Current Affairs of 27 August 2015 For MPSC Exams

Current Affiars 27 August 2015

 चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2015)

भारत आणि सेशल्स विविध क्षेत्रांतील सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या :

 • भारत आणि सेशल्स या दोन देशांतील संबंध अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून, त्यासाठी विविध क्षेत्रांतील सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.Karar
 • भारताच्या दौऱ्यावर असलेल्या सेशल्सचे अध्यक्ष जेम्स ऍलेक्‍स मायकेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

  या वेळी विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले.

 • कृषी, हवाई वाहतूक, सागरी सुरक्षा आदी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यासाठीच्या करारांवर दोन्ही देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • राजधानीतील हैदराबाद हाउसमध्ये मोदी आणि मायकेल यांच्यात आज बैठक झाली.
 • तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आवश्‍यक सुविधा असलेले अत्याधुनिक डॉर्निअर विमान भारतातर्फे सेशल्सला देण्यात येणार आहे.
 • यापूर्वीही भारताने अशा प्रकारचे एक विमान सेशल्सला दिले आहे.
 • तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी विमान, नाविक बोट आणि अत्याधुनिक रडार सेशल्सला देण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2015)

सातव्या वेतन आयोगाला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ :

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने सातव्या वेतन आयोगाला डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 • “यूपीए‘ दोनच्या काळात अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी 28 फेब्रुवारी 2014 ला सातव्या वेतन आयोगाची नेमणूक केली होती.
 • आयोगाला शिफारशींसह अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली होती.
 • त्या पार्श्‍वभूमीवर न्या. ए. के. माथूर यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाचा अहवाल 27 ऑगस्टला येणे अपेक्षित होते; परंतु मंत्रिमंडळाने 31 डिसेंबर 2015 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

“पॉस्को” प्रकल्पाबाबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार :

 • ओडिशातील “पॉस्को” प्रकल्पाबाबत यापूर्वी झालेल्या तिन्ही बैठका निष्फळ ठरल्यानंतर आता पुढील महिन्यामध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे.
 • “पॉस्को”चा 52 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प ओडिशामध्ये यावा म्हणून राज्य सरकार विशेष आग्रही आहे.
 • पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीस पंतप्रधान किंवा अर्थमंत्री उपस्थित राहण्याची शक्‍यता असल्याचे ओडिशाचे स्टील आणि खाणमंत्री प्रफुल्ल मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

“जीसॅट-6″चे प्रक्षेपण :

 • भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “जीसॅट-6”चे प्रक्षेपण केले जाणार आहे.Gisat 6
 • मिशन रेडिनेस रिव्ह्यू कमिटी (एमआरआर) आणि लॉंच ऍथोरायझेशन बोर्ड (लॅब) ने हिरवा कंदील दर्शविल्यानंतरच हा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी 4.52 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल.
 • “जीसॅट-6” हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था “इस्रो”ने तयार केलेला 25 वा भूस्थिर संवाद उपग्रह असून, “जीसॅट” सीरिजमध्ये त्याचा क्रम बारावा आहे.
 • या उपग्रहाचे आयुर्मान नऊ वर्षे एवढे असून, त्याचे वजन 2117 किलोग्रॅम एवढे आहे.
 • या उपग्रहामध्येच 6 मीटर व्यासाचा एस-बॅंड अनफर्लेबल अँटेना बसविण्यात आला असून, हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा अँटेना असल्याची माहिती “इस्रो”च्या संशोधकांनी दिली.
 • भूस्थिर उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रो तिसऱ्यांदा स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करत आहे.

डॉ. नरेंद्र जाधव यांची आरबीआय अध्यक्षपदी नियुक्ती :

 • नियोजन मंडळाचे माजी सदस्य व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांची सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) इतिहास लेखन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
 • जाधव आता “आरबीआय”चा 1997 ते 2007 या काळातील इतिहासाचा पाचवा खंड तयार करणाऱ्या इतिहास लेखन समितीचे प्रमुख सल्लागार असतील.

