Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 25 August 2015 For MPSC Exams

Current Affairs 25 August 2015

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2015)

संगणकाच्या साह्याने यांत्रिक आवाजाद्वारे संवाद :

 • जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे गेली अनेक वर्षे संगणकाच्या साह्याने यांत्रिक आवाजाद्वारे संवाद साधत आहेत.Computer
 • यासाठी ते इंटेल कंपनीने तयार केलेले सॉफ्टवेअर वापरतात.
 • हे सॉफ्टवेअर या कंपनीने आता ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे.
 • संशोधक या सॉफ्टवेअरचा गरज असलेल्या रुग्णांसाठी वापर करतील आणि त्यात सुधारणाही करतील, अशी आशा ठेवून कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
 • हे सॉफ्टवेअर दृश्‍य संकेतांच्या शब्दांत रूपांतर करून त्याचे यंत्राद्वारे उच्चारण होते.
 • हॉकिंग यांना मोटार न्यूरॉन हा दुर्मिळ रोग असल्याने त्यांच्या शरीरावर त्यांचा ताबा नाही.
 • त्यामुळे केवळ त्यांच्यासाठी म्हणून इंटेलने तयार केलेल्या या सॉफ्टवेअरचा वापर असा आजार झालेल्या अनेकांनी केला आहे.
 • द असिस्टिव्ह कॉंटेक्‍स्ट अवेअर टूलकिट (एसीएटी) असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे.
 • हॉकिंग यांच्या गालामधील स्नायूंच्या हालचाली ओळखून त्याचे शब्दांमध्ये रूपांतर करण्याचे काम हे सॉफ्टवेअर करते.
 • तसेच हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 अथवा त्यापुढील व्हर्जनवर चालते.
 • याबाबतची सर्व माहिती GitHub या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2015)

हर की पौडी येथे भाविकांना मोफत वाय-फाय सुविधा :

 • देहरादून येथील हर की पौडी येथे भाविकांना मोफत वाय-फाय सुविधा मिळणार आहे.
 • भाविकांची संख्या आणि गरज लक्षात घेता मोफत वाय-फाय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तरुण विजय यांनी सांगितले.

श्री रामचरितमानसची 105 वर्षांची जुनी उर्दू प्रत आढळून आली :

 • श्री रामचरितमानसची 105 वर्षांची जुनी उर्दू प्रत रद्दीमध्ये आढळून आली आहे. Ramacharitra manas
 • नवी दिल्ली येथील एका रद्दी डेपोमध्ये ही प्रत आढळली.
 • ही उर्दू प्रत सन 1910 मध्ये लाहोरमध्ये छापण्यात आली होती.
 • रद्दी डेपोमधून सहाशे रुपयांना ती विकत घेण्यात आली.
 • पाकिस्तानमधील भादोई जिल्ह्यातील लेखक गोस्वामी तुलसीदास, शिव भरत लाल यांनी उर्दू भाषेत सन 1904 मध्ये लिखाण केले होते.
 • यानंतर सन 1910 मध्ये लाहोरमधील हाल्फ-टन या प्रेसमध्ये छपाई करण्यात आली होती.
 • यामध्ये 20 पाने असून राम, सीता, हनुमान, ब्रह्म, विष्णू व महेश यांची चित्रे आहेत.

‘मॅगी नूडल्स’ची बाजारात विक्री करण्याचा निर्णय :

 • मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर नेस्ले इंडियाने पुन्हा एकदा ‘मॅगी नूडल्स’ची बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. Maggi
 • लवकरच सर्व नियामक परवानग्या मिळाल्यानंतर वर्षअखेरपर्यंत नवे मॅगी नूडल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती नेस्ले इंडियाकडून देण्यात आली आहे.
 • मॅगीमध्ये आरोग्यास हानिकारक द्रव्याचे मर्यादेपेक्षा अधिक प्रमाण असल्याने आढळून आल्याने ‘नेस्ले इंडिया’च्या मॅगी नूडल्सच्या उत्पादनावर सरकारने 5 जून रोजी देशभर बंदी घातली होती.
 • त्यानंतर नेस्लेला मॅगी नूडल्सची पाकीटे नष्ट करावी लागली होती.
 • परंतु आता नव्याने उत्पादन करताना मॅगी नूडल्समधील घटक पदार्थ कायम राहणार असून त्याच्या उत्पादन कृतीत बदल करण्यात येणार नाही, असेही कंपनीने सांगितले आहे.
 • याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंजाब, हैदराबाद व जयपूरमधील राष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
 • सहा आठवड्यात मॅगीची चाचणी प्रक्रिया पुर्ण होईल त्यानंतर नवी उत्पादने करून पुन्हा एकदा चाचणी करण्यात येणार आहे.  

