Current Affairs of 20 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (20 फेब्रुवारी 2016)

भारतीय संशोधकांचा ओबामांच्या हस्ते सत्कार :

 • स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या 106 युवा शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते सत्कार होणार असून, यामध्ये सहा भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे.
 • तसेच या सर्वांना ‘अर्ली करियर ऍवॉर्ड’ मिळणार असून, हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.
 • मिलिंद कुलकर्णी (पर्ड्यू विद्यापीठ), किरण मुसुनुरू (हार्वर्ड विद्यापीठ), सचिन पटेल (वॅंडरबिल्ट विद्यापीठ), विक्रम श्‍याम (नासा), राहुल मंगारम (पेनसिल्वानिया विद्यापीठ) आणि श्‍वेतक पटेल (वॉशिंग्टन विद्यापीठ) अशी या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची नावे आहेत.
 • युवावस्थेतच संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना दरवर्षी हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
 • तसेच या युवा संशोधकांमुळे आपल्याला जगासमोरील आव्हानांचे आकलन होण्यास आणि त्यांची सोडवणूक करण्यास मदत होते.

ब्रँडन मॅक्युलमचा वेगवान शतकाचा विक्रम :

 • न्यूझीलंडचा कप्तान ब्रँडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमधल्या वेगवान शतकाचा विक्रम (दि.19) केला आहे.
 • ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत मॅकयुलमने अवघ्या 54 चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे.
 • कारकिर्दीतलं बारावं शतक झळकावताना मॅक्युलमने 16 चौकार व 4 षटकार फटकावले, मॅक्युलमची ही 101वी व शेवटची कसोटी आहे.
 • तसेच या आधीचा विक्रम विवियन रिचर्डमिसबाह उल हकच्या नावावर होता.
 • रिचर्डने इंग्लंडविरुद्ध अँटिग्वामध्ये खेळताना तर मिसबाहने ऑस्ट्रेलिविरुद्ध अबुधाबीमध्य खेळताना 56 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.  
 • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला असून त्याने 101 षटकार आत्तापर्यंत मारले आहेत, हा विक्रम याआधी 100 षटकार मारणा-या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.

पोलीस भरतीतील धाव ‘चिप’वर :

 • महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता चाचणीत भलतीच दमछाक होऊन काही जणांना जीव गमावावा लागला होता.
 • त्यामुळे आता भरतीतील धावांचे अंतर कमी करण्यात आले असून, यापुढे 5 किलोमीटरऐवजी 1600 मीटरचे तर महिलांना 800 मीटरचे अंतर धावावे लागेल.
 • तसेच उमेदवाराच्या अंगाला एक चिप चिकटविली जाणार असून, या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल.
 • पोलीस खात्यात भरती होण्यासाठी धावण्याची चाचणी घेतली जाते, यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
 • इच्छुक उमेदवाराला पूर्ण 20 गुण मिळविण्यासाठी पुरुषांना हे अंतर 4 मिनिटे 50 सेकंदांत व महिलांना 2 मिनिटे 30 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करावे लागेल.
 • त्याशिवाय गोळाफेक, लांबउडी, जोरबैठका व 100 मीटर वेगाने धावणे या प्रत्येकाला 20 गुण आहेत.
 • किमान 10 जोरबैठका उमेदवाराला काढाव्या लागतात, परंतु पूर्ण 20 गुण मिळविण्यासाठी 100 मीटरचे अंतर 12 सेकंदांत त्याला पार करावे लागते.
 • तसेच या सगळ्या अटी महिलांनाही लागू आहेत असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे भारतात आगमन :

 • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे (दि.19) सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी येथे आगमन झाले.
 • पदावर आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून, नव्या घटनेमुळे नेपाळमध्ये निर्माण झालेल्या प्रश्‍नांसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते भारतीय नेत्यांबरोबर चर्चा करतील.
 • ओली यांच्याबरोबर 77 सदस्यांचे एक शिष्टमंडळही असून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या सर्वांचे विमानतळावर स्वागत करून भारत या भेटीला किती महत्त्व देतो हे दाखवून दिले.  
 • भारतीय वंशाच्या मधेशी समाजाला सामावून घेण्यासाठी नेपाळने घटनेत तसे बदल करण्याचा सल्ला ओली यांना भारताकडून दिला जाणार आहे.

