Current Affairs of 25 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 नोव्हेंबर 2017)
31 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन ठाण्यात होणार :
- जैवविविधतेने नटलेल्या ठाणे खाडी किनाऱ्याचे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे आकर्षण स्थलांतरीत पक्ष्यांना जितके असते तितकेच आकर्षण पक्षीमित्रांना दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पक्षी संमेलनाचे असते. यंदाचे राज्यस्तरीय 31 वे पक्षीमित्र संमेलन ठाण्यात भरत असून 25 आणि 26 नोव्हेंबरचा विकेंण्ड ठाणेकरांसाठी पक्षीमित्रांच्या सहवासात जाणार आहे.
- होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर रोजी सकाळी होणार असून त्यानंतर सलग विविध पक्षी तज्ज्ञांच्या अनुभवांचा उलगडा ठाण्यात होणार आहे.
- ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या निर्मितीमध्ये भुमिका बजावणारे ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताजी उगावकर हे असणार आहे.
- ठाण्याच्या खाडी किनाऱ्यावरील समृध्द जैवविविधता स्थलांतरीत पक्षांना आकर्षित करत असताना होप संस्थेने पक्षीमित्र संमेलनाच्या आयोजनाच्या निमित्ताने पक्षी मित्रांनाही ठाण्याकडे आकर्षित केले आहे.
Must Read (नक्की वाचा):
सावरगावास जलसंवर्धक पुरस्कार जाहीर :
- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल सावरगाव (ता.बार्शी) या गावास जलसंवर्धक पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाशिकमध्ये येत्या 26 नोव्हेंबर पार पडणाऱ्या कृषीथॉन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
- ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यामाने नाशिक येथे कृषीथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या 12 व्या आवृतीचे आयोजन येत्या 23 ते 27 नोव्हेंबर या कालवधीत पार पडणार आहे.
- जलसंधारण अभावी शेती व जमिनी उजाड होत चालली आहे. हे विदारक चित्र ओळखून सावरगाव येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाचे महत्व ओळखून एकजुटीने त्याबाबतीत कामे हाती घेतली. त्यावेळी गावांतील अनेक व्यक्तींनी मदत करून गाव जलसंधारणाचा उपक्रम यशस्वीपणे पुर्ण केला. शिवारात पडलेला पाऊसाचा थेंब अन् थेंब साठवून जिरवण्याचा आटोकाट प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे. या उल्लेखनीय कामाबद्दल सावरगावाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे होणार आहे.
इंद्राणी मुखर्जीची ईडीकडून सहा तास चौकशी :
- आयएनएक्स मीडियाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) इंद्राणी मुखर्जीची भायखळा तुरुंगात चौकशी केली. सहायक संचालकपदाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 6 तास चौकशी केली. तिची पुन्हा 6 डिसेंबरला चौकशी करण्यात येणार आहे.
- पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक मिळाल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4 कोटी 62 लाखांची परदेशी गुंतवणुकीची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी मिळवले, असा आरोप आहे. कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांच्याशी संबंधित आयएनएक्स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे.
- सीबीआयने नोंदवलिेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कार्ती, पीटर, इंद्राणी मुखर्जी व अन्य संबंधितांविरोधात सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंद केला होता. ‘ईसीआयआर’ हा एकाअर्थी ‘एफआयआर’ असून, त्याअंतर्गत या प्रकरणात झालेला गैरव्यवहार व संबंधितांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे.
महादेव भिसे यांच्या छायाचित्रास आंतरराष्ट्रीय पुरस्कार :
- आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला.
- निसर्गातली कला कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपत महादेवने आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गाचे नाव कोरलंय. ‘सेंच्युरी एशिया’ या अत्यंत प्रथितयश मासिकातर्फे आयोजित ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ स्पर्धेत या विभागातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचं पारितोषिक पटकावले आहे. नुकत्याच द रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
- रोख रक्कम, एक कॅमेरा बॅग, प्रमाणपत्र आणि भारतातील कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये सफारी हे या पुरस्काराच स्वरूप आहे. आशिया खंडातील पाच हजाराहूनही अधिक छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता आणि काका भिसे हा त्या सगळ्यात अव्वल ठरला आहे. सेंच्युरी एशिया या मासिकामध्ये त्याचा हा फोटो प्रकाशित देखील करण्यात आला आहे.
- आंबोली बुश या बेडकाला एका किटकांच्या लारवयांनी पकडलेले असल्याचा हा फोटो असून हा कीटकांचा लारवा या बेडकांना भविष्यात या बेडकांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. असा शोधनिबंधही यावर लिहिण्यात आला. हा शोधनिबंध व काका भिसे यांनी काढलेला तो बेडकाचा फोटो या दोघांनाही मिळवून हा मानाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार प्रथम क्रमांकाचे पारितोषिक काका भिसे यांना मिळाले.
20वे शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर :
- कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्यावतीने देण्यात येणारा ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ लावणी नृत्यांगना छाया खुटेगावकर यांना जाहीर झाला आहे. तर लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी गायिका नंदा सातारकर यांना, तर कै. पठ्ठे बापूराव यांचे पटशिष्य ‘बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर बाळासाहेब मालुसकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे व कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे यांनी दिली.
- लोककला क्षेत्रासाठी योगदान देणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठेच्या समजला जाणा-या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने राजश्री नगरकर, चंद्राबाई तांबे, कांताबाई सातारकर, शाहीर बाबूराव काटे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर, अशा जुन्या पिढीतील नामांकीत कलावंताना लोककलेस प्रोत्साहन देणारे बाळदादा मोहीते पाटील, सिने अभिनेत्री आशा काळे यांना सन्मानीत करण्यात आले होते. पुरस्काराचे हे 20वे वर्ष आहे.
- तसेच शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार रोख 15000 रूपये, डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार रोख 10000 रूपये व बाप्पुसाहेब जिंतीकर पुरस्कार रोख 5000 रूपये, स्मृतीचीन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिनविशेष :
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, साहित्यप्रेमी, राजकारणी “यशवंतराव बळवंतराव चव्हाण” (12 मार्च 1913 मध्ये कराड येथे जन्म. तसेच 25 नोव्हेंबर 1984 रोजी महाराष्ट्रात स्मृतीदिन.)