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराचा निरोप :

 • 15 वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा निरोप समारंभात भावुक झाला.
 • सामन्यानंतर झालेल्या निरोप समारंभात दिग्गजांनी संगकाराला एकापाठोपाठ एक स्मृतिचिन्ह प्रदान केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सातव्यांदा सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद :

 • स्वीसचा दिग्गज रॉजर फेडरर याने जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याचा 7-6, 6-3 असा पराभव करून सातव्यांदा सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 • फेडररने उपांत्य फेरीत अँडी मरेला पराभूत केल्यानंतर जोकोविचला विजेतेपदाच्या लढतीत धूळ चारली.
 • विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचकडून पराभूत झाल्यानंतर रॉजर फेडरर पहिलीच स्पर्धा खेळत होता.
 • या विजयामुळे मरेला पिछाडीवर टाकून फेडरर दुसऱ्या स्थानावर कब्जा करणार आहे.
 • फेडररचे हे 87 वे एटीपी विजेतेपद आणि 24 वे मास्टर्स ट्रॉफीचे अजिंक्यपद आहे.

स्टेट बँकेचे अ‍ॅप ‘बडी’ या नावाने प्रस्तूत :

 • देशातील सर्वात मोठय़ा भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाइलद्वारे कैक प्रकारचे बँकिंग व्यवहार शक्य करणारे अ‍ॅप ‘बडी’ या नावाने प्रस्तूत केले.SBI App
 • अनेक प्रकारच्या देयकांचा भरणा, सिनेमा, विमान प्रवास तिकिटांचे आरक्षण, हॉटेल बुकिंग यासाठी केवळ मोबाइल फोनचा वापर या अ‍ॅपद्वारे शक्य होईल.
 • अ‍ॅक्सेन्च्युअर आणि मास्टरकार्ड यांच्या सहयोगाने बनविलेले हे अ‍ॅपद्वारे व्यवहार सुरक्षित व विनासायास असण्याबरोबरच, त्यात देयकांचा भरणा करण्याच्या तारखांचे स्मरण करून देणारे गजर हे अतिरिक्त वैशिष्टय़ आहे.

आयसीआयसीआय बँकेची ‘स्मार्ट व्हॉल्ट’ सुविधा :

 • खासगी क्षेत्रातील अग्रेसर आयसीआयसीआय बँकेनेही तिच्या सेवेतील डिजिटल संक्रमणाची चुणूक दाखविताना, 18 ऑगस्ट रोजी ‘स्मार्ट व्हॉल्ट’ नावाची नवीन सुविधा प्रस्तुत केली.
 • या सुविधेचा विकास बँकेने भारतीय कंपन्यांच्या भागीदारीतूनच केला असल्याने, देशाने अवलंबिलेल्या  मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या फलश्रुतीचेही उदाहरण प्रस्तुत करण्यात आले आहे.
 • स्मार्ट व्हॉल्ट सुविधा म्हणजे व्यक्तिगत खातेदारांना महत्त्वाचे दस्तऐवज जतन करण्याचा व केव्हा-कधीही विनासायास उपलब्ध होणारा डिजिटल कुलूपबंद खण असून, बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली आणि बायोमेट्रिक व पिनद्वारे शहानिशा करूनही ते उघडता येणार आहे.
 • हे डिजिटल खण वेगवेगळ्या दोन-तीन आकारांत उपलब्ध करण्यात येणार असून, आकारमानानुसार या सुविधेसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

दिनविशेष :

 • 1609 : गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
 • 1718 : न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2015)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World