पाच नवीन बाह्य़ग्रहांचा शोध :

 • आपल्या सौरमालेतील गुरू या ग्रहाशी मिळतेजुळते गुणधर्म असलेले पाच नवीन ग्रह वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत, गुरू हा आपल्या सौरमालेतील मोठा ग्रह आहे.
 • तसेच हे ग्रहसुद्धा त्यांच्या मातृताऱ्याभोवती फिरत असून तेही गुरूसारख्याच आकारमानाचे आहेत.
 • ब्रिटनमधील किली विद्यापीठातील वैज्ञानिकांनी ‘वास्प साऊथ’ म्हणजे वाइड अँगल फॉर प्लॅनेटस-साऊथ या उपकरणाचा वापर यात केला असून या यंत्रणेत आठ कॅमेरे आहेत.
 • दक्षिणेकडील ठरावीक भागाचे निरीक्षण करण्यात आले असता पाच ताऱ्यांभोवती प्रकाशाचा वक्राकार दिसला; प्रत्यक्षात ते या ग्रहांचे अधिक्रमण होते.
 • नव्याने शोधलेल्या ग्रहांची नावे वास्प 119 बी, वास्प 124 बी, वास्प 126 बी, वास्प 129 बी, वास्प 133 बी अशी आहेत, असे ‘फिजिक्स डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
 • या ग्रहांचा कक्षीय काळ हा 2.17 ते 5.75 दिवस असून त्यांचे वस्तुमान गुरूच्या 0.3 ते 1.2 पट आहे.

  तर त्रिज्या गुरूच्या त्रिज्येपेक्षा 1 ते 1.5 पटींनी अधिक आहे.

लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन :

 • ‘टू कील अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीसाठी पुलित्झर पुरस्कार पटकावणाऱ्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन झाले, त्या 89 वर्षांच्या होत्या.
 • अलाबामात मन्रोव्हिले येथे जन्मलेल्या ली या 1949 मध्ये न्यूयॉर्कला गेल्या.
 • जुलै 1960 मध्ये त्यांच्या पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.
 • तसेच या पुस्तकावर 1962 मध्ये चित्रपटही निघाला, या पुस्तकाचा ‘गो सेट अ वॉचमन’ नावाचा दुसरा भाग 2015 साली प्रसिद्ध झाला होता.

‘आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र’चे प्रकाशन :

 • महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा लोकमत माध्यम समूहातर्फे आयोजित व अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी प्रस्तुत आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्या हस्ते (दि.20) फेब्रुवारीस होणार आहे.
 • तसेच याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेअजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील उपस्थित राहणार आहेत.
 • महाराष्ट्रातील सुमारे 80 शिक्षण संस्थांच्या वाटचालीचा वेध आणि त्यांचे शिक्षणक्षेत्राच्या प्रगतीतील योगदान यांचा आलेख या पुस्तकाद्वारे मांडलेला आहे.
 • शून्यातून विश्व उभे केलेल्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांचाही त्यात समावेश आहे.
 • शिक्षणाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत राज्यातील शिक्षण विकासाला खऱ्या अर्थाने गती देण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कर्तृत्वावर आधारित असे ‘आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र’ हे पुस्तक आहे.
 • उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये व देशपातळीवर अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत असून त्याचा थेट संबंध शिक्षणाशी व त्यातील गुणवत्तेशी आहे.
 • तरुणांचा देश म्हणून स्वत:ची ओळख निर्माण होत असलेल्या भारतापुढे या तरुणाईतून कुशल मनुष्यबळ घडवण्याचे खरे आव्हान आहे.
 • नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यावरच देशाचे भवितव्य ठरेल हे लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्रातही लोकमतने आणखी एक विधायक पाऊल उचलले आहे.

दिनविशेष :

 • 1827 – महात्मा ज्योतिबा फ़ुले यांचा जन्म.
 • 1987 – मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.