Current Affairs of 25 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (25 फेब्रुवारी 2017)

आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान :

 • ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथा संग्रहासाठी वर्ष 2016चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • 1 लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यामध्ये 8 काव्यसंग्रह, 7 लघुकथा संग्रह, 5 कादंबऱ्या, 2 समीक्षा, 1 निबंध यासह 1 नाटक यांचा समावेश आहे.
 • नवी दिल्ली येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमी 2016च्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
 • देशातील 24 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारांत सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांनाही या सोहळ्यात पुरस्कृत करण्यात आले.
 • आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ कथासंग्रहासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
 • ‘आलोक’ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली मांडली आहे. ग्रामीण भागातील जीवनशैलीमध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या प्रस्तुत केलेले आहे.

पूजा घाटकरला एअर रायफलमध्ये कांस्यपदक :

 • सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींवर मात करीत पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये 24 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकून दिले.
 • माजी आशियाई चॅम्पियन असलेल्या 28 वर्षांच्या पूजाने 228.8 गुणांसह कांस्य जिंकले.
 • चीनच्या मेंगयावो शी हिने 252.1 गुणांसह सुवर्ण जिंकून नवा विश्वविक्रम नोंदविला. तिची सहकारी डोंलिजी हिने 248.9 गुणांसह रौप्यपदक पटकविले.
 • मागच्यावर्षी रिओ ऑलिम्पिकचा कोटा मिळविण्यात थोड्या फरकाने वंचित राहिलेल्या पूजाने सुरुवातीला तांत्रिक चुका केल्या पण लगेच सावरत पहिल्या फेरीत ती दुसर्‍या स्थानावर राहिली.
 • अंतिम फेरीत लिजीकडून कडवे आव्हान मिळाल्यानंतरही फायनलदरम्यान पूजाच्या बंदूकचे ब्लार्इंडर पडले. तरीही अखेरचे काही शॉट तिने डोळे बंद करीत मारले. त्याआधी पात्रता फेरीत पूजाला 418 आणि मेंगयाओला 418.6 तर लिजीला 417.7 गुण मिळाले होते.

भारतीय क्रिकेटमध्ये आश्विनकडून गोलंदाजीचे नवे रेकॉर्ड :

 • भारतीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीचे नवनवे रेकॉर्ड आपल्या नावे करणा-या आर अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. 24 फेब्रुवारी रोजी आर अश्विनने जेव्हा मिशेल स्टार्कची विकेट घेतली तेव्हा त्याच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद झाली.
 • ऑस्ट्रेलियाविरोधात खेळत असताना दुस-या दिवशी घरच्या मैदानावर 10 वा कसोटी सामना खेळताना स्टार्कची विकेट 64 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यासोबतच आर अश्विनने भारताचे माजी कर्णधार आणि गोलंदाज कपिल देव यांचा रेकॉर्ड तोडला.
 • 1979-80 दरम्यान मायदेशात खेळताना कपिल देव यांनी 13 कसोटी सामन्यांमध्ये 63 विकेट्स घेतले होते.
  ऑस्ट्रेलियाविरोधात 23.22 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतले होते. या मालिकेत त्यांचा स्ट्राईक रेट 47.8 होता. यानंतर पाकिस्तानविरोधात खेळताना कपिल देव यांनी 17.68 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतले होते.

पंतप्रधानांच्या हस्ते कोईम्बतूरमध्ये महादेवाच्या मूर्तीचे अनावरण :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूरमध्ये 112 फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले आहे.
 • ईशा फाऊंडेशनने तमिळनाडूत शंकराच्या भव्य मूर्तीची निर्मिती केली आहे. महाशिवरात्री निमित्ताने पंतप्रधान मोदींनी शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले.
 • ईशा फाऊंडेशनकडून लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या मूर्ती उभारण्यात येणार आहेत.
 • भगवान शंकराच्या भव्यदिव्य मूर्तीचे अनावरण करताना पंतप्रधान मोदींनी योग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
 • “योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग करण्यामुळे जग एकत्र आले आहे. सध्या संपूर्ण जगाला शांततेची आवश्यकता आहे. जगाला युद्ध आणि वाद नको आहेत. सर्व जगाला यापासून मुक्तता हवी आहे. यामध्ये योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मात्र फक्त प्राचिन असल्याने योग नाकारणे योग्य होणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
 • कोईम्बतूरमधील शंकराची मूर्तीचे डिझाईन तयार करण्यात अडीच वर्षांचा कालावधी लागला आहे.
 • आठ महिन्यांमध्ये या मूर्तीची उभारणी करण्यात आली. भगवान शंकराचा चेहरा स्टिलच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन तब्बल 500 टन इतके आहे.

दिनविशेष :

 • 25 फेब्रुवारी 1988 रोजी संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.