Current Affairs of 25 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 मार्च 2018)
रेल्वे अपघात रोखण्यासाठी अद्ययावत यंत्रणा :
- चाक आणि रुळांमधील बिघाड शोधून काढतानाच त्याची तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती देणारी ऑनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक (ओएमआरएस) यंत्रणा रेल्वे मंत्रालयाकडून लावण्यात येत आहे. यामुळे एक्स्प्रेस गाडय़ांच्या चाकातील तसेच रुळांमधील बिघाडामुळे होणारे रेल्वे अपघात टाळण्यास मदत मिळेल.
- पानिपत येथे यशस्वी चाचणी घेण्यात आल्यानंतर आता येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रातदेखील ही यंत्रणा येईल.
- लांब पल्ल्याच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. यात चाक तुटण्यासारख्या समस्यांसोबतच रुळामध्ये तांत्रिक समस्या झाल्यामुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी ओएमआरएस यंत्रणा रुळांना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सुरुवातीला 25 यंत्रणा घेण्यात येणार असून त्यानंतर इतरांसाठी निविदा काढण्यात येतील. या यंत्रणेमुळे सुमारे 35 तांत्रिक दोष शोधून काढता येतील.यात रुळ तुटणे, चाक तुटणे यांसारख्या महत्त्वाच्या बिघाडांचा समावेश असेल.
Must Read (नक्की वाचा):
चिनाब नदीवरील सर्वात उंच पूल लवकरच सेवेत :
- खोल दरी आणि ती कापत तब्बल 359 मीटर उंचीवरून ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने धावणारी ट्रेन. अवघ्या एका मिनिटाचा हा थरारक अनुभव आणखी तीन वर्षांनंतर प्रवाशांना जम्मू-काश्मीरमध्ये अनुभवण्यास मिळणार आहे.
- उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पात जगातील सर्वात उंच पूल चिनाब नदीवर बांधण्यात येत असून त्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.
- जगातील सर्वात जास्त उंचीचा पूल चिनाब नदीवर उभारण्यात येत असून या पुलाच्या कामाला 1995 मध्ये सुरुवात करण्यात आली.पुलाची लांबी 1315 मीटर असून पुलाची उंची 350 मीटर आहे.
- तसेच या पुलावर दोन ट्रॅक असतील आणि ताशी 80 किलोमीटर वेगाने लांबपल्लय़ाची गाडी एका मिनिटात पूल पार करेल.
भारतीय पथकाचे नेतृत्व पी.व्ही. सिंधूकडे :
- ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 4 ते 15 एप्रिल या कालावधीत आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे. राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यात सिंधू भारताची ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हा बहुमान सिंधूला दिला आहे.
- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
पुस्तकातून वगळला ‘मुस्लिमविरोधी’ शब्द :
- नॅशनल काउंसिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) च्या बारावीच्या पॉलिटिकल सायन्स’च्या पुस्तकातून“अँटी मुस्लिम राईट्स” इन गुजरात हा शब्द वगळला आहे. त्याऐवजी “गुजरात रायट्स” हा शब्द आता वापरण्यात येणार आहे.
- गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीची माहिती देणारा धडा “पॉलिटिक्स इन इंडिया सिंस इंडिपेंडंस” या शीर्षकाने आहे. यातील उपशीर्षकात बदल करून “अँटी मुस्लिम राईट्स इन गुजरात”ऐवजी आता “गुजरात रायट्स” हा शब्द येणार आहे. व सुरवातीच्या ओळीतील बदलाशिवाय या धड्यातील माहितीत अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पुस्तकातील पान क्र. 187 वर दंगलीबाबत जो परिच्छेद प्रसिद्ध केला आहे, त्याच्या शीर्षकात “मुस्लिमविरोधी दंगल”ऐवजी “गुजरात दंगल” असा बदल केला असला, तरी याच परिच्छेदात 1984 मध्ये देशात झालेल्या दंगलीला “शीखविरोधी” म्हटले आहे.
भारताची “चांद्रयान-2” मोहीम ढकलली पुढे :
- भारताची “चांद्रयान-2” मोहीम येत्या ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही मोहीम पुढील महिन्यात सुरू होणार होती. मात्र, तज्ज्ञांनी आणखी काही चाचण्या सुचविल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवान यांनी दिली आहे.
- या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचा प्रथमच प्रयत्न केला जाणार आहे.
- इस्रो आणि इतर संस्था चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग राबवित आहेत. चंद्रावर मानवी वस्तीच्या उद्दिष्टासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे.
सिंगापूर एअरपोर्ट सलग सहाव्यांदा सर्वोत्कृष्ठ :
- जगातील सर्वात उंच एअरपोर्ट स्लाइड, 24 तास मोफत सिनेमा, छतावर स्विमिंग पूल आणि सुंदर असे पार्क या सर्व गोष्टींनी सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला पुन्हा बेस्ट विमानतळाचा खिताब मिळाला आहे.
- बेस्ट एअरपोर्टचा खिताब मिळवण्याची या विमानतळाची ही सलग 6 वी वेळ आहे. तसेच स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये यास एकूण 9 वेळा विजेता घोषित करण्यात आले आहे.
- या सर्वेक्षणात जगभरातील 550 विमानतळांचा समावेश करण्यात आला होता. यात प्रवाशांचा अनुभव, चेकइन, ट्रान्सफर, शॉपिंग, सिक्यॉरिटी आणि इमिग्रेशनसंदर्भात क्रमवारी देण्यात आले आहेत.
टपाल सेवेचे नवे स्वरूप :
- भारतीय टपाल विभागाने आता पार्सल, पत्रे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची ऑनलाइन बुकिंग करून ग्राहकांच्या घरून नेण्यासाठी आणि सर्वाधिक कमी वेळेत ते इच्छितस्थळी पोहोचवण्याची सेवा सुरू केली आहे.
- डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत भारतीय टपालसेवा आता देशविदेशातील कुरिअर कंपन्यांना मात देण्यासाठी सज्ज झाली आहे.
- तसेच या वेळी भारतीय टपाल सेवेच्या “क्लिक अँड बुक” प्रणालीचाही शुभारंभ केला जाणार आहे.
- भारत नेट योजनेच्या माध्यमातून राज्यातील सहा हजार ग्रामपंचायतींना योजनेतील पहिल्या टप्प्यात ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडले आहे.
दिनविशेष :
- क्रिस्टियन हायगेन्स यांनी 1655 मध्ये शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.
- 1807 मध्ये गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
- मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली.
- 2013 मध्ये मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
- 1933 मध्ये शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा