Current Affairs of 25 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2017)

हायकोर्टाकडून मेधा पाटकर यांना जामीन मंजूर :

 • नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना 23 ऑगस्ट रोजी इंदौर हायकोर्टाने जामीन मंजूर केला.
 • सरकारी कामात अडथळा आणि सरकारी अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी मेधा पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 • मध्य प्रदेशमधील चिखलदा येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी 27 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
 • सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाप्रकरणी मेधा पाटकर यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
 • तसेच यातील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मेधा पाटकर यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
 • तर सरकारी अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी मेधा पाटकर यांना सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. शेवटी मेधा पाटकर यांनी इंदौर हायकोर्टात जामीन अर्ज केला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2017)

आरबीआयकडून 200 रुपयांची नोट चलनात येणार :

 • 50 रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली होती. त्यानंतर आता लवकरच 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे.
 • तसेच याबाबतची घोषणा ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 • बनावट नोटांचा ‘उद्योग’ थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे.
 • 100 ते 500 रुपयांमध्ये कोणतीही नोट चलनात नाही. त्यामुळे 200 रुपयांची नोट फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.
 • काळा पैसा आणि बनावट नोटांच्या कारभाराला चाप लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार आहेत.

गणपतीत ध्वनिक्षेपक वापरात चार दिवस सूट :

 • मुंबई शहर आणि जिल्ह्यात ध्वनिक्षेपकध्वनिवर्धक वापरण्याच्या मर्यादेतून सूट देण्याबाबतचे 15 दिवस मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत.
 • 25 ऑगस्ट पासून सुरू होणारा गणपती उत्सव चार दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विर्सजन व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमीनवमी) दिवाळी एक दिवस (लक्ष्मीपूजन), नाताळ एक दिवस, 31 डिसेंबर एक दिवस या दिवसांसाठी श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या ठिकाणी ध्वनिवर्धक सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्याची सूट असेल.
 • ध्वनिक्षेपकध्वनिवर्धक वापरण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले आदेश, ध्वनिप्रदूषण 2000 मधील नियम 34 चे पालन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण नियम 2000 च्या अधिसूचनेनुसार पालन करणे संबधितांवर बंधनकारक आहे.

भारत नेपाळमध्ये आठ करार :

 • भारत आणि नेपाळमध्ये आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामध्ये उभय देशांतील अमली पदार्थ तस्करीविरोधातील सहकार्याचाही समावेश आहे.
 • नेपाळचे पंतप्रधान शेरबहाद्दूर देऊबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
 • देऊबा यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक होती, नेपाळच्या विकासासाठी आमचा देश कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
 • देऊबा यांनीही नेपाळ आपल्या भूमीवरून एकही भारतविरोधी कारवाई होऊ देणार नाही, असे सांगितले. या वेळी उभय नेत्यांच्या हस्ते ‘कटैय्या ते कुसाहा’ आणि ‘रक्‍सौल ते परवानीपूर’ विद्युतवाहिनींचे उद्‌घाटन करण्यात आले.
 • उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये लष्करी सज्जता आणि सुरक्षितता हे दोन्ही घटक महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
 • तसेच देऊबा हे सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

दिनविशेष :

गंगाधर गाडगीळ (25 ऑगस्ट 1923 (जन्मदिन)15 सप्टेंबर 2008 (स्मृतीदिन) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञसाहित्यसमीक्षक होते.

मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.