Current Affairs of 24 February 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 फेब्रुवारी 2017)
जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात उभारणार :
- इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्या मिळून उभारणार असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बाभुळवाडी गावाची निवड निश्चित झाली आहे.
- मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा जामनगर, गुजरात येथील 33 लाख टन वार्षिक क्षमतेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना म्हणून गणला जातो.
- बाभुळवाडी प्रकल्पाची क्षमता याहून सुमारे दुप्पट म्हणजे वार्षिक 60 लाख टन एवढी असेल. या प्रकल्पासाठी सुमारे 1.5 लाख कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील.
- सर्व बाबींचा तौलनिक अभ्यास करून बाभुळवाडीची अंतिमत: निवड करण्यात आली. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणाऱ्या इंजिनीअर्स इंडिया लि.ने प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक अभ्यास व तयारी सुरू केली आहे.
Must Read (नक्की वाचा):
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड :
- बेल्जियमचा कर्णधार आणि ऑलिम्पिक पदकविजेता जॉन डोमेन तसेच नेदरलँड्स संघाची नाओमी वॉन एस यांना आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने 2016चे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित केले.
- हॉकीच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या सोहळ्यात सर्वोत्कृट खेळाडू, गोलकीपर, प्रतिभावान खेळाडू, कोचेस आणि पंचांचा गौरव करण्यात आला.
- भारताचा कर्णधार आणि गोलकीपर पी.आर. श्रीजेश हा गोलकीपरच्या तसेच हरमनप्रीतसिंग हा प्रतिभावान खेळाडूच्या शर्यतीत होता; पण दोघांनाही पुरस्कार जिंकण्यात अपयश आले.
- ब्रिटनची मॅडी हिच हिला महिला गटात सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. पुरुष गटात हा पुरस्कार आयर्लंडचा डेव्हिड हर्टे याने पटकविला.
- बेल्जियमचा आर्थर वॉन डोरेन याला सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. महिला गटात हा पुरस्कार अर्जेंटिनाची मारिया ग्रानाटो हिने जिंकला.
- सर्वोत्कृष्ट कोचचे दोन्ही गटांतील पुरस्कार ब्रिटन संघाला मिळाले. डॅनी केरी आणि कारेन ब्राऊन यांना हे पुरस्कार मिळाले.
- सर्वोत्कृष्ट पुरुष पंच जर्मनीचे ख्रिस्टियन ब्लाश हे तर पहिला पंच म्हणून बेल्जियमच्या लॉरिन डेन फोर्ज पुरस्काराचे मानकरी ठरले.
भारतात स्काइप लाइट सेवा सुरू होणार :
- मायक्रोसॉफ्ट भारतात स्काइप लाइट सेवेला आधार कार्डशी जोडणार आहे.
- स्काइप लाइट सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी केली आहे.
- मोदींच्या डिजिटल इंडियाच्या योजनेला चालना देण्यासाठीच सत्या नाडेला यांनी ही सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे.
- तसेच या कार्यक्रमात त्यांनी भारतातील कंपन्यांच्या फायद्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधेची माहिती दिली आहे.
- मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून लिंक्डइन लाईट हे व्हर्जनही भारतात सुरू करण्यात येणार असून, प्रोजेक्ट संगम हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे.
- भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस प्रगतिपथावर जात असून, स्टेट बँक ऑफ इंडियानंही क्लाऊड सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे.
भारतातील ‘आयटी’ क्षेत्रास युरोपचे निमंत्रण :
- अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाद्वारे एच वन बी व्हिसासंदर्भात कडक धोरण अवलंबिले जाण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सरकार चिंतीत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांना अधिक संख्येने सामावून घेण्याचे सकारात्मक संकेत युरोपिअन युनियनने दिले आहेत.
- जागतिक व्यापारासंदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या “प्रोटेक्शनिज्म” धोरणाचा अंगीकार केला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत इयुने यावेळी दिले.
- युरोपिअन संसदेमधील परराष्ट्र व्यवहार समितीचे शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आल्ले आहेत. यावेळी त्यांनी यासंदर्भातील इयुची भूमिका स्पष्ट केली.
- इयु व भारतामध्ये प्रस्तावित असलेला संवेदनशील “व्यापार व गुंतवणूक करार” हा मोठ्या काळासाठी प्रलंबित राहिला आहे. या करारासंदर्भात पुन्हा बोलणी सुरु करण्यास दोन्ही बाजुंना आलेल्या अपयशासंदर्भात इयुकडून यावेळी ‘चिंता’ व्यक्त करण्यात आली आहे.
- तसेच याचबरोबर, या करारामध्ये इयु व भारतामधील सध्याच्या व्यापाराची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची क्षमता असल्याचे सांगत शिष्टमंडळातर्फे यावेळी यासंदर्भातील चर्चा लवकर सुरु करण्याचे आवाहन भारतीय नेतृत्वास करण्यात आले. या करारावर 2013 नंतर चर्चा झालेली नाही.
- युरोप हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल कामगार असलेल्या भारतीयांना अधिक संख्येने सामावून घेण्यास तयार असल्याचे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेल्या डेव्हिड मॅकऍलिस्टर यांनी स्पष्ट केले.
दिनविशेष :
- 24 फेब्रुवारी हा मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन आहे.
- 24 फेब्रुवारी 1936 हा दिवस ‘क्षयरोग निवारण दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा