Current Affairs of 19 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (19 फेब्रुवारी 2016)

आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा अव्वल स्थान :

 • वरिष्ठ खेळाडू किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने आपले विजयी अभियान पुढे सुरू ठेवताना आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बलाढ्य चीनला 3-2 असे हरवून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
 • ग्रुप ए मध्ये यापूर्वीच आपले स्थान निश्चित केलेल्या भारताने चीनला हरवून गटात अव्वल स्थान मिळविले आहे.
 • भारताने (दि.17) आपल्या पहिल्या सामन्यात सिंगापूरला 5-0 ने हरवले होते.
 • श्रीकांतने स्पर्धेत पहिला एकेरी सामना जिंकून संघाला आघाडी मिळवून दिली.
 • तसेच त्याने होवेइतियानला 33 मिनिटांत 21-11, 21-17 असे हरवले.

पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ हिंजवडीत :

 • हिंजवडी आयटी पार्क परिसरात संरक्षण विभागाच्या मागणीनुसार राज्यातील पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर’ (हब) उभारण्यात येणार आहे.
 • तसेच यासाठी वक्फ बोर्डाने सुमारे 30 एकर जागा देण्याची तयारी दाखविली आहे, त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
 • आगामी पाच वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ निर्माण करण्याची घोषणा शासनाने नुकतीच केली, त्यामध्ये सुमारे 1200 कोटी डॉलरच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 • राज्यभरात या उपक्रमामुळे सुमारे एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत.
 • शासनाच्या या प्रस्तावाला प्रतिसाद देत पुण्यातील संरक्षण विभागाने पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ हिंजवडी परिसरात उभारण्याची मागणी केली होती.
 • संरक्षण विभागाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा पुरवठा करणारे सुमारे 20 ते 25 लघुउद्योग व कारखाने पुण्यातील पर्वती परिसरात आहेत.

पाकला लढाऊ विमाने देणार अमेरिका :

 • जगातील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक म्हणून ओळख असणारी आठ एफ-16 विमाने अमेरिकेने पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तब्बल 700 मिलियन डॉलर्सच्या या करारानुसार अमेरिका पाकिस्तानला, एफ-16 विमाने, रडार, अन्य सामुग्री आणि त्यासंदर्भातील प्रशिक्षणही देणार आहे.
 • तसेच या विमानांमुळे पाकिस्तानी हवाई दलाची क्षमता वाढेल आणि देशातील दहशतवादाला आळा घालण्यास मदत होईल, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
 • अमेरिकी काँग्रेस व सिनेटच्या सदस्यांनी पाकिस्तानशी हा करार करण्यास कडाडून विरोध दर्शवला होता.
 • तसेच या विरोधामुळे तब्बल 30 दिवस हा करार रखडला होता, परंतु बराक ओबामा प्रशासनाने खासदारांचा विरोध झुगारून करारावर शिक्कामोर्तब केले.

लियोनाल मेस्सी यांचे फुटबॉल स्पर्धेत 300 गोल :

 • बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लियोनाल मेस्सी याने लिगा फुटबॉल स्पर्धेत 300 गोलचा टप्पा पार केला.
 • स्पोर्टिंग गिनोज संघाला 3-1 असे हरविताना त्याने 2 गोल केले.
 • तसेच या लिगामध्ये 300 गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू बनला आहे.
 • बार्सिलोनाने गिनोजला 3-1 असे पराभूत करून विजय मिळविला, या विजयामुळे क्लब पदकतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
 • बार्सिलोनाचे आता 24 सामन्यांत 60 गुण झाले आहेत.
 • एटलेटिको माद्रिद संघ द्वितीय स्थानावर असून, त्यांचे 54 गुण आहेत.
 • बार्सिलोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचा रियाल माद्रिद यांच्यात 7 गुणांचे अंतर आहे.
 • मेस्सीचा हा 334 वा ला लिगा सामना होता, आता त्याचे 301 गोल झाले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा ‘सेन्ट्रल बँक ऑफ युएई’सोबत करार :

 • भारतीय रिझर्व्ह बँकेने युनायटेड अरब अमरिताची (‘युएई’) मध्यवर्ती बँक असलेल्या ‘सेन्ट्रल बँक ऑफ युएई’शी चलन अदलाबदलीचा करार केला.
 • तसेच या करारावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन‘सेन्ट्रल बँक ऑफ युएई’चे गव्हर्नर मुबारक राशिद अल मन्सुरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
 • आगामी करारामुळे आखाती देश असलेल्या युनायटेड अरब एमिरेट्सशी असलेले भारताचे संबंध मजबूत होणार असून, उभय बाजूंनी तांत्रिक पातळीवर चर्चा झाल्यांनतर ‘करन्सी स्वॅप अग्रिमेन्ट’च्या अटींना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

व्हेनेझुएलाच्या चलनाचे 37 टक्के अवमूल्यन :

 • व्हेनेझुएलाने सरकारी चलन बोलिव्हरचे 37 टक्के अवमूल्यन केले असून, कच्च्या तेलाच्या भावात घसरण होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ‘ओपेक’ देशांनी सुरू केलेल्या उपाययोजनांचा हा भाग आहे.
 • तसेच, देशात प्रथमच 20 वर्षांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
 • व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलाय मडुरो यांनी बोलिव्हर या चलनाचे 37 टक्के अवमूल्यन जाहीर केले, याआधी अमेरिकी डॉलरचा भाव 6.3 बोलिव्हर होता.
 • तसेच तो आता 10 बोलिव्हरपर्यंत जाणार आहे, हा भाव कायम बदलत राहणार आहे, हा भाव जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधांसाठी लागू राहणार आहे.
 • व्हेनेझुएलाची 95 टक्के अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे.
 • कच्च्या तेलाच्या भावातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण होत असल्याने सरकारने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.

ऍडम व्होजेसचा विक्रम :

 • ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ऍडम व्होजेसने धावांच्या सरासरीच्या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे.
 • व्होजेसने न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाबाद 176 धावांची खेळी केली आहे.
 • तसेच त्याने आतापर्यंत 14 कसोटी सामन्यांमध्ये 100.33 च्या सरासरीने 1204 धावा केल्या आहेत.
 • कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने धावा बनविणारा व्होजेस हा जगातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे, त्याने दिग्गज डॉन ब्रॅडमन यांचा 99.94 च्या सरासरीने धावा बनविण्याचा विक्रम मागे टाकला आहे.

दिनविशेष :

 • 1630 पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. शिवाजी महाराज यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World