Current Affairs of 24 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 मार्च 2018)

चालू घडामोडी (24 मार्च 2018)

जीवसृष्टीच्या शोधात भारताचा पुढाकार :

  • अवकाशात सूर्यासारखे अनेक तारे आणि हजारोंच्या वर ग्रह आहेत. केवळ पृथ्वीवरच जीव आहेत असे नाही. कारण अंतराळात जीवसृष्टीला आवश्यक असणारे कार्बनिक रेणू आहेत.
  • तसेच जीवसृष्टी नांदायला ‘योग्य ठिकाणी’ ग्रह आहेत. त्यामुळे पलिकडे जीवसृष्टी असण्याचा संभव आहे. साधारणतः लाख ते दहा लाख अतिप्रगत जीवसृष्टी आकाशगंगेत असू शकतील असा अंदाज आहे. त्यांच्याशी संवाद झाला नाही मात्र, शोध सुरू आहेत, असा दावा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. जयंत नारळीकर यांनी केला.  
  • येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व सोमेश्वर इंजिनिअरिंग कॅालेजच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘पृथ्वीपलिकडील जीवसृष्टीचा शोध’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मार्च 2018)

सीमेवरील जवानांना मिळणार अत्याधुनिक शस्त्रास्त्रे :

  • गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराला आधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता आहे. मोठ्या विलंबानंतर अखेर केंद्र सरकारने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी आधुनिक रायफल्स, लाइट मशीन गन आणि क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.
  • जलदगती प्रक्रियेतंर्गत (एफटीपी) ही शस्त्रास्त्रे पुरवली जाणार आहेत. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी निवडलेल्या विदेश कंपन्यांना 72400 असॉल्ट रायफल्स, 16479 एलएमजी आणि 93895 सीक्यूबी कार्बाइन्ससाठी निविदा देण्यात आली आहे. सुमारे 5366 कोटी रूपयांचा हा व्यवहार असल्याचे सांगण्यात येते.
  • दहा दिवसांच्या आत हा करार निश्चित केला जाणार आहे. येत्या वर्षभरात ही शस्त्रास्त्रे भारताला सोपवली जातील अशी अपेक्षा केली जात आहे. सन 2005 मध्येच लष्कराने 382 बटालियन्ससाठी सीक्यूबी कार्बाइन्सची मागणी केली होती. याच्या प्रत्येकात 850 सैनिक आहेत. सन 2009 मध्येच लाइट मशीन गनचे प्रकरण सुरू झाले होते. पण काही तांत्रिक मापदंडामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

स्पेस एक्सचे एफबीवरुन लॉगआऊट :

  • केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत.
  • केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्क यांना फेसबुकवरील ‘स्पेस एक्स’चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनी देखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला दणका दिला.
  • ‘आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा आम्ही त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला मोठा फटका बसेल असे काही नाही,’ असेही मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या फेसबुकवरील पेजला लाखो युजर्सनी लाईक केले होते.
  • केंब्रिज अॅनालिटिकाप्रकरणानंतर एखाद्या कंपनीने फेसबुकवरील पेज बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे. फेसबुकसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

इस्त्रायला पोहोचले पहिले भारतीय विमान :

  • भारत आणि इस्त्रायल यांच्यातील संबंधांमध्ये आता एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. एअर इंडियाचे एक विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून जात 22 मार्च रोजी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले.
  • सौदी अरेबियाच्या आकाशातून इस्त्रायलला जाणारे हे पहिलेच विमान ठरले. भारतातून इस्त्रायल आणि इस्त्रायलहून भारताकडे जाणारे विमान येथून जाऊ शकतील असे संकेत सौदी अरेबियाने नुकतेच दिले होते.
  • एअर इंडियाच्या 139 हे विमान तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर साडेसात तासांचा प्रवास करून उतरले. सौदी अरेबियाकडून आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा कूटनीतिक बदल ठरला आहे. इराणबरोबर सौदी अरेबियाच्या तणावपूर्ण संबंधांमुळे इस़्त्रायलला झुकते माफ दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
  • तसेच इस्त्रायलचे पर्यटन मंत्री यारिव लेव्हिन यांनी एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, हा खरच एक ऐतिहासिक दिवस आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर असे होऊ शकले आहे.

सरकारने मागवले एनसीसी कॅडेट्सचे ई-मेल व मोबाईल क्रमांक :

  • जगातील सर्वात मोठी तरुण स्वयंसेवकांची संघटना असलेल्या राष्ट्रीय कॅडेट कोअर (एनसीसी) या संघटनेच्या कॅडेट्सकडून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात येत आहे.
  • सरकारकडून हे काम सुरु असून यामध्ये 13 लाख कॅडेट्सचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल मागवण्यात आले असून ही संपूर्ण माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. या माहितीद्वारे पंतप्रधान या कॅडेट्सशी संवाद साधणार आहेत.
  • सध्या 9 लाख कॅडेट्सकडून अशा स्वरुपाची माहिती एनसीसीने गोळा केली असून ही संपूर्ण प्रक्रिया याच पंधरवड्यात पूर्ण करायची आहे. मात्र, पंतप्रधानांसोबत या विद्यार्थ्यांशी संवादाची तारीख अद्याप निश्चित करण्यता आलेली नाही. पंतप्रधानांच्या वेळे आणि सोयीनुसार ही तारिख निश्चित होणार आहे.
  • तसेच यासंदर्भात 23 फेब्रुवारी 2018 रोजी लेफ्टनंट जनरल बी.एस. सहरावत (एनसीसी) यांनी सर्व राज्यातील विभागीय कार्यालयांना अधिकृत पत्र पाठवून सूचना देण्यात आल्या आहेत. या माहितीमध्ये कॅडेट्सचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल यांसारखी माहिती मागवण्यात आली आहे. त्याचबरोबर जर एखाद्या कॅडेटकडे मोबाईल क्रमांक नसेल तर त्याच्या पालकांचा क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे.

दिनविशेष :

  • सन 1837 मध्ये कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
  • आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान 24 मार्च 1855 मध्ये तारसेवा सुरू झाली.
  • 24 मार्च 1896 रोजी अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.
  • सन 1929 मध्ये 24 मार्च रोजी लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
  • 24 मार्च 1993 मध्ये शूमाकर-लेव्ही-9 या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मार्च 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.