Current Affairs of 26 November 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 नोव्हेंबर 2017)

चालू घडामोडी (26 नोव्हेंबर 2017)

अर्जुन रणगाड्यावरुन क्षेपणास्त्र डागता येणार :

  • भारताच्या डीआरडीओने विकसित केलेल्या अर्जुन एम के-2 या रणगाड्यावरुन क्षेपणास्त्र डागता येणे शक्य होणार आहे.
  • या रणगाड्याची क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असून पुढील वर्षापर्यंत हे शक्य होणार आहे.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे नवे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
  • हे क्षेपणास्त्र रणगाड्यावरुन डागता येणार आहे.
  • 2013 मध्ये अर्जुन एक के-2 रणगाड्यावर इस्त्रायली बनावटीचे क्षेपणास्त्र बसवण्यात आले होते. मात्र, ते लष्कराच्या गरजेची पुर्तता करु शकले नव्हते.
  • सध्या डीआरडीओकडून सुरु असलेल्या क्षेपणास्त्र निर्मिती चाचणी टप्प्यात असून लष्कराच्या मागणीप्रमाणे त्यात बदल करण्यात येत आहेत.
  • 1200 मीटर्स पेक्षा कमी टप्प्यावरील टार्गेट गाठण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
  • भारतीय लष्कराने इस्त्रायली बनावटीचे लहाट (लेझर होमिंग अँटी टँक) क्षेपणास्त्र नाकारले होते.
  • या क्षेपणास्त्राची रेंज ही 1500 मीटर्सच्या पलिकडे होती. लष्कराने आणि डीआरडीओने या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.
  • याचा निर्मिती खर्च 20 कोटी रुपये इतका होता.
  • सुरुवातीला लष्कराने 500 मीटर्स आणि 5 किमी इतक्या रेंजची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यात बदल करुन ती 1200 मीटर्स आणि 5 किमी इतकी ठेवण्यात आली.
  • ‘डीआरडीओ’ने विकसीत केलेल्या अर्जुन रणगाड्यामध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
  • यात रणगाड्याच्या 80 फिचर्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रणगाड्याची तोफगोळा डागण्याची क्षमता चांगली झाली आहे.
  • इंटेग्रेटेड एक्स्प्लोजिव रिअॅक्टिव आरमर, अॅडव्हान्स लेझर वॉर्निंग, काऊंटर मेजर सिस्टीम, सुरुंग पेरण्याच्या क्षमतेत वाढ, रिमोटने वापरता येणारी विमानविरोधी हत्यारे, आधुनिक नेविगेशन सिस्टीम तसेच रात्रीच्या वेळीच्या दृश्यमानतेची क्षमता वाढवण्यात आली आहे.

पनवेलमध्ये ‘इस्रो’चे इंधन उत्पादन :

  • पनवेल तालुक्याच्या वेशीवरील रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनी (एचओसी) डबघाईस आल्याने या कंपनीचा काही भाग भारत पेट्रोलियम कंपनी व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्यामुळे इस्रोमधून होणाऱ्या संशोधनानंतर अवकाशोड्डाणात जमिनीवरून सुटणाऱ्या उपग्रहात रसायनी येथून उत्पादन केलेले इंधन भरले जाणार आहे.
  • यापूर्वी हे इंधन एचओसी कंपनीतून इस्रोला मिळत होते.
  • मात्र इस्रो आता यापुढे स्वत:च या कच्च्या मालाची उत्पादन निर्मिती करून अवकाशोड्डाण करून उपग्रह पाठविणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
  • या प्रकल्पामुळे पनवेलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार असून भविष्यातील देशाच्या अवकाशझेपेमध्ये पनवेलचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
  • एचओसी कंपनीच्या तीनशे एकर जागेवरील कारखान्यातील 20 एकर जागेवरील महत्त्वाचा प्रकल्प इस्रोला व भारत पेट्रोलियम कंपनीला उर्वरित 442 एकर जागा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • एचओसी कंपनी या प्रकल्पातून फीनोल, अॅसीटोन, नायट्रोबेन्झीन, अॅनीलाइन, नायट्रोटोलीन, नायट्रो सल्फरिक अॅसिड, नायट्रोक्लोरोबेन्झीन ही उत्पादने बनवत होती.
  • त्यापैकी इस्रोच्या उपग्रहातील अवकाशोड्डाणात लागणारा एन 2 वो फोर याचा कच्चा माल येथे बनविला जात होता.
  • एचओसी कंपनी बंद झाल्याने हा कच्चा माल सुरुवातीच्या काळात इस्रो स्वत:च्या व्यवस्थापनाच्या देखरेखीखाली या प्रकल्पातून बनविणार आहे.
  • राज्यातील हा इस्रोचा पहिला प्रकल्प असणार आहे.

तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड :

  • ओडिशातील मनोजकुमार महाराणा या पठ्ठ्याने आपल्या तोंडात 459 स्ट्रॉ ठेवूनगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
  • गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याला लहानपणापासूनच आपलं नाव नोंदवयाचं होतं म्हणून या त्याने तोंडात स्ट्रॉ ठेवून पराक्रम केला आहे.
  • मनोजकुमार हा अवघ्या 23 वर्षांचा तरुण आहे.
  • तोंडात स्ट्रॉ ठेवून रेकॉर्ड बनवणारे सिमोन एलमोरे यांची प्रेरणा घेऊन मनोजकुमारने हा रेकॉर्ड केला आहे.
  • सिमोन एलमोरे यांनीही असाच रेकॉर्ड केला होता. सिमोन हे जर्मनीचे असून त्यांनी आपल्या तोंडात 400 स्ट्रॉ ठेवून विश्वविक्रम केला होता.
  • आणि आता मनोजकुमार याने तब्बल 459 स्ट्रॉ ठेवून सिमोन यांचा विक्रम मोडला असून नवा विश्वविक्रम केला आहे.  
  • सिमोन नंतर मधल्या आठ वर्षात असा रेकॉर्ड कोणीही केलेला नाही.
  • वर्ल्ड रेकॉर्डसाठी काही नियम असतात, त्या नियमांनुसार आपल्या हातांचा आधार न घेता हे स्ट्रॉ 10 सेकंद तोंडात ठेवावं लागतं.

नासाची ड्रोन रेस, कृत्रिम बुद्धिला मानवाने हरवले :

  • नासाने घेतलेल्या एका चाचणीत मानवी पायलटने कृत्रिम बौद्धिकतेवर आधारित (एआय) प्रणालीवर मात करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.
  • या चाचणीत जागतिक स्तरावरील ड्रोन पायलट केन लू यांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली.
  • नासाचे हे विशेष ड्रोन 129 किमी प्रति तास या वेगाने जाऊ शकतात. पण, नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबोरेटरीचे (जेपीएल) ड्रोन प्रति तास 48 ते 64 किमी उडू शकत होते.

रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी बांगलादेश आणि म्यानमारमध्ये करार :

  • बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री मेहमूद अली यांनी म्यानमारमध्ये सकाळी सू की यांची भेच घेऊन चर्चा केली.
  • राखिनमधील हिसांचार आणि तणावाला कंटाळून 6 लाख 22 हजार रोहिंग्या म्यानमारच्या कॉक्सबझार जिल्ह्यामध्ये आश्रयासाठी आलेले आहेत.
  • राखिन प्रांतामध्ये रोहिंग्या परत यावेत यासाठी बांगलादेश आणि म्यानमारने आज करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • बांगलादेशातर्फे परराष्ट्र मंत्री ए.एच. मेहमूद अली आणि म्यानमारतर्फे स्टेट कौन्सिलर कार्यालायाचे राज्यमंत्री क्याऊ टिंट स्वे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

चीननंतर भारतातील मुले लठ्ठ :

  • चीननंतर जागतिक स्तरावर भारतातील मुले स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे.
  • या अभ्यासानुसार, देशातील 14.4 लाख मुलांचे वजन अधिक असल्याचे आढळून आले आहे.
  • तर जागतिक स्तरावर दोन अब्जपेक्षा अधिक मुले आणि प्रौढांना जादा वजन किंवा लठ्ठपणाने ग्रासले आहे.
  • या वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे आयुर्मर्यादा कमी झाल्याचे दिसून आले आहे.
  • या अभ्यासानुसार, चीनमध्ये 15.3 लाख मुलांना, भारतात 14.4 लाख लहानग्यांना स्थूलतेची समस्या आहे. तर भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

पाकच्या कणखर महिलेवरील चित्रपट ऑस्करला :

  • पाकिस्तानातील सर्वात कणखर महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाजो धरिजो ऊर्फ मुख्तयार नाज यांच्यावर आधारित चित्रपट पुढील वर्षी ऑस्करला जाणार आहे.
  • नाजो धरिजो पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या दुर्गम काजी अहमद गावात राहतात.
  • 2005 मध्ये ऑगस्टच्या एका रात्री त्यांची वडिलोपार्जित जमीन घेण्यासाठी शत्रूने 200 बंदूकधाऱ्यांसह त्यांच्या घरावर चाल करत गोळीबार केला होता.
  • तेव्हा नाजो यांनी आपल्या बहिणींसह एके-47 रायफल काढली होती. छताच्या मार्गे मागे जाऊन त्यांनी शत्रूला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले होते.
  • हे पाहून शत्रूंनी त्यांच्यापुढे गुडघे टेकले होते. त्यांच्या या धाडसावर हॉलीवूडमध्ये चित्रपट बनला.
  • त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. पुढील वर्षी 92 देशांत हा चित्रपट पोहोचेल.

