Current Affairs of 26 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 मार्च 2016)

चालू घडामोडी (26 मार्च 2016)

गोव्यात ‘डिफेक्‍स्पो’ प्रदर्शन :

  • भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतर्फे (डीआरडीओ) आयोजित प्रदर्शन दक्षिण गोव्यातील केंपे तालुक्‍यातील नाकेरी कितोल गावात होत असून त्यामध्ये संघटनेतर्फे विकसित वैशिष्ट्यपूर्ण लष्करी उपकरणे, तंत्रज्ञान व हत्यारे प्रदर्शित केली जाणार आहेत.
  • 28 ते 31 मार्च या काळात हे प्रदर्शन (डिफेक्‍स्पो) होणार आहे.
  • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर त्याचे उद्‌घाटन करतील आणि तिन्ही सेना दलांतील सर्व प्रमुख अधिकारी या प्रदर्शनाला भेट देतील.
  • ‘राइज ऑफ फ्युचरिझम’ किंवा ‘भविष्यवादी उदय’ ही यावेळेच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती कल्पना आहे.
  • पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ या बहुचर्चित घोषणेशी ही संकल्पना जोडण्यात आली आहे.
  • जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांची निर्मिती करुन भारतीय संरक्षण दलांना सुसज्ज करणे या उद्दिष्टावर यानिमित्ताने भर देण्यात येणार आहे.
  • या महाप्रदर्शनाच्या निमित्ताने ‘डीआरडीओ’ तर्फे त्यांच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण उत्पदानांचे प्रात्यक्षिकही केले जाणार आहे.
  • तसेच यामध्ये ‘एअरबोर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टिम’ (ऍवॅक्‍स), ‘तेजस’ या हलक्‍या लढाऊ विमानाचे प्रात्यक्षिक, ‘अर्जुन’ रणगाड्याच्या ‘एमके-2’ या अत्याधुनिक नमुन्याचे प्रात्यक्षिक, व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म, ‘आकाश’ हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र, पिनाका मल्टिबॅरल रॉकेट लॉंटर, नवीन रडार आदींचा समावेश असेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मार्च 2016)

इंटेलचे माजी सीईओ अँडी ग्रूव्ह यांचे निधन :

  • संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड’ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
  • नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी 1980 च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले.
  • इंटेलमध्ये 37 वर्षे कार्यरत असताना कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा होता.

नेपाळचा चीनसोबत इंधन करार :

  • इंधनाच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नेपाळने भारतावरील परावलंबित्व दूर करण्यासाठी चीनसमवेत विविध करार केले आहेत, त्यामुळे यापुढे भारताशिवाय चीनकडूनही नेपाळ इंधन खरेदी करू शकणार आहे.
  • नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नुकतीच बीजिंगला भेट दिली, त्यावेळी हे करार करण्यात आले.
  • भारत हा नेपाळला अनेक वर्षांपासून इंधनपुरवठा करणारा पारंपारिक निर्यातदार देश समजला जातो.
  • नेपाळच्या राज्यघटनेत अलिकडे काही बदल करण्यात आले आहेत.
  • नेपाळमध्ये तेलसाठ्याची गोदामे बांधणे, तिबेट रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून नेपाळपर्यंत रेल्वेजाळे उभारणे असे विविध करारांचा त्यामध्ये समावेश आहे.

इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपद :

  • नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले.
  • तसेच या स्पर्धेचे जोकोव्हिचचे हे तिसरे जेतेपद आहे.
  • अंतिम लढतीत जोकोव्हिचने खोलवर सर्व्हिससाठी प्रसिद्ध मिलास राओनिकचा 6-2, 6-0 असा पराभव केला.
  • व्हिक्टोरिया अझारेन्काने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला 6-4, 6-4 असे नमवले.
  • जेतेपदासह अझारेन्काने 2014 नंतर जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे.

जगातील 50 नेत्यांच्या यादीत केजरीवाल यांचा समावेश :

  • दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवाल यांचा ‘जगभरातील 50 महान नेत्यांच्या’ यादीत समावेश झाला आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध ‘फॉर्च्यून’ मॅगिझनच्या या यादीत स्थान मिळवणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय नेते आहेत.
  • दिल्ली सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दलही मॅगझिनने केजरीवालांचे कौतुक केले आहे.
  • दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात 15 दिवसांसाठी सम-विषम वाहतूक योजनेचा प्रयोग राबवला होता, जो यशस्वी ठरला.
  • तसेच येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा 15 दिवसांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
  • फॉर्च्युन मासिकाच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज हे अव्वल स्थानावर असून केजरीवाल 42 व्या स्थानावर आहेत.
  • तर जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल दुस-या स्थानावर, म्यानमारमधील नेत्या आँग सान सू की (3), अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली (22) आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडी  (48) यांचाही या यादीत समावेश आहे.

उत्तर कोरियाच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी :

  • उत्तर कोरियाने पुन्हा एकदा लघू पल्ल्याच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.
  • वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध झुगारून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जात आहे.
  • अमेरिकेने अनेक निर्बंध लादले असतानाही उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी लष्कराला क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
  • तसेच दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.
  • अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराचा संयुक्त सराव सुरू असून, त्याला उत्तर कोरियाचा आक्षेप आहे.

दिनविशेष :

  • 1972 : पहिली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद संपन्न झाली.
  • बांगलादेश स्वातंत्र्य दिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.