Current Affairs of 23 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2016)

राज्य सरकारचा कालबाह्य कायदे रद्द करण्याचा निर्णय :

 • स्वातंत्र्यपूर्व काळात अमलात आलेले आणि आता कालबाह्य ठरलेले कायदे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 • तसेच त्या अनुषंगाने राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र कोडअंतर्गत सध्या वापरात नसलेल्या सुमारे 170 कायद्यांची यादी बनवली आहे.
 • याविषयी संबंधित विभागांचे अभिप्राय घेऊन हा प्रस्ताव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मांडण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
 • राज्य विधी आयोगाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्र कोडमधील वापरात नसलेले जुने कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 • महाराष्ट्र कोडमधील 370 कायद्यांचा विधी व न्याय विभागातील विशेष समितीने वर्षभर अभ्यास केला.
 • तसेच यापूर्वी 1983 मध्ये काही निरुपयोगी कायदे रद्द करण्यात आले होते.
 • राज्यात ‘ऍडव्होकेट ऍक्‍ट 1961’ अस्तित्वात आल्यानंतर ‘प्लीडर्स ऍक्‍ट’ निरुपयोगी ठरला.
 • ‘बॉम्बे रिफ्युजी ऍक्‍ट 1947’, ‘बॉम्बे स्मोक न्यूसन्स ऍक्‍ट 1912’, ब्रिटिशकालीन ‘फोरफिटेड लॅंड ऍक्‍ट’ अशी कालबाह्य ठरलेल्या सुमारे 170 कायद्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
 • तसेच हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास ‘महाराष्ट्र कोड’ मधील निम्मे कायदे रद्द होतील.

भारतीय महिला विजयी :

 • अनुजा पाटील (14 धावांत 3 बळी) आणि दीप्ती शर्मा (23 धावांत 2 बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने (दि.22) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 लढतीत श्रीलंकेचा 34 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
 • नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 130 धावांची मजल मारली.
 • लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्याचा संघाचा डाव 7 बाद 96 धावांत रोखल्या गेला.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक :

 • राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 87 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना (दि.22) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके, तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
 • राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडला.
 • सहा पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर 74 पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक देण्यात आले.

केंद्रीय अर्थसंकल्पात कार्ड व्यवहारांसाठी करात विशेष सूट :

 • प्रत्यक्ष रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण कमी करतानाच वित्तीय व्यवहार डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात कार्ड व्यवहारांसाठी करात विशेष सूट देण्यात येणार आहे.  
 • कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या देशातील व्यापाऱ्यांच्या अग्रगण्य संस्थेने या संदर्भात सरकारला आपला अहवाल सादर केला असून करात सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 • सध्या कोणत्याही दुकानात जिथे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जाते अशा ठिकाणी संबंधित दुकानदारास डेबिट कार्डावरून व्यवहार झाल्यास 0.75 टक्के ते एक टक्का तर क्रेडिट कार्डावरून व्यवहारा झाल्यास दोन टक्के कर आकारणी केली जाते.
 • बहुतांशवेळा हा संबंधित दुकानदार हा कर ग्राहकाच्याच खिशातून वसूल करतो, परिणामी, अनेक लोकांचा कल हा रोखीने व्यवहार करण्याकडे असतो.
 • परंतु, रोखीने होणाऱ्या व्यवहारांचा खर्चही जास्त आहे आणि रोखीने होणाऱ्या व्यवहारामुळे काळ्या पैशाचा प्रसार होण्याची भीती असते.
 • इलेक्ट्रॉनिक अथवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डाद्वारे व्यवहार वाढावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ :

 • राज्यातील आगामी पोलीस भरतीसाठी वयाची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
 • गृहमंत्रालयाने संबंधित आदेश जारी केले असून ते पोलीस मुख्यालयाला प्राप्त झाले आहेत, त्यांच्याकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 • सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयाची मर्यादा आता 25 वरून 28 वर्षे करण्यात आली आहे तर मागासवर्ग प्रवर्गासाठीची वयोमर्यादा 30 वरून 33 वर्षे करण्यात आली आहे.  
 • मार्च महिन्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
 • तसेच त्यासाठी पुरूष उमेदवारांची पाच किलोमीटरऐवजी 1,600 मीटर अंतर धावण्याची स्पर्धा होईल, तर महिलांना तीन किलोमीटर ऐवजी 800 मीटर अंतर धावावे लागेल, दहा दिवस ही भरती प्रक्रिया चालेल.

‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार :

 • राज्य शासनातर्फे देण्यात येणारा 2015 वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली आहे.
 • पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे.
 • फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली आहे.
 • मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच येत्या 27 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येण्याची शक्यता आहे.
 • साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास 2010 या वर्षापासून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असून, 2015 या वर्षासाठी ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रा. ग. जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष, श्री. के. ज. पुरोहित, प्रा. द. मा. मिरासदार, श्री. ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके यांना गौरविण्यात आले आहे.

चीनच्या शस्त्र निर्यातीत वाढ :

 • चीनने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या शस्त्रनिर्यातीत दुपटीने वाढ केल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
 • अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी चीनने प्रचंड पैसा गुंतविला असल्याचेही दिसून आले आहे.
 • चीनची शस्त्र आयात 2011 ते 2015 या काळात 25 टक्‍क्‍यांनी कमी झाली, यामुळे स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांवरील चीनचा विश्‍वास वाढल्याचेही दिसून येत आहे.
 • तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये चीनची मोठ्या शस्त्रांची निर्यात तब्बल 88 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.
 • जगातील एकूण शस्त्रनिर्यातीत चीनचा वाटा 5.9 टक्के इतका आहे, हा वाटा रशिया आणि अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी असला तरी, त्यात आता वाढ होत आहे.
 • दक्षिण चीन समुद्रातील वादामुळे आणि हिंदी महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमुळे चीनने ही गुंतवणूक केली आहे.
 • अमेरिका आणि रशिया यांची शस्त्रनिर्यात अनुक्रमे 27 आणि 28 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World