Current Affairs of 27 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2017)

ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युअर अॅवॉर्ड :

 • लंडन मराठी संमेलन 2017 (LMS 2017) हे सर्व दूर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना एकत्र आणण्याचा एक मोठ्ठा पुढाकार आहे.
 • महाराष्ट्र मंडळ लंडनच्या 85व्या वर्धापन वर्षाच्या निमित्ताने साजरा होणारा लंडन मराठी संमेलन हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि मराठी बाण्याचा एक अद्भुत आविष्कार असणार आहे.
 • पहिले जागतिक मराठी उद्योजकांचे अधिवेशन हे 3 जून ला होणार आहे. दुबई, अमेरिका, UK, भारत आणि इतर देशातून अधिवेशनासाठी उद्योजक येतील. 3 आणि 4 जूनला एक मोठा सांस्कृतिक सोहळा आयोजित केला आहे, ज्यामध्ये युके, यूरोप आणि इतर देशातून जवळ जवळ 1300 नागरिक अपेक्षित आहेत.
 • उद्योजक म्हंटले की, जोखीम पत्करून आपल्यात असलेल्या आत्मविश्वासाने, कठीण परिश्रमाने आणि स्वबळावर एक विश्वच निर्माण करतात.
 • विश्वस्तरावरील वेग वेगळ्या उद्योगात जम बसविलेल्या महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे.
 • UK मधील उद्योजकांना वाव मिळावा, मदत व्हावी, प्रोत्साहन मिळावे, उद्योग वाढविण्यासाठी संधी मिळाव्यात म्हणून 10 एप्रिल 2016 ला Overseas Maharashtrians Professionals and Entrepreneurs Group (OMPEG) नावाच्या संस्थेची मुहूर्तमेढ झाली. हि स्पर्धा OMPEG आणि LMS या संस्था मिळून घेत आहेत.
 • तसेच यानिमित्त ‘ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युअर अॅवॉर्ड’चे वितरण करण्यात येणार आहे.

अतुल आंब्रे ठरला यंदाचा ‘मुंबई श्री’चा मानकरी :

 • आर्थिक कमजोरीमुळे दोन वर्षांपासून शरीरसौष्ठवपासून दूर राहिलेल्या डोंबिवलीच्या अतुल आंब्रेने केवळ 5 महिन्यांमध्ये कठोर परिश्रम करून पीळदार शरीर कमावले आणि थेट प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’किताबावर कब्जा केला.
 • 25 फेब्रुवारी रोजी अंधेरी लोखंडवाला परिसरामध्ये झालेल्या या भव्यदिव्य स्पर्धेत अतुलचाच बोलबाला राहिला. निवृत्त सैनिकाचा पुत्र असलेल्या अतुलने कठोर परिश्रम आणि ऐनवेळी मिळालेली आर्थिक मदत या जोरावर बाजी मारली.
 • अतुलने याआधी ज्युनिअर स्पर्धेतून दिमाखात पदार्पण करत शरीरसौष्ठव स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती.
 • 2015 साली त्याने पदार्पणातच ‘ज्यु. मुंबई श्री’, ‘ज्यु. महाराष्ट्र श्री’ आणि ‘ज्यु. मिस्टर इंडिया’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धांत बाजी मारली. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला नाइलाजाने दोन वर्षे या खेळापासून दूर राहावे लागले.

शाहरूख खानला चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान :

 • राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांना चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10 लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • टी. सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या वेळी राज्यपाल म्हणाले की, शाहरूख खान फक्त त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय नाहीत, तर त्यांच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तणुकीमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात.
 • शाहरूख खान यांच्यामध्ये भारताचे व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते. यश चोप्रा यांनी शाहरूख खान यांच्यातील क्षमता खूप आधी ओळखली. शाहरूख खान यांच्या करिअरला आकार देण्याचे श्रेय यश चोप्रा यांना जाते.
 • सर्वोच्च स्थानावर फार काळ टिकून राहणे अवघड गोष्ट असते, मात्र शाहरूख खान यांचा बॉलीवूडवर 25 वर्षांहून अधिक काळ दबदबा राहिलेला आहे.

भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघातर्फे दोन नव्या राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा :

 • गेल्या काही वर्षांत 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि भालाफेक क्रीडा प्रकारात भारतीयांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार प्रगती केली आहे. याच कामगिरीकडे पाहून भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय) या दोन खेळांच्या नव्या राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा केली.
 • महासंघाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. ‘सध्या अशा क्रीडा प्रकारांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यामध्ये भारतीयांची प्रगती चमकदार आहे,’ असे मत एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केले.
 • सुमारिवाला पुढे म्हणाले, की “भारतीय धावपटू सातत्याने 400 मी. आणि 400 मी. रिले स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. त्याचबरोबर देशाच्या भालाफेकपटूंनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे.”

दिनविशेष :

 • बंगालमधील वैष्णव संतपंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म 27 फेब्रुवारी 1485 मध्ये झाला.
 • 27 फेब्रुवारी 1912 हा मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि.वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’यांचा जन्मदिन असून, हा दिवस “मराठी भाषा दिवस” मराठी भाषा दिवस शुभेच्छापत्रे म्हणून साजरा केला जातो.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.