गाणे ऐकतांना तुम्हाला असे झाले, तर सर्वसामान्यांपेक्षा तुम्ही वेगळे आहात :

  • तुम्हाला कधी गाणे ऐकतांना ह्दयाची कंपने वेगाने होतात? कधी त्वचेवर शहारे उभे राहतात? किंवा डोळ्याचे बुब्बळ उघडले? यापैकी जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे आहात.
  • हार्वर्ड विद्यापीठात नुकतेच एक संशोधन झाले. यानुसार गाणे ऐकतांना वेगळी अनुभूती येणारे लोक सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे असतात.
  • विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, अशा लोकांच्या शरीरात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आवाज ऐकल्यावर तो फिलिंग्सची अनुभूती करून देतो.
  • त्यामुळे गाणे ऐकणाऱ्या या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा शार्प असतो. असे लोक असंख्य मानसिक आजारांपासून स्वत:चा बचाव करतात.

सर्व विद्यापीठांत आज संविधान दिन होणार :

  • देशभरातील विद्यापीठांनी संविधान दिन साजरा करावा, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले आहेत.
  • संविधान दिन साजरा करताना संविधानाच्या प्रस्तावनेचे जाहीर वाचन करावे आणि मूलभूत कर्तव्यांबाबत व्याख्याने आयोजित करावीत; तसेच वेगवेगळे उपक्रम घ्यावेत, असे निर्देश आयोगाने सर्व विद्यापीठांना दिले आहेत.

लखनौच्या महापौरपदी आता प्रथमच महिला :

  • देशाला पहिली महिला मुख्यमंत्री आणि राज्यपाल देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये लवकरच इतिहास घडणार आहे.
  • लखनौ शहरात मागील शंभर वर्षांमध्ये प्रथमच हिल्या महिला महापौराची निवड होणार आहे.
  • कधीकाळी याच उत्तर प्रदेशातील आघाडीच्या महिला नेत्या आणि स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांनी सर्वप्रथम राज्यपाल; तर सुचेता कृपलानी यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले होते.
  • सरोजिनी नायडू या “नाईटेंगल ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जात असत.
  • उत्तरेतील संयुक्त प्रांताच्या राज्यपाल होण्याचा मान सर्वप्रथम नायडू (1947 ते 1949) यांनाच मिळाला होता.

मारक क्षमता वाढलेल्या ‘ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी :

  • ब्राह्मोस’ या क्षेपणास्त्रासाठी बुस्टर म्हणून वापरण्यात येणाऱ्या ‘सॉलिड प्रॉपेलंट’ चाचणी सुखोई-30 या लढाऊ विमानावर यशस्वीपणे घेण्यात आली.
  • राष्ट्रीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डी.आर्.डी.ओ.) हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीने हे ‘सॉलिड प्रॉपेलंट’ विकसित केले आहे.
  • या यशस्वी चाचणीची घोषणा 11व्या आंतरराष्ट्रीय उच्च ऊर्जा सामग्री परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक के.पी.एस्. मूर्ती यांनी केली.
  • या चाचणीचा शेवटचा टप्पा म्हणजेच यांत्रिक कंपन चाचणी पुढील महीन्यात करण्यात येईल व त्यानंतर हे सॉलिड प्रॉपेलंट क्षेपणास्त्रात वापरण्यात येईल,’ या क्षेपणास्त्राचे क्षेत्रफळ हे 300 किमी. इतके आहे, याची निर्मिती ब्राह्मोस एरोस्पेस प्रा. लि. (डी.आर्.डी.ओ.) आणि रशियातील एन.पी.ओ.एम्. यांनी एकत्रितपणे केली आहे.

दिनविशेष :

  • 1941 : लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.
  • 1949 : भारताची घटना मंजूर झाली.
  • 1949 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
  • 1965 : अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1997 : शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
  • 2008 : महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
  • 2008 : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला 26/11 म्हणून ओळखले जाते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.