Current Affairs of 26 August 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2015)
2011च्या जनगणनेमधील जातींच्या संख्येचा तपशील जाहीर
- 2011च्या जनगणनेमधील जातींच्या संख्येचा तपशील जाहीर करण्याचे टाळणाऱ्या सरकारने मात्र धार्मिक लोकसंख्येची आकडेवारी आज तडकाफडकी जाहीर केली.
- यानुसार 2001 ते 2011 या कालावधीत हिंदूंची लोकसंख्या 16.8 टक्क्यांनी, तर मुस्लिमांची लोकसंख्या 24.6 टक्क्यांनी वाढली.
- हिंदूंच्या लोकसंख्यावाढीचा वेग 0.7 टक्क्यांनी घटला आहे, तर तुलनेत मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीचा वेग 0.8 टक्क्यांनी वाढला आहे, असे गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
- तसेच यात ख्रिस्ती धर्मियांच्या लोकसंख्येमध्ये फारसा फरक पडला नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
- काही आठवड्यांपूर्वी सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील लोकसंख्येची आर्थिक व सामाजिक स्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला होता.
- अर्थमंत्री अरुण जेटली आणि ग्रामविकास मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह यांनी ही आकडेवारी जाहीर केली होती.
- हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध आणि जैन या प्रमुख धर्मांच्या अनुयायांची लोकसंख्या आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आली आहे.
- या आकडेवारीनुसार 2001-2011 या दशकामध्ये लोकसंख्यावाढीचा वेग 17.7 टक्के होता.
- यात हिंदूंची लोकसंख्या 96.63 कोटी म्हणजे (79.8) टक्के आहे. मुस्लिमांची लोकसंख्या 17.22 कोटी (14.2 टक्के) आहे. ख्रिश्चनांची लोकसंख्या 2.78 कोटी (2.3 टक्के) आहे.
- हिंदू लोकसंख्यावाढीचा वेग 16.8 टक्के आहे, तर मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वेग 24.6 टक्के आहे. ख्रिश्चनांच्या लोकसंख्यावाढीचा वेग जवळपास हिंदूंइतका म्हणजेच 15.5 टक्के आहे.
Must Read (नक्की वाचा):
रक्षाबंधनाच्या निमित्ताने महत्त्वाकांक्षी विमा योजनांचा लाभ :
- यंदाच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजपने देशभरातील तब्बल 45 कोटींहून जास्त माताभगिनींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी विमा योजनांचा लाभ मिळवून देण्याचे भाजपने ठरविले आहे.
- देशाच्या प्रत्येक मतदारसंघातील किमान 11 हजार महिलांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना यांची खाती उघडून देण्याबाबतचे “टार्गेट” देण्यात आले आहे.
- या रक्षाबंधन विमा योजनेचा सारा जोर बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालवर द्या, असेही अव्यक्त आदेश पक्षाने कार्यकर्त्यांना व नेत्यांना दिले आहेत.
- तसेच संबंधित विभागातील कार्यकर्त्यांना त्या-त्या भागातील बॅंकांचे व संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही पुरविण्यात आले आहेत.
पाच प्रशिक्षकांना यंदा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार :
- ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल सुशील कुमार व योगेश्वर दत्त यांना घडविणारे प्रशिक्षक अनूपसिंग यांच्यासह पाच प्रशिक्षकांना यंदा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
- कुस्ती प्रशिक्षक अनूपसिंग यांच्या व्यतिरिक्त पॅरालिम्पिक प्रशिक्षक नवलसिंग, हरबन्ससिंग (अॅथलेटिक्स), स्वतंत्र राजसिंग (बॉक्सिंग) आणि निहार अमीन(जलतरण) यांची आपापल्या खेळामध्ये खेळाडू तयार करण्यासाठी आणि उल्लेखनीय योगदान देण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्करासाठी निवड करण्यात आली.
- 1985 पासून प्रशिक्षकांना (कोच) द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येते.
- त्यासाठी प्रशिक्षकांनी तयार केलेले खेळाडू आणि संघाची कामगिरी विचारात घेण्यात येते.
- 2002 मध्ये प्रारंभ झालेला ध्यानचंद पुरस्कार क्रीडा क्षेत्रात लाईफ टाईम अॅचिव्हमेंटसाठी दिला जातो.
- खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी करणारे आणि निवृत्तीनंतरही क्रीडा विकासासाठी सक्रिय भूमिका बजाविणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.
- तसेच याव्यतिरिक्त वर्ष 2009 पासून राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रारंभ करण्यात आला.
- त्यात क्रीडा विकासासाठी सरकारी व खासगी क्षेत्रातील संस्था, तसेच बिगर सरकारी संघटनांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
- राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार चार विभागांत देण्यात येतो.
- त्यात यंदाच्या मोसमात नव्या व युवा प्रतिभेचा शोध घेत त्यांना विकासासाठी कार्य करण्यासाठी पहिल्या गटातील पुरस्कार, सैन्य प्रशिक्षण महासंचालनालय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
- कॉर्पोरेट विभागात सामाजिक जबाबदारी ओळखून खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना कोल इंडिया लिमिटेड पुरस्कार, खेळाडूंना रोजगार आणि क्रीडा कल्याण उपाययोजनेसाठी हरियाणा पोलीस पुरस्कार आणि विकासासाठी क्रीडा गटातील स्पोर्ट्स कोचिंग फाउंडेशन, हैदराबाद हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार प्रदान करणार आहेत.
- द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांना पुरस्कारादाखल छोटी प्रतिमा, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी पाच लाख रुपये रोख प्रदान करण्यात येतात.
- राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
जयललिता यांनी विधानसभेत दोन मोठ्या आरोग्य योजनांची घोषणा :
- तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी विधानसभेत दोन मोठ्या आरोग्य योजनांची घोषणा केली.
- “अम्मा मास्टर हेल्थ चेक-अप प्लॅन” आणि महिलांसाठी “अम्मा विशेष मास्टर हेल्थ चेक-अप प्लॅन” या दोन मोठ्या महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा जयललिता यांनी केली. या दोन्ही योजनांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
- त्याचबरोबर अड्यार येथील कर्करोग संस्थेला विशेष संस्थेचा दर्जा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून त्यासाठी सुमारे 120 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जयललिता यांनी सांगितले.
- चालू वर्षी दहा नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर मध्ये तंबाखू सेवनाच्या जाहिरातीवर निर्बंध :
- राज्यात तंबाखू सेवनाच्या जाहिरातीवर निर्बंध घालण्याचे आदेश मंगळवारी जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक के. राजेंद्रकुमार यांनी सर्व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले.
- सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थाची करण्यात येणारी जाहिरात बोर्डाचा आकार 60 सेंमी बाय 45 सेंमीपेक्षा जास्त नसावा, असे सांगण्यात आले आहे.
विराट कोहली हा कसोटीतील फलंदाजांच्या ‘टॉप टेन’ क्रमवारीतून खाली :
- भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा कसोटीतील फलंदाजांच्या ‘टॉप टेन’ क्रमवारीतून खाली घसरला आहे.
- दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट पाचव्या, तर टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.
- श्रीलंका दौऱ्यात आर. अश्विनच्या उल्लेखनीय कामिगिरीमुळे गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याने आठवे, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसरे स्थान मिळविले आहे.
- कोसटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारतानाही श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा हा सातव्या स्थानावर राहिला.
- अलीकडेच 115 वी कसोटी खेळून निवृत्त झालेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कचे स्थान 25 वे आहे.
- रहाणे विसाव्या स्थानावर आला आहे, तर लोकेश राहुलने 30 क्रमांकांनी उडी घेत 87 वे स्थान मिळविले, तर यष्टिरक्षक वृद्धिमान साहा हा 15 क्रमांकांनी वर येत शंभरावा आहे.
- फलंदाजीमध्ये स्टीवन स्मित याने पुन्हा एबी डिविलियर्स आणि जो रूट यांना मागे टाककत पहिले स्थान पटकावले आहे.
- तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करून कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली तर क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकून भारतीय संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर सरकेल.
- मात्र, श्रीलंकेचा विजय झाल्यास भारत सातव्या क्रमांकावर जाईल आणि श्रीलंका सहावे स्थानावर मिळवेल.
दिनविशेष :
- 1920 : अमेरिकेच्या संविधानातील 19वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
- 2008 : रशियाने जॉर्जियाचे अबखाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले.
- 1910 : मदर तेरेसा, समाजसेविका; ‘नोबेल पारितोषिक’ आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित यांचा जन्मदिन