Current Affairs of 25 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (25 फेब्रुवारी 2016)

सानिया-हिंगीसचा सलग 41 वा विजय :

  • भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने तिची साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने डब्लूटीए कतार ओपनमध्ये चीनच्या यी फानशू आणि सेसेई झेंगला तीन सेटमध्ये पराभूत केले.
  • तसेच या सामन्यातील विजय हा या जोडीचा सलग 41 वा विजय आहे.
  • अग्रमानांकित सानिया आणि हिंगीसने एक तास 24 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-4, 4-6, 10-4 असा विजय मिळविला आणि स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
  • दोघींनी या वर्षात चार स्पर्धेत विजय मिळवला आहे, त्यासोबतच त्यांनी एकूण 13 स्पर्धांमध्ये विजय मिळवला.
  • दोघींनी ब्रिस्बेन, सिडनी, ऑस्ट्रेलिया ओपन, सेंट पीटस्बर्ग या स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता.

तटरक्षक दलाचे प्रमुख राजेंद्रसिंह :

  • तटरक्षक दलाचे नवे महासंचालक म्हणून राजेंद्रसिंह यांची नियुक्ती (दि.24) जाहीर करण्यात आली.
  • परंपरेनुसार नौदल अधिकारी या दलाचे महासंचालक होतात; पण राजेंद्रसिंह यांच्या नियुक्तीमुळे प्रथमच या दलाच्या महासंचालकपदी सागरी सुरक्षा दलातील अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने राजेंद्रसिंह यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नियुक्तीचा आदेश जारी केला.
  • राजेंद्रसिंह सध्या तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत.
  • व्हाइस ऍडमिरल एच. सी. एस. बिश्‍त यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्टार्ट अप कंपन्यांना कर सूट :

  • देशामध्ये सध्या स्टार्ट अप कंपन्यांचा जोर वाढत असून या उद्योगांना बळकटी देण्यासाठी विविध प्रकारच्या करामध्ये सूट देण्याचे नवी योजना ‘इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन’ने जाहीर केली आहे.
  • तसेच या घोषणेनुसार, ज्या कंपन्यांची कमाल वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपयांपर्यंत आहे, अशा कंपन्यांना त्यांची कंपनी म्हणून नोंद झाल्यापासून पहिली पाच वर्ष करामध्ये सूट देण्यात येणार आहे.
  • स्टार्ट अप कंपन्यांना बळकटी देण्यासाठी ही आजवरची सर्वात मोठी घोषणा मानली आहे.
  • केंद्र सरकारच्या ‘इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन’ने स्टार्ट अप उद्योग म्हणून नेमकी कोणाची गणना होईल, त्यांचे स्वरूप आणि त्यांना करामध्ये मिळणारी सूट यासंदर्भात नेमक्या निकषांची घोषणा केली आहे.

रेल्वेचे अनारक्षित तिकीट तीन तासांसाठीच :

  • ज्या प्रवाशांनी 199 किलोमीटर वा त्याहून कमी अंतरासाठी अनारक्षित तिकीट काढले असेल, ते यापुढे तीन तासांनंतर आपोआप रद्द ठरेल, असा नियम रेल्वेने केला आहे.
  • हा नियम 1 मार्चपासून अमलात येणार आहे, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी (दि.24) लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
  • प्रवाशांनी अनारक्षित तिकीट काढल्यापासून तीन तासांच्या आत प्रवास सुरू करणे या नियमानुसार बंधनकारक करण्यात येणार आहे.
  • तिकीट काढल्यानंतर लगेच जी गाडी निघणार असेल, त्या गाडीने वा तीन तासांच्या आत संबंधित ठिकाणी पोहोचणाऱ्या गाडीने प्रवाशांनी प्रवास करावा असा त्याचा अर्थ आहे.
  • मात्र 199 किलोमीटरहून अधिक अंतरासाठी हा नियम लागू नसेल, असेही रेल्वे राज्यमंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.

शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन एप्रिलमध्ये :

  • मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतराराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यास (दि.24) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली.
  • तसेच हे कंत्राट फ्रान्सच्या आयजीस कंपनीला देण्यात आले आहे.
  • या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम सन 2018 पर्यंत पूर्ण करायचे असून त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून 20 एप्रिल ते 5 मे या दरम्यानची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिका जिंकली :

  • भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकताना निर्णायक आघाडी घेतली आहे.
  • श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 107 धावा केल्या.
  • भारताकडून एकता बिष्टने 22 धावांत आणि पूनम यादवने 17 धावांत प्रत्येकी 3 गडी बाद केले.
  • प्रत्युत्तरात भारताने विजयी लक्ष्य 19 व्या षटकात पूर्ण केले.
  • भारताकडून कर्णधार मिताली राजने 52 चेंडूंत 51 धावांची नाबाद खेळी केली.

आशियाई करंडक ट्‌वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात :

  • आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर 45 धावांनी विजय मिळवला.
  • भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या धडाकेबाज 83 धावा आणि हार्दिक पांड्याच्या झटपट 31 धावांच्या बळावर बांगलादेशसमोर विजयासाठी 167 धावांचे आव्हान ठेवले होते.
  • भारतातीय गोंलदाजापुढे बांगलादेश संघाला 20 षटकात 7 गड्याच्या मोबदल्यात 121 धावाच बनवता आल्या.
  • भारतार्फे अनुभवी नेहराने बांगलादेशच्या 3 फलंदाजाला बाद केले तर बुमरा, अश्विन आणि पांड्याने एका फलंदाजाला बाद केले.
  • आशिया चषकातील पहिला सामना जिंकून भारताने आपली सुरवात विजयाने केली आहे.
  • 27 तारखेस भारताला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करावयाचा आहे.

भारत बांगलादेशात उभारणार वीज प्रकल्प :

  • भारत बांगलादेशमध्ये 1.6 अब्ज डॉलरचा वीज प्रकल्प उभारणार आहे.
  • तसेच या प्रकल्पासाठी अनेक वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. त्यांना अंतिम रूप मिळाले असून सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) 1,320 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प दक्षिण बांगलादेशातील खुलना येथे उभारणार आहे.
  • या करारावर येत्या 28 फेब्रुवारी रोजी उभय देश स्वाक्षऱ्या करतील, असे नवी दिल्ली आणि ढाक्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • या प्रकल्पासाठी भारताची चीनसोबत अत्यंत कडवी अशी व्यावसायिक स्पर्धा होती.
  • चीनने नुकतेच श्रीलंकेत विकासाचे प्रकल्प सुरू करण्यात यश मिळविले असताना बांगलादेशात भारताला प्रवेश मिळाला आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.