अभिनव बिंद्राला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पाच हजार युरोंची मदत :

 • ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटाकविणारा अभिनव बिंद्रा याला जर्मनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पाच हजार युरोंची आर्थिक मदत मंजूर केली Abhinav Bindraआहे.
 • नेमबाज अभिनव बिंद्रा हा 1 ते 11 सप्टेंबर दरम्यान जर्मनीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
 • राष्ट्रीय क्रीडा विकास निधीमधून ही मदत अभिनवला देण्यात येणार आहे.
 • अंदाजित खर्चाच्या 90 टक्के रक्कम आगाऊ मंजूर करण्यात आली आहे.
 • टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेअंतर्गत अभिनव बिंद्राला मंजूर करण्यात आलेल्या रकमेतून त्याचा खर्च करण्यात येईल असे मंत्रालयाच्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.
 • पिस्तुलाची चाचणी, परीक्षण आणि देखभालीसाठी हा निधी देण्यात येणार आहे.

सानिया मिर्झा ‘खेलरत्न’ पुरस्काराला स्थगिती :

 • भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याच्या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती Sania Mirzaदिली आहे.
 • क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाला पॅरालिंपियन एच. एन. गिरीशा याने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
 • जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान मिळविल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सानियाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता.
 • मात्र, लंडन 2012 पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या गिरीशा याने आपणच या पुरस्कारासाठी लायक असल्याचे सांगून न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
 • हा पुरस्कार राष्ट्रीय क्रीडादिनी 29 ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे.
 • क्रीडा मंत्रालयाच्या नियमावलीनुसार पुरस्कार दिले जातात. ज्याचे गुण अधिक ठरतात, त्याची पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यानुसार माझे 90 गुण होतात. सानिया याच्या जवळपासही नाही असे त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
 • यापूर्वी लिअँडर पेसला 1996 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

संजीव मेहता यांनी केली “ईस्ट इंडिया कंपनी” खरेदी :

 • भारतावर शंभर वर्षे राज्य करणारी “ईस्ट इंडिया कंपनी” एका भारतीयाने विकत घेतली आहे.
 • मुंबईतील उद्योगपती संजीव मेहता यांनी या कंपनीची खरेदी केली आहे.
 • संजीव मेहता यांनी 1.5 कोटी डॉलरला ही कंपनी विकत घेतली आहे.
 • संजीव यांनी 40 भागधारकांकडून ही हिश्‍शेदारी खरेदी केली आहे.
 • “ईस्ट इंडिया कंपनी”ची स्थापना 1600 मध्ये करण्यात आली होती.

सचिन तेंडुलकर ‘ग्रीन मिल्ट्री’चा अ‍ॅम्बेसेडर :

 • निरागस कोवळ्या हातांनी लक्ष-लक्ष झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करणारी नवी ‘ग्रीन मिल्ट्री’ तयार करण्याच्या मिशनचा सचिनने राजदूत व्हावे, या अर्थमंत्री सुधीरsachin मुनगंटीवार यांच्या बीजभावनेला आशेचा अंकुर फुटला आहे.
 • अत्यंत आपलेपणाने सचिन आणि अंजली यांनी सगळ्यांचे स्वागत केले.
 • ग्रीन मिल्ट्री मध्ये शालेय विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये जसे शोर्य, वीरतेचे प्रशिक्षण दिले जाते त्याच धर्तीवर आता एनजीसी (नॅशनल ग्रीन कॉफर्स) चे स्वरुप शालेय स्तरावर वाढवले जाणार आहे.
 • मुलांमध्ये इको क्लब, नेचर क्लबच्या माध्यमातून आपल्या जंगलांविषयी, प्राण्याविषयी, पर्यावरणाविषयी जागरुकता तयार केली जाईल.

एबी डिव्हिलियर्सने मोडला कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम :

 • दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण केल्या.
 • यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला.
 • डिव्हिलियर्सने सर्वात कमी 182 डावात या धावा केल्या आहेत. sourav ganguly
 • तर गांगुलीने 200 डावांत 8 हजार धावा केल्या होत्या.
 • तर सचिन तेंडुलकरने 210, ब्रायन लाराने 211महेंद्रसिंग धोनीने 214 डावांत 8 हजार धावा पूर्ण केल्या.
 • डिव्हिलियर्सने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 19 धावा करताच हा विक्रम आपल्या नावे केला.

दिनविशेष :

 • 1962 : नासा चे मानव-विरहित यान मरिनर 2 चे शुक्राकडे प्रस्थान
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.