Current Affairs of 24 December 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 डिसेंबर 2015)
सर्वोत्तम खेळाडू जाहीर :
- आयसीसीने 18 सप्टेंबर 2014 ते 13 सप्टेंबर 2015 या कालावधीतील कामगिरीनुसार सर्वोत्तम खेळाडू जाहीर केले.
- ऑस्ट्रेलियासाठी रन मशिन ठरलेला त्यांचा कर्णधार स्टिव स्मिथ कसोटीसह सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला, तर एबी डिव्हिलियर्स सलग दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अग्रेसर ठरला.
आयसीसी पुरस्कार विजेते :
- सर्वोत्तम क्रिकेटपटू : स्टिव स्मिथ
- कसोटीपटू : स्टिव स्मिथ
- वन डे खेळाडू : एबी डिव्हिलियर्स
- टी-20 खेळाडू : फाफ डु प्लेसिस
- खिलाडूवृत्ती : ब्रॅडम् मॅकल्म
- उदयोन्मुख खेळाडू : जोश हेझलवूड
- महिला वन डे खेळाडू : मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
- महिला टी-20 खेळाडू : स्टॅफिन टेलर (विंडीज)
- पंच : रिचर्ड कॅटलबग
Must Read (नक्की वाचा):
“व्हॉट्सऍप” मेसेंजर ऍपवर लवकरच व्हिडिओ कॉलिंग सुविधा :
- व्हॉईस कॉलिंगसुविधेप्रमाणे “व्हॉट्सऍप” या लोकप्रिय मेसेंजर ऍपवर लवकरच व्हिडिओ कॉलिंग सुविधा मिळणार असल्याचे वृत्त जर्मनीतील एका ब्लॉगवर देण्यात आले आहे.
- या पूर्वी “व्हॉट्सऍप”ने आपल्या यूजर्ससाठी व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जगभरात ती लोकप्रियही ठरली आहे. त्यानंतर आता “स्काइप” या व्हिडिओ सुविधा पुरविणाऱ्या संकेतस्थळाची तीव्र स्पर्धा असतानाही “व्हॉट्सऍप” व्हिडिओ कॉलिंग सुविधा सादर करणार आहे.
- व्हॉईस कॉलिंगप्रमाणेच व्हिडिओ कॉलिंगचे डिझाइन ठेवले आहे. एकाच वेळी अनेकांशी व्हिडिओ कॉलिंग, कॉलदरम्यान मोबाईलचा कॅमेरा फिरविण्याची तसेच माईक बंद करण्याची सुविधाही देण्यात आल्याचे ब्लॉगवर म्हटले आहे.
- व्हिडिओ कॉल सुरू असताना दोन विंडो दिसत असून त्यामध्ये कॉल करणाऱ्याची मोठी, तर कॉल स्वीकारणाऱ्याची छोटी अशा दोन विंडो दिसत असल्याचेही त्यात म्हटले आहे. येत्या काही आठवड्यांत अशी सुविधा सर्व यूजर्सना उपलब्ध होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
राष्ट्रगीताविनाच परिषद संस्थगित :
- विधान परिषदेच्या इतिहासात बुधवारचा दिवस कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा ठरला. सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रगीताविनाच परिषद संस्थगित करून मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची घोषणा केली. चूक लक्षात आल्यावर पुन्हा सभागृह बोलावून राष्ट्रगीत घेण्यात आले.
झिंबाब्वे हा युआन हे चीनचे चलन राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारणार :
- झिंबाब्वे हा देश युआन हे चीनचे चलन राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.
- या निर्णयाच्या बदल्यात चीन झिंबाब्वेला दिलेले सुमारे 4 कोटी डॉलर्सचे कर्ज रद्द करणार असल्याची माहिती आहे.
- चीन हा झिंबाब्वेमधील सर्वांत मोठा गुंतवणुकदार देश आहे. झिंबाब्वे देशात 1999-2008 या काळात आलेल्या महामंदीमधून सावरण्याचा प्रयत्न अद्याप करत असून येथील राजवट मानवाधिकारांना पायदळी तुडवत असल्यामुळे पाश्चिमात्य देशांनी झिंबाब्वे अघोषित आर्थिक बहिष्कार टाकला आहे.
- गेल्या पाच वर्षांच्या काळात झिम्बाब्वेने 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीची सवलतीच्या दरातील कर्जे चीनकडून घेतली आहेत. चीन हा झिम्बाब्वेचा दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांपासून युआन हे झिम्ब्वाब्वेच्या चलन व्यवस्थेचा एक भाग असत्ताना नव्याने करण्यात आलेली ही घोषणा अतार्किक असल्याची टीका झिम्बाब्वेसंदर्भातील एक प्रसिद्ध विश्लेषक असलेल्या जॉन रॉबर्टसन यांनी केली आहे.
ग्रीसच्या संसदेमध्ये समलैंगिक विवाहास अनुमती ;
- ग्रीसच्या संसदेमध्ये समलैंगिक विवाहास (गे) अनुमती देणारे विधेयक संमत करण्यात आले आहे.
- “सामाजिक भागीदारी”चे फायदे समलैंगिक जोडप्यांनाही देण्यासंदर्भातील हे विधेयक संसदेमध्ये 193-56 अशा मतदानानंतर मंजूर झाले. मात्र या विधेयकामधील दत्तकविधानास परवानगी देणारे कौटुंबिक कायद्यासंदर्भातील कलम मतदानाआधी विधेयकाच्या प्रस्तावामधून गाळण्यात आले.
- ग्रीसमधील प्रभावशाली ऑर्थोडॉक्स चर्चमधील परंपरावादी बिशपनी या विधेयकास तीव्र विरोध केला होता. या विधेयकामुळे कुटूंब संस्था धोक्यात येईल, अशी टीका ऑर्थोडॉक्स चर्चने केली होती.