Current Affairs of 18 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 फेब्रुवारी 2016)

चालू घडामोडी (18 फेब्रुवारी 2016)

सहवीज निर्मितीमधून 777 कोटींचे उत्पन्न :

 • राज्यातील साखर कारखान्यांना सहवीज निर्मितीमधून गेल्या वर्षी तब्बल 777 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 • तसेच त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देताना कारखान्यांना मोठी मदत होत आहे.
 • महावितरण साखर कारखान्यांकडून सर्वाधिक 6 रुपये 59 पैसे प्रति युनिट या दराप्रमाणे वीज खरेदी करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या कारखान्यांकडील वीज खरेदी दरात प्रति युनिट 78 पैसे इतकी वाढ केली आहे.
 • देशात अशाप्रकारे सर्वांत जास्त दराने वीज खरेदी करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
 • राज्य सरकारने उसाच्या चिपाडापासून तसेच कृषी अवशेषांपासून सहवीज निर्मिती प्रकल्पांसाठीचे धोरण जाहीर केले आहे.
 • राज्यातील साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.
 • सध्या राज्यात सहवीज निर्मितीचे 101 प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यामधून 1 हजार 743 मेगावॅट वीज निर्मिती होते.
 • गेल्यावर्षी महावितरणने साखर कारखान्यांकडून एक हजार 195 मेगावॅट वीज खरेदी केली, त्यावेळी कारखान्यांना 777 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.

राज्यात आठ लाख कोटींचे करार :

 • मेक इन इंडिया सप्ताहात (दि.17) पाचव्या दिवशी आठ लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकारला यश आले.
 • स्मार्ट सिटी, हवाई वाहतूक, किरकोळ उद्योग, लघू व मध्यम उद्योग (एसएमई), परवडणारी घरे आदी क्षेत्रांत 18 सामंजस्य करार करण्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 • आधुनिक स्मार्ट शहर संकल्पनेच्या निर्मितीसाठी 11 गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगर पंचायत, कलोटे मोकाशी ग्रामपंचायत, नादोडे ग्रामपंचायत यांनी एकूण 3550 हेक्‍टर जमिनीच्या लॅण्ड पुलिंगसाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला आहे.
 • नैना योजनेच्या धर्तीवर करण्यात खालापूर स्मार्ट सिटीचा विकास करण्यात येणार यासंबंधीचा करार मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत करण्यात आला.
 • ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प असून त्याच्या पूर्णत्वासाठी राज्य शासनातर्फे आवश्‍यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
 • देशांतर्गत व परदेशातून रुग्णांची ने-आण करणाऱ्या पहिल्या हवाई रुग्णवाहिकेसंदर्भात राज्य शासन व मॅब एव्हिएशन यांच्यात सामंजस्य करार झाला.

केंद्र सरकारची नवे लोहमार्ग उभारण्याची घोषणा :

 • रेल्वे अर्थसंकल्पाला अवघे काही आठवडे शिल्लक असताना केंद्र सरकारने नवे लोहमार्ग उभारण्याची घोषणा केली आहे.
 • दहा हजार 700 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत वर्धा (सेवाग्राम)-बल्लारशहासह सहा नवे मार्ग बांधले जातील.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
 • तसेच यासोबत आरोग्य, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
 • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली.  
 • या प्रकल्पात, हुबळी-चिकाजूर मार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे.
 • सव्वाचार वर्षांत हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यासाठी 1294.13 कोटी रुपये खर्च येईल.
 • संपूर्ण पुणे-मिरज-हुबळी-बंगळूर हा मार्ग दुहेरीकरणासाठी निश्‍चित करण्यात आला असून, मुंबई-बंगळूर या मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक सुरळीत करण्याची ही योजना आहे.
 • वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणारा वर्धा (सेवाग्राम)-बल्लारशाह असा 132 किलोमीटर लांबीचा तिसरा लोहमार्ग उभारला जाणार आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नवी मुंबईमध्ये होणार :

 • जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणार्या फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोशिएशन) 2017 ला होणा-या वर्ल्डकपचे सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत.
 • फीफा चे संचालक जेवीयर सेप्पी यांनी (दि.17) डी.वाय पाटील स्टेडियमची पाहणी केली. फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो.
 • प्रत्येक चार वर्षांनी 17 वर्षांखालील खेळाडूंसाठी होणारी विश्वचषक स्पर्धा भरवण्याचा मान यंदा भारताला मिळाला आहे.
 • 2017 च्या फूटबॉल विश्वचषक सामन्यांकरिता झालेली निवडीने नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.
 • तसेच या स्पर्धेतील प्रमुख सामने नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत, या स्टेडियमची 65 हजार प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे.
 • अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाहिन्या या खेळांचे थेट प्रक्षेपण करणार आहेत.
 • फिफा पथकाने विश्वचषकासाठी कोलकाता, नवी दिल्ली, कोच्ची, गुवाहाटी, नवी मुंबई आणि गोवा या सहा अस्थायी आयोजन स्थळांपैकी नवी मुंबईची निवड केली आहे.

अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार :

 • वरिष्ठ आयपीएस अधिकारी अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत.
 • 1979 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अलोक वर्मा यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
 • तसेच, सध्याचे दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी येत्या 29 फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी येत्या 1 मार्चपासून दिल्ली पोलीस आयुक्तपदाची धुरा अलोक वर्मा सांभाऴणार आहेत.
 • दिल्ली पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत अलोक वर्मा यांच्यासह 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी धर्मेद्र कुमार यांचेही नाव चर्चेत होते.  
 • सध्या अलोक वर्मा तिहार जेलच्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

गोव्यात 21 वर्षांखालील व्यक्तींना कॅसिनोबंदी :

 • गोव्यातील कॅसिनोमध्ये यापुढे 21 वर्षांखालील व्यक्तींना प्रवेश देण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
 • गोव्याच्या गृहमंत्रालयाने अशा प्रकारची बंदी घालण्याबाबतच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे.
 • पुढील आर्थिक वर्षांपासून नवे नियम लागू होणार आहेत, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 • नियमांचा मसुदा विधि विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे.
 • कॅसिनोंसाठी नियामक प्राधिकरण म्हणून आयुक्तांची नियुक्ती करणे नियमानुसार बंधनकारक करण्यात आले असून ते मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवावे लागणार आहेत.
 • नवे नियम लागू झाले की, कॅसिनोमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला तो 21 वर्षांहून अधिक वयाचा आहे हे सिद्ध करणारा दस्तऐवज स्वत:जवळ ठेवावा लागणार आहे.

दिनविशेष :

 • 1823 – लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म.
 • 1905- भारतीय होमरुल सोसायटीची लंडन येथे शामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली.
 • भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.