 रोजी खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वरून 31 वर्षे एवढी करण्यात आली आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 31 वरून 34 वर्षे करून दोन्ही वर्गांची वयाची अट 3 वर्षांनी वाढवली आहे.
Must Read (नक्की वाचा):
समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार :
- साधना ट्रस्ट व महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये अतुल पेठे, अरुण साधू, हमीद दलवाई यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- नाट्यकर्मी अतुल पेठे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, साहित्यिक अरुण साधू यांना साहित्य जीवन गौरव, हमीद दलवाई यांना समाजकार्य जीवन गौरव (मरणोत्तर) पुरस्कार देण्यात येणार आहेत.
- इतिहास अभ्यासक रामचंद्र गुप्ता यांच्या हस्ते 7 जानेवारी रोजी बालगंधर्व रंग मंदिरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती साधना ट्रस्टचे विश्वस्त डॉ. हमीद दाभोलकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार :
- केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) 2018 पासून पुन्हा दहावीची बोर्ड परीक्षा सुरू करण्यात येणार आहे.
- ‘सीबीएसई’च्या सर्वोच्च निर्णय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या निर्णयाला केवळ केंद्रीय मनुष्यबळ खात्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे.
- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यासंदर्भात लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. मनुष्यबळ खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर जावडेकरांचा हा पहिलाच मोठा निर्णय असेल.
- सध्या सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची किंवा शालातंर्गत अशा दोन पर्यायांपैकी एक ऐच्छिक पर्याय निवडण्याची मुभा आहे.
- काँग्रेस सरकारच्या काळात विद्यार्थ्यांवरी वाढत्या तणावामुळे तत्कालीन शिक्षणमंत्री कपिल सिब्बल यांनी सीबीएसईची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार :
- ‘आलोक’ या कथासंग्रहातून खेड्यातील वास्तवाचे भेदक चित्रण करणारे आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
- 22 फेब्रुवारीरोजी आसाराम लोमटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून आलोक या कथासंग्रहासाठी त्यांना मराठी भाषेसाठीचा पुरस्कार मिळाला आहे.
- ‘आलोक’ या कादंबरीत सहा कथांचा समावेश असून कथासंग्रहातून लोमटे यांनी ग्रामीण भागातील वास्तव मांडले होते. या कथासंग्रहाला वाचकांनीही दाद दिली होती.
- साहित्य अकादमीच्या तीन सदस्यीय समितीने ‘आलोक’ या कथासंग्रहाची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड केली. 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते.
- तसेच कोंकणी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी अॅडविन जे एफ डिसूझा यांची निवड झाली. काले बांगर या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला.
चिक्की गैरव्यवहारप्रकरणी पंकजा मुंडेना ‘क्लीन चिट’ :
- राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारासंदर्भातील झालेल्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नसल्याचे सांगत क्लीन चिट दिली आहे.
- अपर पोलिस आयुक्त केशव पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ता सचिन सावंत यांना लिहिलेल्या पत्रात याबाबत खुलासा केला आहे.
- “महिला व बालकल्याण विभागाने केलेली नियमबाह्य खरेदी आणि त्यासंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आपण केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती आपण केलेल्या तक्रार अर्जावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही”, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
- सावंत यांनी वर्षभरापूर्वी मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारप्रकरणी आरोप केले करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
- सावंत यांनी मुंडे यांच्यावर चिक्कीसह अन्य काही शालोपयोगी वस्तूंचे कंत्राट देताना गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. हा गैरव्यवहार तब्बल 206 कोटी रुपयांचा असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
- मात्र, लाचलुचपत विभागाने केलेल्या चौकशीअंती या आरोपांमध्ये तथ्य नसल्याने मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा