Current Affairs of 22 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (22 फेब्रुवारी 2017)

चंद्रशेखरन टाटा उद्योग समूहाचे नवे चेअरमन :

 • टाटा उद्योग समूहाचे नवे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी 21 फेब्रुवारी रोजी कार्यभार स्वीकारला.
 • टाटा समूह कोणाचेही अनुयायित्व पत्करणार नाही, सर्व व्यावसायिक क्षेत्रात नेतृत्वच करेल, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
 • 53 वर्षीय चंद्रशेखरन यांनी 79 वर्षीय रतन टाटा यांची जागा घेतली आहे. गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी तत्कालिन चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून हाकलण्यात आले होते. रतन टाटा यांनी चेअरमनपदाचा हंगामी कार्यभार स्वीकारला होता.
 • टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या ‘बॉम्बे हाऊस’च्या बाहेर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, आम्ही सर्व जण मिळून व्यवसायाच्या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यास काम करू. आम्ही कोणाचेही अनुकरण करणार नाही. आम्ही नेतृत्व करू. मीठापासून सॉफ्टवेअरपर्यंत विविध व्यवसायात असलेला टाटा उद्योग समूह 103 अब्ज डॉलरचा आहे.

आशियाई हॉकी महासंघाच्या उपाध्यक्षपदी सरकार यांची निवड :

 • भारताच्या अभिजित सरकार यांची आशियाई हॉकी महासंघाने (एएचएफ) उपाध्यक्षपदी निवड केली.
 • तसेच त्याप्रमाणे, एएचएफने आर्थिक आणि टीव्ही समितीच्या प्रमुखपदीही सरकार यांची नेमणूक केली आहे. 2004 सालापासून सरकार सहारा परिवाराशी जोडले गेले आहेत.
 • 7 फेब्रुवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या आधारे सरकार यांची निवड झाली आहे.
 • गेल्या काही काळापासून सरकार भारतीय हॉकीच्या प्रगतीमध्ये जोडले गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये सहारा इंडियाने हॉकी इंडिया लीगमध्ये उत्तर प्रदेश विजार्ड संघाला खरेदी केले होते.

एचआर मॅकमास्टर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार :

 • अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी लेफ्टनंट जनरल एचआर मॅकमास्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • रशियन राजदूताशी संपर्क केल्याची टीका झाल्याने ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांना पदावरून हटविण्यात आले होते.
 • ट्रम्प यांच्या प्रशासनात एक महिन्यापूर्वीच फ्लिन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना ट्रम्प यांचा विश्‍वासू साथीदार मानण्यात येत होते.
 • दरम्यान रशियन राजदूतांसोबत असलेल्या संबंधांबाबत पूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे सांगत फ्लिन यांनी राजीनामा दिला होता.
 • नव्याने नियुक्त होत असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टर यांनी लष्कराचा इतिहास या विषयावर डॉक्‍टरेट मिळविली आहे.
 • व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेचा सहभाग होता हा समज खोटा ठरविणाऱ्या “डिरीलिक्‍शन ऑफ ड्युटी” या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे.
 • अमेरिकेच्या सल्लागारपदासाठीच्या स्पर्धेत मॅकमास्टर यांचे कोठेही नाव नव्हते.

रिझर्व्ह बँकेकडून हजारची नवी नोट चलनात येणार :

 • हजार रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची योजना रिझर्व्ह बँकेने आखली आहे. या नोटेचा मुहूर्त ठरला नसला तरी ती लवकरच आणली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
 • केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली.
 • लगोलग पाचशे रुपयांची नवी नोटही आणण्यात आली. एक हजार रुपयांची नोट आणण्याबाबत मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या; मात्र आता ही नोट आणण्यात येत आहे.
 • सरकारी सूत्रांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने हजारांच्या नव्या नोटेची छपाई यापूर्वीच सुरू केली आहे.
 • वास्तविक जानेवारी महिन्यातच ही नोट चलनात आणण्याची सरकारची योजना होती. तथापि, त्यावेळी पाचशेच्या नोटांची मागणी बाजारात जास्त होती. त्यामुळे हजारांच्या नोटा छापण्याऐवजी पाचशेच्या नोटा छापण्यास सरकारने प्राधान्य दिले.
 • आता हजारांच्या नोटांची छपाई सुरू झाली आहे. तथापि, या नोटा नेमक्या केव्हा बाजारात आणणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

दिनविशेष :

 • रत्नागिरीतील ‘पतित पावन’ मंदिरांची स्थापना 22 फेब्रुवारी 1857 मध्ये झाली.
 • 22 फेब्रुवारी 1954 रोजी पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.