Current Affairs of 24 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (24 फेब्रुवारी 2016)

जगातील सर्वांत सुंदर शहर :

 • डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे जगातील सर्वांत सुंदर शहर ठरले आहे.
 • तसेच या शहरातील उच्च प्रतीचे राहणीमान सर्व जगात चांगले असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
 • मर्सर या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून विविध कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी जगातील 230 शहरांचा अभ्यास केला.
 • तसेच यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले.
 • व्हिएन्ना शहराची लोकसंख्या 17 लाख असून, शहरात असलेली विविध संग्रहालये, रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद हे नागरिक घेत असतात.
 • इतर पाश्‍चात्य देशांतील शहरांची तुलना करता येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच स्वस्त आहे.
 • एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र असलेले बगदाद दहशतवादाने होरपळल्याने या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.

भारतीय कलाकाराला फ्रान्सचा नाइटहूड सन्मान :

 • आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या कलाकाराला फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे.
 • दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल महंमद यांचा फ्रेंच राजदूताने ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर’ हा किताब दिला.
 • फ्रान्सने केलेल्या सन्मानाबद्दल इस्माईल यांनी आभार मानले असून, कलेची राजधानी समजल्या जाणाऱ्या पॅरिसनेच हा गौरव केल्याची भावना व्यक्त केली आहे.
 • फ्रान्स सरकारकडून 1957 पासून हा किताब दिला जात आहे.
 • कला आणि साहित्याद्वारे फ्रान्सच्या संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या कलाकारांना हा किताब दिला जातो.
 • अनेक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करत असलेल्या इस्माईल महंमद यांना आधीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ते नाट्यलेखकही आहेत.

मुद्रण कलेला 975 वर्षे पूर्ण झाली :

 • मुद्रण कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन 24 फेब्रुवारीला झाला.
 • हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध लागला.
 • तसेच त्यानंतर आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रचंड गतीने प्रगती मुद्रण कला आणि पद्धती यामध्ये झाली आहे.
 • चीनमध्ये इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा यांचा समावेश होता.
 • मुद्रण प्रतिमा कोरून तयार केलेल्या पृष्ठांची असे, बौद्ध धर्मातील काही विचार, मजकूर म्हणून संगमरवरी दगडी खांबावर कोरून ठेवलेले असत.
 • जेव्हा यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत.
 • तसेच यातूनच चीनमध्ये मुद्रण प्रतिमेद्वारे मुद्रणाचे तंत्र सापडले.
 • सहाव्या शतकानंतर या संगमरवरी दगडाच्या जागी लाकूड आले. 1954 मध्ये तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात एकूण 10 मुद्रणालये होती.
 • 1870 मध्ये अलिबागमध्ये ‘सत्यसदन’ नावाचा पहिला छापखाना सुरू झाला. त्यात शिलामुद्रण पद्धतीची कामे होत असत.
 • 1880 नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाईप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले.

पहिली आण्विक पाणबुडी सज्ज :

 • अणु इंधनावर चालणारी आणि अण्वस्त्रधारी अशी भारतात बांधलेली पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ नौदलात कामगिरीसाठी सज्ज झाली आहे.
 • सर्व कठोर चाचण्या ‘आयएनएस अरिहंत’ ने अलीकडेच यशस्वीपणे पूर्ण केल्या असून नौदलात दाखल करण्याबाबत सरकारी पातळीवरील निर्णय होताच ती नौदल ताफ्यात सामील होईल.
 • विशाखापट्टणम येथील नौदल जहाजबांधणी गोदीत ‘आयएनएस अरिहंत’ ची बांधणी केली गेली व गेल्या पाच महिन्यांपासून रशियाच्या मदतीने तेथेच तिच्या खोल सागरी सफरीच्या चाचण्या सुरू होत्या.
 • ‘एसएसबीएन’ या तांत्रिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘अरिहंत’ च्या वर्गातील एकूण पाच आण्विक पाणबुड्या बांधण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
 • सध्या भारतीय नौदलात ‘अकुला’ वर्गातील ‘आयएनएस चक्र’ ही एकमेव आण्विक पाणबुडी कार्यरत आहे, ती रशियाकडून काही काळासाठी भाड्याने घेण्यात आली आहे.
 • म्हणूनच ‘आयएनएस अरिहंत’ ही नौदलात दाखल होणारी भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी असेल.
 • याच वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांचे काम सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे, या पाणबुड्या ‘अरिहंत’ हून अधिक मोठ्या व अत्याधुनिक असतील.

सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद :

 • जगामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद पाकिस्तानमध्ये सुरू झाली.   
 • पाकिस्तानमधील संसद ही पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते.
 • सौरऊर्जेसाठी चीनने साडेपाच कोटी डॉलर एवढा निधी दिला आहे.
 • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हस्ते (दि.24) सौरऊर्जेचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले.
 • राजधानी इस्लामाबादमधील संसद सौरऊर्जेवर चालविणार असल्याची घोषणा सन 2014 मध्ये करण्यात आली होती.  
 • पाकिस्तानची संसद (दि.24) पूर्णपणे सौरऊर्जेवर चालू लागली आहे.

सागरी पातळीत जास्त वाढ :

 • गेल्या शतकभरात सागरी जलपातळी गेल्या 27 शतकांपेक्षा जास्त वेगाने वाढली असून ते प्रमाण 14 सेंटिमीटर आहे.
 • जागतिक तापमानवाढीमुळे ही सागरीपातळी वाढली असून ते धोकादायक आहे, असे संशोधन अहवालात म्हटले आहे.
 • सागरी जलाची पातळी इ. स. 1900 ते इ. स. 2000 या काळात 14 सेंटिमीटर किंवा 5.5 इंचांनी वाढली आहे.
 • जागतिक तापमानवाढ झाली नसती तर हे प्रमाण विसाव्या शतकात सागरी जलपातळी वाढीतील प्रमाण निम्म्याहून कमी राहिले असते.
 • रूटगर्सच्या पृथ्वी व ग्रहीय विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक रॉबर्ट कॉप यांनी सांगितले की, विसाव्या शतकात सागरी जलपातळीत फार मोठी वाढ झाली आहे, ती तीन सहस्रकांपेक्षा जास्त आहे.
 • गेल्या दोन दशकात सागरी जलपातळीतील वाढ सर्वाधिक नोंदली गेली आहे.  
 • प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षांत सागरी जलपातळी मोजण्याची सांख्यिकी पद्धत तयार करण्यात आली ती हार्वर्ड विद्यापीठाचे कार्लिग हे, एरिक मॉरो व जेरी मिट्रोव्हिका यांनी विकसित केली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला :

 • विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या नऊ मार्चपासून सुरू होणार असून, 18 मार्च 2016 रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात येणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी (दि.23) दिली.
 • विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातील तात्पुरते कामकाज ठरविण्यासाठी (दि.23) विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळात झाली.
 • तसेच या बैठकीत 9 मार्च ते 17 एप्रिलदरम्यान अधिवेशनाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.