Current Affairs of 22 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (22 फेब्रुवारी 2016)

भारताची पदकांची संख्या एकूण पाच :

  • पॅन्टॅथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मन हिला इराणी संघाकडून विरोध (प्रेटेस) दर्शविला गेल्यामुळे बाद करण्यात आल्याने आशियाई इनडोअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला धक्का बसला.
  • दुसरीकडे रंजित महेश्वरीने तिहेरी उडीत रौप्य पदक जिंकून आपल्या संघाला दिलासा दिला.
  • भारताची पदकांची संख्या आता एकूण पाच झाली आहे.
  • रंजितने (दि.21) तिहेरी उडीत 16-16 मीटरचे अंत कापून रौप्य आपल्या नावावर केले.
  • कजाकिस्तानच्या रोमन वालियेव्हने 16.69 मीटर उडी मारून सुवर्ण पदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.
  • कतारच्या राशिद अहमद अल मनाईला (15.97 मी.) कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
  • महिलांच्या 60 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गायत्री गोविंदराजने 8.38  सेकंदांची वेळ नोंदवून व्यक्तिगत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.

बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये चीनला विजेतेपद :

  • चीनने (दि.21) येथे गाचीबावली इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपच्या महिला गटातील फायनलमध्ये जपानचा 3-2 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले.
  • जपानच्या नोजोमी ओकुहाराने चीनच्या शिजियान वाँगचा 17-21, 21-16, 21-15 असा पराभव करीत विजयाने सुरुवात केली.
  • मिसाकी मातसुतोमो-अयाका ताकाहाशी या दुहेरी जोडीने चीनच्या यिंग लुओ आणि किंग टियान यांच्यावर 21-12, 21-16 अशी मात करीत संघाची विजयी लय कायम ठेवली; परंतु चीनच्या यू सून हिने एकेरीत आपल्या संघाचे नशीब बदलले, तिने जपानच्या सयाका सातो हिचा 22-20, 21-19 असा पराभव केला.
  • दुसऱ्या दुहेरी लढतीत चीनच्या यू लुओ आणि युआनटिंग टांग या जोडीने नाओको फुकुमॅन आणि कुरुमी यानाओ यांचा 21-11, 21-10 असा पराभव करीत संघाला बरोबरी साधून दिली.
  • निर्णायक एकेरीत चीनच्या बिंगजियाओ ही हिने जपानच्या युई हाशिमोटो हिचा पराभव करीत संघाला विजय मिळवून दिला.
  • तसेच या स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता.

जेब बुश यांची निवडणुकीतून माघार :

  • रिपब्लिकन पक्षाचे उत्सुक उमेदवार जेब बुश यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
  • दक्षिण कॅरोलिनामध्ये स्वीकाराव्या लागलेल्या मोठ्या पराभवामुळे त्यांनी माघार घेतली आहे.
  • जेब बुश हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांचे भाऊ आहेत, तसेच ते फ्लोरिडाचे गव्हर्नरही होते.
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या हिलरी क्‍लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांना मागे टाकून नेवाडामध्ये विजय मिळविला.
  • तसेच वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये विजय मिळविला.

उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक :

  • उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक घोषित करण्यात आलेल्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सन्मानित करण्याला राज्य सरकारने जाहीर केले.  
  • सुमारे अडीच वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या 80 हून अधिक शौर्यवान पोलीस अधिकाऱ्यांचा (दि.22) राज्यापाल सी.विद्यासागर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
  • सीआयडीचे प्रमुख संजयकुमार, तुरुंग विभागाचे महानिरीक्षक डॉ.भूषणकुमार उपाध्याय, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले सदानंद दाते आदी अधिकाऱ्यांचा या सोहळ्यात सन्मान होणार आहे.

वाहन परवान्यांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक :

  • वाहन परवान्यांसाठी यापुढे मराठी भाषेचे ज्ञान असणे महत्वाचे असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
  • तसेच त्यानुसार ऑटोरिक्षा परवान्यांच्या यशस्वी अर्जदारांची मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा परिवहन विभागाकडून घेण्यात येणार आहे.
  • राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात 12 जानेवारी रोजी 42 हजार 798 ऑटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पध्दतीने वाटप करण्यात आले होते.
  • लॉटरी वाटपानंतर मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 24 अन्वये शासनाने घालून देण्यात आलेल्या अटीप्रमाणे अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची माहीती देण्यात आली होती.
  • तसेच त्यानुसार 29 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत उमेदवारांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात येईल.
  • चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून यशस्वी उमेदवारांना त्याचदिवशी इरादापत्राचे वाटप केले जाईल.

भारतीय वंशाच्या सहा वैज्ञानिकांना पुरस्कार :

  • भारतीय वंशाच्या सहा वैज्ञानिकांसह एकूण 106 वैज्ञानिकांची अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी युवा वैज्ञानिक व अभियंत्यांसाठी असलेल्या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे.
  • वॉशिंग्टन येथे पुरस्कार वितरण समारंभ लवकरच होणार आहे.
  • तरूण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात, त्यात नवप्रवर्तनात्मक शोधांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.
  • या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये सहा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा समावेश असून परडय़ू विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश आहे, त्यांचे संशोधन संगणक आज्ञावलीच्या भाषांशी निगडित आहे.
  • हार्वर्ड विद्यापीठात मूळपेशी क्षेत्रात संशोधनात काम करणारे किरण मसुनुरू यांचाही समावेश असून त्यांचे संशोधन हृदयाच्या जनुकीय व चयापचय क्रियांशी निगडित आहे.
  • मॉलीक्युलर फिजिऑलॉजी अँड बायोफिजिक्स व्हॅडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे सचिन पटेल यांचाही गौरव होत असून त्यांनी न्यूरॉनमधील कॅनाबिनॉइडचे मेंदूतील कार्य समजून घेण्यात मोठे काम केले आहे त्यामुळे मानसिक रोगांवर उपचार शक्य आहे.
  • नासाच्या ग्लेन रीसर्च सेंटरचे विक्रम श्याम यांचे संशोधन इंजिन फ्लो फिजिक्स, बायोमिमेटिक याच्याशी संबंधित आहे.
  • राहुल मंघाराम हे पेनसिल्वानिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक असून त्यांनी ऊर्जाक्षम इमारती, स्वयंचलित यंत्रे व औद्योगिक बिनतारी यंत्रणा यावर संशोधन केले.
  • वॉशिंग्टन विद्यापीठातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे प्राध्यापक श्वेताक पटेल यांना संगणक-मानव संबंध, संवेदक नियंत्रित प्रणाली यासाठी गौरवण्यात येत आहे.
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कारकीर्दीत 1996 मध्ये हे पुरस्कार सुरू करण्यात आले.

दिनविशेष :

  • 1857 – रत्नागिरीत ‘पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.
  • 1954 – पहिली कापड गिरणी मुंबईत येथे सुरु झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.