Current Affairs of 25 March 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 मार्च 2016)
‘प्रवीं’ यांची नोंद वंडर बुकमध्ये :
- सलग 17 तास 10 मिनिटे कवितांचा एकपात्री प्रयोग करून रसिकांना थक्क करून सोडणाऱ्या सोलापुरातील कवी प्रशांत विजय राजे अर्थात प्रवी यांची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स या जगप्रसिद्ध पुस्तकानं घेतली आहे.
- 30 जुलै 2015 रोजी कवी प्रवी यांनी सलग 17 तास 10 मिनिटे हिंदी, मराठी कविता, गझल यांच्या सादरीकरणाचा एकपात्री प्रयोग सोलापुरात केला होता.
- तसेच त्यांच्या या विक्रमी सादरीकरणाची दखल अनेक संस्थांनी घेतली होती.
- हरियाणास्थित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि नवी दिल्लीस्थित इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद झाली होती.
- युनायटेड किंग्डममधील वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही प्रवी यांच्या या प्रयोगाची दखल घेतली आहे.
- वंडर बुकमध्ये नोंद झाल्याचे पत्र प्रवी यांना 19 फेब्रुवारी 2016 रोजी प्राप्त झाले.
- वंडर बुककडून प्रवी यांना एन्रोलमेंट किट देण्यात येणार असून त्यामध्ये एका सुवर्णपदकाचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
रेल्वे मध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या आरक्षणात वाढ :
- ज्येष्ठ नागरिक व 45 पेक्षा अधिक वयाच्या महिला, तसेच गर्भवती महिलांसाठी रेल्वेमधील आरक्षण 50 टक्क्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- तसेच आता प्रत्येक रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 90 बर्थ उपलब्ध होणार आहेत, या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
- ज्येष्ठ नागरिकांच्या आरक्षणात वाढ करावी अशी प्रवाशांची मागणी होती, त्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक आरक्षण कोट्याची घोषणा केली होती.
- नव्या आरक्षणानुसार ज्येष्ठ नागरिकांसह 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला, तसेच गर्भवती महिलांनाही आरक्षण देण्यात येणार आहे.
इंदू मिल स्मारकासाठी एक समिती सज्ज :
- इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्यावर मतैक्य घडविण्यासाठी सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांशी चर्चा करुन आराखडा अंतिम करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
- तसेच, येत्या 14 एप्रिलनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी अद्याप इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत झाली नाही.
- त्यामुळे स्मारकाच्या बांधकामात प्रगती होत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला.
- तसेच यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथील स्मारकाच्या उभारणीसाठी सर्व आवश्यक परवानग्या केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत.
- जागेचे हस्तांतरण ही केवळ तांत्रिक बाब असून प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याची लेखी परवानगी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने दिली आहे.
- तसेच 14 एप्रिलला मोठ्या प्रमाणावर लोक चैत्यभूमी आणि इंदू मिलला येतात, त्यामुळे 14 एप्रिलनंतरच या कामाला सुरुवात केली जाईल.
टी-20 विश्वचषकाची सेमीफायनल दिल्लीमध्येच होणार :
- टी-20 विश्वचषकाची सेमीफायनल लढत आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार 30 मार्च रोजी येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळली जाईल.
- दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममधील वादग्रस्त आर.पी. मेहरा ब्लॉकचे ‘उपयुक्तता प्रमाणपत्र’ या ब्लॉकचे प्रमाणपत्र न मिळाल्याने सामन्याच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह लागले होते.
- डीडीसीएला मंजुरी प्रमाणपत्र देण्यासाठी (दि.23) दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला.
- सर्वोच्च न्यायालयाने डीडीसीएचे पर्यवेक्षक असलेले माजी न्या. मुकुल मुद्गल आणि डीडीसीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मंजुरी प्रदान केली.
- बैठकीची माहिती देताना डीडीसीएचा एक अधिकारी म्हणाला,‘डीडीसीएला 2017 पर्यंत मंजुरी’ मिळाली आहे.
व्यावसायिक शिक्षणासाठी 50 टक्के शिष्यवृत्ती :
- निमशहरी आणि ग्रामीण भागांतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना इच्छा असूनही परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेता येत नाही.
- आर्थिक पाठबळाबरोबरच जागृतीच्या अभावामुळे त्यांना शिक्षणाच्या धोपटमार्गावरून चालावे लागते.
- तसेच या मुलांनाही दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी रिजेनेसिस बिझिनेस स्कूलने विशेष शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे.
- ऑनलाइन परीक्षा गुणवत्तेत उत्तीर्ण होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना रिजेनेसिसकडून 50 टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती रिजेनेसिसच्या भारतातील प्रमुख डॉ. रिचा अरोरा यांनी दिली.
- क्रोएशियन संन्याशी डॉ. मार्को सरावांझा यांनी दक्षिण आफ्रिकेत काही वर्षांपूर्वी रिजेनेसिस बिझिनेस स्कूलची स्थापना केली.
- तसेच या बिझिनेस स्कूलला विद्यापीठाचा दर्जा असून दक्षिण आफ्रिकेतील ते चौथ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.
- आता ते भारतातही त्यांचा विस्तार करीत असून भारतातील सर्वसामान्यांना विद्यापीठाकडून चालविण्यात येणाऱ्या एमबीए, बीबीए आदी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घेता यावा, यासाठी ऑनलाइन परीक्षेत यंदा 200 विद्यार्थ्यांना 50 टक्क्यांपर्यंत विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची 1 एप्रिल पासून अंमलबजावणी :
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची (एनएफएसए) अंमलबजावणी आणखी 10 राज्यांमध्ये येत्या 1 एप्रिलपासून केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली.
- तसेच यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची संख्या 21 होणार आहे.
- गुजरातमध्ये 1 एप्रिल पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दिनविशेष :
- 1896 : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे यांचा जन्म.
- 1898 : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
- 1932 : व.पु. काळे, मराठी साहित्यिक यांच्या जन्म.
- 1933 : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर यांचा जन्म.
- अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा