Current Affairs of 26 February 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 फेब्रुवारी 2016)
‘पीएफ’ची रक्कम 58 वर्षांनंतर :
- निवृत्तीपूर्वी नोकरी सोडणाऱ्या अथवा कामावरून काढून टाकल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला जमा झालेल्या भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) शंभर टक्के रक्कम काढण्याचा असलेला अधिकार संपुष्टात आला आहे.
- मध्येच नोकरी सोडल्यास वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम त्या कर्मचाऱ्यांना काढता येणार आहे, परंतु रक्कम हवी असल्यास ती संपूर्ण न मिळता कर्मचाऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची (म्हणजे एकूण जमा रकमेच्या पन्नास टक्केच) रक्कम येथून पुढे मिळणार आहे.
- केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या 1952 च्या कायद्यातील तरतुदींमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
- देशभरात हा बदल (दि.25) लागू करण्यात आला आहे, त्यामुळे देशातील सुमारे 11 कोटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढण्यावर मर्यादा येणार आहे.
- शासकीय, निमशासकीय अथवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा 12 टक्के ‘पीएफ’ रक्कम कापून घेतली जाते.
- तसेच तेवढीच रक्कम कंपनीकडून संबंधित कर्मचाऱ्याच्या ‘पीएफ’ खात्यात जमा केली जाते.
Must Read (नक्की वाचा):
एम. वेंकय्या नायडू समिती जाट आरक्षणासाठी :
- जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला सर्वंकष अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.
- राजनाथसिंग यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत हरियाणातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.
- गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीला जाट नेते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त हे उपस्थित होते.
- जाट आंदोलनामुळे व्यापार, वाहतूक ठप्प पडल्याने उद्योगजगताचे अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा असोचॅम या उद्योग आणि वाणिज्य संघटनेने केला आहे.
- बस, खासगी वाहने, रेल्वेस्थानक, पोलीस ठाणे, मॉल आणि अनेक हॉटेलची जाळपोळ करण्यात आल्यामुळे सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे या संघटनेने नमूद केले आले.
आर-अर्बन मिशनचा प्रारंभ :
- गावांना आधुनिक सुविधांच्या माध्यमातून जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आर-अर्बन मिशन’ला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे 22 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला.
- या माध्यमातून 300 गावांचा शहरांच्या धर्तीवर विकास केला जाणार असून, 2022 पर्यंत गरिबांसाठी पाच कोटी घरे बांधली जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.
- पंतप्रधानांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेचीही घोषणा केली, आजही पाच कोटी लोकांकडे स्वत:चे घर नाही.
- पैसे आणि जमीन नसल्याने त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही; पण प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
पाकिस्तानातील 254 मदरसे बंद :
- दहशतवादी कारवायांशी लागेबांधे असलेल्या शाळांवरील कारवाईचा भाग म्हणून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी देशभरातील संशयित आणि नोंदणी न झालेले असे 254 मदरसे बंद केले आहेत.
- सिंध प्रांतातील 167, खैबर पख्तुन्ख्वातील 13 व पंजाबमधील 2 संशयित मदरसे, तसेच सिंधमधील नोंदणी न करण्यात आलेले 72 मदरसे बंद करण्यात आले असल्याचे अंतर्गत विभागाचे राज्यमंत्री बलिगुर रहमान यांनी नॅशनल असेंब्लीला सांगितले.
- दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या राष्ट्रीय कृती कार्यक्रमांतर्गत वांशिक हिंसाचार नियंत्रणात आणण्याकरता सरकार करत असलेले प्रयत्न, त्यांची अंमलबजावणी आणि 16 फेब्रुवारीपर्यंत या मोहिमेचे निष्पन्न याबद्दल असल्याची माहिती रहमान यांनी दिली.
रेल्वे अर्थसंकल्प जाहीर :
- रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला 4768 कोटी रुपयांचा निधी आला आहे.
- तसेच गेल्या अनेक वर्षांत राज्याला रेल्वे अर्थसंकल्पात मिळालेला हा सर्वाधिक निधी आहे.
- राज्यात सात नवीन सर्वेक्षणे, अकरा नवीन मार्गांचे काम व सहा विद्युतीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
- राज्यात एकतीस रोड ओव्हर ब्रीज व पस्तीस रोड अंडर ब्रीज बांधण्यात येणार आहेत.
- रेल्वे अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
- सर्व मुख्य स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरा
- फक्त मालवाहतुकीसाठी कॉरिडॉर तयार करणार
- जयगड, दिघी, रेवास आणि पॅरादिप येथील बंदरे रेल्वेने जोडण्याचे काम सुरू
- ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत इंजिन तयार करण्याच्या कारखान्यांचे दोन प्रस्ताव मान्य.
- रेल्वेगाड्यांची निर्मिती तीस टक्क्यांनी वाढविणार
- ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर बारकोडेड तिकीट, परकी डेबिट कार्डवर ई-तिकीट
- 139 या हेल्पलाइनचा वापर करून तिकीट रद्द करणे शक्य
- रेल्वे स्थानकांची क्षमता वाढविणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 टक्के आणि महिलांसाठी 33 टक्के आरक्षण कोटा
- दोन हजार किमीच्या लोहमार्गांचे विद्युतीकरण करणे
- खड्गपूर-विजयवाडा मालवाहतूक मार्ग
- दिल्ली-चेन्नई मालवाहतूक मार्ग
- मुंबई-खड्गपूर मालवाहतूक मार्ग
- राज्य सरकारबरोबर संयुक्त प्रकल्प राबविणार, एकूण 23 करार मंजूर
- सारथी सेवा : वृद्ध आणि अपंग नागरिकांच्या मदतीसाठी कोकण रेल्वेमध्ये सशुल्क सहायक सेवा
- प्रवास विमा : प्रवाशांची इच्छा असल्यास प्रवासाचा विमा उतरविण्याची सोय
- जननी सेवा : लहान मुलांना लागणारे खाद्यपदार्थ, गरम दूध, गरम पाणी अशी सुविधा देणार
- जीपीएसद्वारे रेल्वे प्रवासादरम्यान स्थानकांची अद्ययावत माहिती
- सहायक : हमालांना सहायक असे नवे संबोधन. नवा गणवेश, प्रशिक्षण देणार
- अतिवेगवान गाड्या : जपानच्या मदतीने अहमदाबाद-मुंबई अतिवेगवान लोहमार्ग
- रेडिओ : रेल्वेमध्ये एफएम सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न, सर्व प्रादेशिक भाषांमधून कार्यक्रम
- चेन्नईमध्ये देशातील पहिले ‘रेल ऑटो हब’ स्थापन करणार
- रेल्वे सेवा सुधारण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला असून, त्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे.
गोल्डन बेअर पारितोषिक ‘फायर अॅट सी’ला :
- युरोपमधील निर्वासितांच्या समस्येचे भीषण चित्रण असलेल्या ‘फायर अॅट सी’ या माहितीपटाने बर्लिन चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर हे सर्वोच्च पारितोषिक पटकावले आहे.
- गेल्या दोन दशकांपासून युरोपात स्थलांतराच्या प्रयत्नात भूमध्य महासागरातील लॅम्पेडुसा या बेटावर आलेल्या हजारो लोकांच्या जीवनाचे चित्रण इटलीचे चित्रपट दिग्दर्शक गियानफ्रँको रोसी यांनी या माहितीपटात केले आहे.
दिनविशेष :
- 1976 – मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा