Current Affairs of 25 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2015)

‘मेक इन इंडिया‘अंतर्गत मोठा संरक्षण करार :

 • ‘मेक इन इंडिया‘अंतर्गत रशिया भारतात कामोव्ह 226 ही हेलिकॉप्टर तयार करण्याबाबतचा मोठा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात झाला आहे. या मोहिमेअंतर्गत झालेला हा आतापर्यंत सर्वांत मोठा संरक्षण करार आहे. तसेच, विविध क्षेत्रांशी निगडित सोळा करारांवरही या वेळी स्वाक्षरी झाली.
 • मोदी यांच्या रशिया दौऱ्यामध्ये अपेक्षेप्रमाणेच हा संरक्षण करार झाला आहे. यानुसार, भारत आणि रशिया हे संयुक्तरित्या हेलिकॉप्टर तयार करणार आहेत. करार झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी मोदी म्हणाले, ‘रशिया हा भारताचा सर्वांत विश्‍वासू मित्र आहे. दोन्ही देशांमधील अणुऊर्जा क्षेत्रांतील सहकार्य वाढत आहे.
 • दोन प्रकल्पांमध्ये रशियाच्या बारा अणुभट्ट्यांबाबत बरीच प्रगती झाली आहे. तसेच, दोन्ही देशांमधील खासगी उद्योगांनाही सहकार्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आमचे चांगले संबंध हेच संरक्षण आणि राजनिती सहकार्याचा स्रोत आहे.‘‘ पुतीन हे भारत आणि रशियाच्या धोरणात्मक संबंधांचे शिल्पकार आहेत, अशी स्तुतीही मोदी यांनी केली. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यामध्ये रशियाचा मोठा सहभाग असेल, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांमधील संबंधांचे वर्णन करताना मोदी यांनी “हे संबंध हायड्रोकार्बनपासून हिऱ्यापर्यंत प्रगत झाले आहे,‘ असे वर्णन केले आहे.

 

न्यूझीलंडचा कर्णधार निवृत्त होणार :

 • न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्‌लम येत्या फेब्रुवारीत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी-सामान्यांच्या मालिकेनंतर आपण निवृत्ती पत्करणार असल्याची घोषणा मॅकलम याने आज केली. त्याच्या या निवृत्तीच्या निर्णयामुळे मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे नेतृत्व केन विल्यम्सन याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
 • मॅकलमने सलग दोन वर्ष न्युझीलंडचे कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवले. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आलेल्या 29 पैकी 11 सामन्यात न्युझीलंडने विजय मिळवला. सलग 100 कसोटी सामने खेळणारा मॅकलम हा एकमेव खेळाडू असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 फ्रेबुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे होणारी कसोटी म्हणजे त्याचा अखेरचा सामना असेल.
 • मॅकलमने 99 कसोटीत 6,273 धावा केल्या असून 11 शतके व 31 अर्धशतके ठोकली आहेत. तर 254 एकदिवसीय सामन्यात 5 शतके व 31 अर्धशतकांसह 5909 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा मॅकलम हा एकमेव फलंदाज असून त्याने गेल्यावर्षी वेलिंग्टन येथे भारताविरुद्धच्या कसोटीत 302 धावांची खेळी केली होती.

‘सी. के. नायडू’ जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित :

 • भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांना भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) यंदा ‘सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करणार आहे.
 • भारतीय संघाचे पहिले कर्णधार कर्नल कोटारी कंकय्या नायडू यांची जन्मशताब्दी बीसीसीआय साजरी करीत असून, त्यानिमित्त मैदानावर आणि मैदानाबाहेर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार किरमाणी यांना जाहीर झाला असून, पुरस्कार स्वरूपात ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि 25 लाख रुपये रोख दिले जातील. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात पुरस्कार समितीची बैठक झाली. या समितीत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर आणि ‘द हिंदू’चे संपादक एन. राम यांचा समावेश आहे.
 • गावसकर यांनी विंडीजविरुद्ध नाबाद 236 धावांची खेळी केली, तेव्हा किरमाणी यांनी त्यांच्यासोबत नवव्या गड्यासाठी 143 धावांची भागीदारी केली होती. क्रिकेटमधील सेवेसाठी भारत सरकारने 1982 मध्ये त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान केला. किरमाणी हे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.

सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटपटू, असा दुहेरी सन्मान :

 • लेग स्पिनर या नात्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून हा प्रवास अनेक चढ-उतारांनी गाजला. पाच वर्षांआधी तळाच्या स्थानाला फलंदाजी करीत असताना इतक्या मोठ्या स्थानावर झेप घेईल, असा विचार मनातही डोकावला नसल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने गुरुवारी व्यक्त केली.
 • आयसीसीकडून एकाचवेळी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटपटू, असा दुहेरी सन्मान मिळविणारा 26 वर्षांचा स्मिथ सर्वांत कमी वयाचा खेळाडू बनला आहे. त्याने सप्टेंबर 2014 ते सप्टेंबर 2015 या काळात 25 डावांत 1734 धावा काढल्या. सचिन तेंडुलकरपाठोपाठ अशी कामगिरी करणारा तो सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे. तो म्हणाला,‘अशा पुरस्कारांच्या सन्मानाबद्दल विचारही करू शकत नाही.
 • मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करीत, संघाला अधिकाधिक विजय मिळवून देण्यासाठी आपण झटत असतो. अविश्वसनीय कामगिरीच्या बळावर सर्वोत्कृष्ट खेळाडू बनणे सुखद आहे. ’ स्टीव्हने अलीकडे फलंदाजीत शानदार कामगिरी केली; पण पाच वर्षांआधी 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर त्याला लेग स्पिनरच्या रूपात पदार्पणाच्या कसोटीत खेळविण्यात आले होते. तळाच्या स्थानावर त्याला फलंदाजीही करावी लागली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.