Current Affairs of 23 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2017)

अभय बंग यांना जनसेवा पुरस्कार जाहीर :

  • ‘श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट’च्यावतीने देण्यात येणारा ‘नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शोधग्राम संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांना जाहीर झाला आहे.
  • ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी या पुरस्करची घोषणा केली. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता येथील राजमती भवन येथे बंग यांना हा पुस्कार प्रदान केला जाणार आहे.
  • रुग्णांना मदत करणाऱ्या दानोळी (ता. शिरोळ) येथील सुकुमार पाटील यांना विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
  • रयत शिक्षण संस्था, साताऱ्याचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते प्रदान होणार आहे.
  • तसेच 21 हजार रुपये रोख व मानपत्र, सन्माचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश :

  • मागील पाच वर्षांमध्ये जगभरात शस्त्र व्यापारात मोठी वाढ झाली असून, प्रमुख शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.
  • स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • 2012 ते 2016 या कालावधीत झालेल्या शस्त्र आयातीमध्ये एकट्या भारताचा वाटा 13 टक्के होता.
  • भारतानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि अल्जेरिया या देशांचा क्रमांक लागतो.
  • चीन आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांबरोबर तणावाचे संबंध असल्याने भारतानेही आपली लष्करी ताकद वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.
  • चीनचा आक्रमकपणा वाढत असताना आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली असताना भारतालाही अमेरिकेबरोबरील संरक्षण संबंध अधिक मजबूत करणे महत्त्वाचे वाटले आहे.
  • शस्त्र आयात करण्यापेक्षा स्थानिक पातळीवरच “मेक इन इंडिया” अंतर्गत शस्त्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी लष्कराच्या गरजा तातडीने पुरविण्याची स्थानिक बाजारामध्ये तूर्त क्षमता नाही. त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रांच्या गरजांसाठी भारताला अजूनही आयातीवर भर द्यावा लागत आहे.

नासाकडुन पृथ्वीसारखे सात ग्रहांचा शोध :

  • पृथ्वीसारखी कोणताचा ग्रह नसल्याचा आपला भ्रम आता दूर झाला आहे. पृथ्वीसारखेच सात ग्रह त्यांच्या सूर्याभोवती फिरत असल्याचा शोध अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने लावला आहे.
  • विशेष म्हणजे या ग्रहांवर पाणी आहे आणि म्हणजेच, जीवसृष्टीही असण्याची दाट शक्यता आहे.
  • नासाने अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या ग्रहांवर पोहोचण्यासाठी 40 प्रकाशवर्ष लागतील, असेही नासाने म्हटले आहे.
  • स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे नासाने हा शोध लावला असून, सूर्यमालेबाहेर एकाच वेळी एवढ्या संख्येने ग्रह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • आपल्याला दिसणाऱ्या सूर्याएवढ्याच आकाराच्या दुसऱ्या सूर्याभोवती हे सात ग्रह फिरतात. त्यावर पाणी आहे. एवढच नाही, सातपैकी तीन ग्रहांवर पाणी असण्याची खात्री, नासाला आहे. सूर्यमालेबाहेर असल्याने या ग्रहांना एक्सोप्लॅनेट्स असे नाव म्हटले गेले आहे.

अंतराळवीरांसाठी आरामदायी स्पेससूटचे जनक :

  • अंतराळवीरांना जास्तीत जास्त आरामदायक आणि सर्वसुविधा असलेले स्पेससूट उपलब्ध व्हावेत यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने स्पर्धा आयोजित केली होती.
  • डॉ. थॅचर कॉर्डन यांनी तयार केलेला आरामदायी स्पेससूट या स्पर्धेत अव्वल ठरला असून त्यासाठी त्यांना 10 लाखांचे बक्षिस देण्यात आले.
  • अंतराळयानामध्ये प्रवास करताना वैज्ञानिकांसमोर सर्वात महत्वाचे आव्हान असते ते म्हणजे मलमूत्र विसर्जनाचे. त्यासाठी वैज्ञानिकांना 12-12 तास थांबावे लागे किंवा डायपरचा वापर करावा लागे.
  • तसेच कधीकधी उपाशीही राहावं लागत असे. पण डॉ. थॅचर कॉर्डननी केलेल्या सूटमुळे यामधील ब-याचशा कटकटी कमी झाल्या आहेत.
  • डॉ. कॉर्डन हे 49 वर्षिय फिजिशियन असून ते टेक्ससमध्ये राहतात. अमेरिकन वायूदलासाठी ते डॉक्टर म्हणून काम करतात.

दिनविशेष :

  • जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअरचा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1564 मध्ये झाला.
  • 23 फेब्रुवारी 1876 हा आधुनिक काळातील एक महान संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.