Current Affairs of 23 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 मार्च 2016)

चालू घडामोडी (23 मार्च 2016)

भाई वैद्य यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ :

  • पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे.
  • तसेच हा पुरस्कार त्यांना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत असल्याची माहिती ‘पुण्यभूषण फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.
  • एक लाख रुपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फळाने नांगरत असलेली प्रतिमा, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भाई वैद्य यांची निवड केली आहे.
  • मे महिन्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल, पुरस्काराचे यंदाचे 28 वे वर्ष आहे.
  • पुरस्काराबरोबर सहा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे.
  • सोशालिस्ट पार्टी (इंडिया) या पक्षासह भारत यात्रा ट्रस्ट दिल्ली, एस. एम. जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे मनपा सेवा निवृत्त संघ अशा संस्थांचे वैद्य हे अध्यक्ष आहेत.
  • वैद्य यांनी 1942 मध्ये शालेय जीवनात असताना चलेजाव चळवळीमध्ये भाग घेतला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मार्च 2016)

श्रीहरी अणे यांचा महाधिवक्‍तापदाचा राजीनामा :

  • मराठवाड्याच्या वेगळ्या राज्याला आपला पाठिंबा असेल, असे वादग्रस्त विधान केल्याने सरकारला अडचणीत आणणारे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी (दि.22) महाधिवक्‍तापदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दिला.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात अणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडी तयार झाली असतानच अणे पदावरून पायउतार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले.
  • सत्ताधारी आघाडीतील शिवसेना तसेच विरोधी बाकांवरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रसने एकत्रित आघाडी उभारली होती.
  • तसेच या पक्षांनी अणेंविरोधात प्रस्ताव देत मतदान केले असते, तर तो सरकारविरोधतला अविश्‍वास प्रस्ताव ठरला असता.
  • अप्रत्यक्षपणे सरकार अल्पमतात आल्याचे गृहीत धरून अर्थसंकल्पीय कामकाज पूर्ण होणे ही कठीण झाले असते.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 :

  • प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी)  नियम 2011 च्या जागी केंद्र सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अधिसूचित केला आहे.
  • प्लास्टिकच्या महाप्रचंड व अतिरिक्त वापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्लास्टिक कचराबंदीबाबतची ही नवी अधिसूचना जारी केली.
  • देशभरातील प्लास्टिक कचऱ्याला आळा घालण्याची जबाबदारी या प्लास्टिकचे उद्योजक व ग्रामपंचायतींपासून सर्वांवर लागू होईल.
  • तसेच यासाठी राबविल्या जाणाऱ्या व्यापक जनजागृती मोहिमेचे घोषवाक्य ‘प्लास्टिक नही कपडा सही’ हे असेल.
  • यानुसार प्लास्टिक पिशव्यांच्या किमान जाडीची 40 मायक्रॉन्सची मर्यादा वाढवून 50 मायक्रॉन्स करण्यात आली आहे.
  • तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम देशातील सहा लाख ग्रामपंचायतींनाही लागू होणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला या नियमांमुळे हातभार लागणार असून त्यामुळे स्वच्छतेच्या आघाडीवर लक्षणीय सुधारणा होईल.
  • केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल राज्यमंत्री प्रकाश जावडेकर हे आहेत.

ट्विटरला 10 वर्ष पूर्ण :

  • ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉरसे यांनी 21 मार्च 2006 रोजी पहिले ट्विट केले, त्यापाठोपाठ त्यांच्या टीमने ट्विटरवर जॅकला फॉलो केले.
  • तसेच आता 10 वर्षांनंतर ट्विटरने 32 कोटी वापरकर्त्यांपर्यंत मजल मारली आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेबाहेर 25 कोटी 40 लाख लोक ट्विटर वापरत आहेत,त्यातील भारतात केवळ 17 टक्‍के आहेत.
  • जगभरात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी आणि संशोधकांपर्यंत ट्विटर वापरकर्ते आहेत.
  • अगदी राजकीय कल मांडण्यापासून ते एखाद्या माहितीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ट्विटर हे हमखास माध्यम म्हणून पुढे आले आहे.
  • पण, ट्विटरला सोशल मीडियावरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे.
  • तसेच दोन्ही माध्यमांपाठोपाठ ट्विटर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विवेक प्रभू केळुस्करांच्या व्यंगचित्राला प्रथम पारितोषिक :

  • महाराष्ट्र सरकारच्या जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाइन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभू केळुस्कर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले आहे.
  • तसेच कपिल घोलप यांच्या व्यंगचित्राला दुसरेअनीश वाकडे यांच्या व्यंगचित्राला तिसरे पारितोषिक मिळाले आहे.
  • महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, जलप्रदूषण असे विषय देण्यात आले होते.
  • राज्यभरातून अक्षरश: शेकडो व्यंगचित्रकारांनी उत्कृष्ट व्यंगचित्रे पाठवली.

सूरत हे भारतातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक :

  • रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार भारतातील 16 झोनमधील एकूण 407 रेल्वे स्थानकांमध्ये सूरत हे भारतातील सर्वांत स्वच्छ स्थानक असून महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाला चौथा क्रमांक मिळाला आहे.
  • भारतीय रेल्वे आणि टीएनएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी देशभरातील 16 झोनमधील ‘ए-1’ आणि ‘ए’ श्रेणीतील एकूण 407 रेल्वे स्थानकांची पाहणी केली.
  • तसेच त्यापैकी 13 स्थानकांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशिष्ट श्रेणीत स्थान मिळविले तर 92 स्थानकांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून प्रथम श्रेणीत स्थान पटकावले.
  • या सर्व स्थानकांचा अभ्यास करताना प्राथमिक सोयीसुविधांसह वेगवेगळ्या 47 घटकांचा अभ्यास करण्यात आला.
  • तसेच प्रवाशांकडूनही  माहिती गोळा घेण्यात आली.
  • या सर्व स्थानकांमध्ये सूरत हे सर्वात स्वच्छ स्थानक असल्याचे आढळून आले आहे.
  • तर राजकोट आणि विलासपूर अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्वच्छ स्थानक ठरले आहे.
  • त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाचा क्रमांक लागला आहे.
  • यामध्ये महाराष्ट्रातील 4 स्थानकांना पहिल्या 75 मध्ये स्थान मिळाले.

जिल्हा विभाजन समितीला मे 2016 पर्यंत मुदतवाढ :

  • राज्यातील जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला मे, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्याचे सरकारने ठरवले आहे.
  • तसेच त्यामुळे या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नाशिक जिल्हा विभाजन आणि मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लेखी उत्तरात दिले.
  • राज्यातील नवीन जिल्ह्यांची व तालुक्यांची निर्मिती करण्याबाबतचा तारांकित प्रश्न अपूर्व हिरे यांनी विचारला होता.
  • प्रशासकीय सोयीसाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मालेगावसह नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे, असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता.
  • त्यावर जिल्हा विभाजनाबाबतचे निकष ठरवण्यासाठी अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला डिसेंबर 2015 पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.
  • मात्र, समितीला मे 2016 पर्यंत मुदतवाढ देण्याचा सरकारचा विचार आहे.
  • समितीचा अहवाल मिळाल्यानंतर निश्चित केलेल्या निकषानुसार नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्हानिर्मितीचा निर्णय घेण्यात येईल.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.