Current Affairs of 26 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 मार्च 2018)
संवर्धनासाठी प्लॅनेट अर्थ फौंडेशनची स्थापना :
- पर्यावरणशास्त्र विभागात शिक्षण घेताना पर्यावरणाचे महत्व त्यांनी जाणले. पर्यावरणाचे जतन, संवर्धनाचे कार्यही त्यांनी सुरू केले. आज ना उद्या शिक्षण संपेल, पण हे कार्य थांबले नसले पाहीजे. याच उद्देशाने ‘प्लॅनेट अर्थ फौंडेशन‘ संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, प्लास्टिकमुक्ती आणि ध्वनीप्रदुषण रोखण्याचेही काम पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी हाती घेतले.
- पर्यावरण प्रेमी प्रणव महाजन या विद्यार्थ्यांने शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात प्रवेश घेतला. गेल्या चार वर्षापूर्वी ते मित्रासह ‘सह्याद्री टायगर रिझर्व‘ प्रकल्पाशी जोडले गेले. तेलंगा, मेळघाट, दांडेली आदी ठिकाणी त्यांनी वन्यप्राण्यांबाबत प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी व्याघ्रसह प्राणी गणनाही केली.
- ग्लोबल वॉर्मिंग रोखायचे असेल तर पर्यावरणाचे जतन संवर्धना शिवाय दुसरा पर्याय नाही हे जाणले. वृक्षारोपणास सुरवात केली. त्याचबरोबर वृक्षांचे जतन करा, वृक्ष लावा, वन्यजीवांचे संरक्षण करा. त्यांचा समतोल बिघडू देऊ नका याबाबत समाजाचे प्रबोधन करण्यास सुरवात केली.
Must Read (नक्की वाचा):
ब्रिटनच्या वर्तमानपत्रांत फेसबुककडून माफीनामा :
- फेसबुकच्या वापरकर्त्यांची माहिती फुटल्याप्रकरणी फेसबुकचे अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी ब्रिटनच्या वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन माफी मागितली आहे. आम्हांवर तुमची माहिती जपण्याची जबाबदारी आहे.
- ते जमत नसेल तर आमची या व्यवसायात राहण्याची पात्रता नाही, अशा आशयाच्या पूर्ण पानभर जाहिराती झुकरबर्ग यांनी ब्रिटनमधील महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये छापून माफी मागितली आहे.
- विद्यापीठातील एका संशोधकाने 2014 साली तयार केलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून फेसबुकवरील माहिती फुटली. त्या वेळी आम्ही फारसे काही केले नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण त्यानंतर फेसबुकने सुरक्षा वाढवली आहे. आमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
आता भाजपा राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष :
- भाजपासाठी दि. 23 मार्च हा दिवस विशेष ठरला आहे. या दिवशी पक्षाने राज्यसभेच्या 12 जागा जिंकल्या आहेत. या विजयामुळे भाजपा आता राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या सर्वांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही हा विजय खूप महत्वाचा ठरला.
- राज्यसभेच्या 7 राज्यातील 26 जागांसाठी मतदान झाले होते. यापैकी 12 जागांवर कमळ फुलले आहे. उत्तर प्रदेशमधील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
- आता भाजपाचे राज्यसभेत 73 खासदार झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमधील नववी जागा ही अतिरिक्त होती. या जागेवरून उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.
काटेरी फणस बनले केरळचे राज्यफळ :
- काटेरी आणि अवजड असूनही आतमध्ये गोड रसाळ गरे असणाऱ्या फणसाला नुकतेच केरळच्या राज्यफळाचा मान मिळाला आहे. या राज्यात होणारे फणसाचे उत्पादन आणि निर्यात यावरुन हा मान बहाल करण्यात आला आहे.
- राज्याचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनीलकुमार नुकतीच या गोष्टीची विधानसभेत ही घोषणा केली. ते म्हणाले, केरळमध्ये दरवर्षी 30 ते 60 कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. हे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करुन कोणतीही कटकनाशके न वापरता केलेले असते.
- केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येत्या काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व व्यवहारातून सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
- तसेच फणसाबरोबर या राज्यातील केळी आणि अननसही परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. येत्या काळात आपल्या कष्टाचा मोबदला थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्याचा मानस असल्याचेह त्यांनी सांगितले. फणसाला राज्याचे फळ म्हणून मान देणारे केरळ हे पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई :
- राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर शहरात पहिल्याच दिवशी बंदीबाबत प्लॅस्टिक उत्पादक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून आली. दरम्यान, प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाबाबत संबंधित अधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल, त्यानंतर कारवाईची रूपरेषा निश्चित करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.
- प्लॅस्टिक कचऱ्यामुळे माणसांबरोबरच वन्य आणि सागरी जिवांवर दुष्परिणाम दिसून येत आहे. नाले आणि गटारात कचरा अडकल्यामुळे शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
दिनविशेष :
- सन 1552 मध्ये गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.
- 26 मार्च 1942 रोजी इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह झाला.
- नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 26 मार्च 1972 रोजी पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
- सन 2013 मध्ये 26 मार्च रोजी त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा