Current Affairs of 24 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2017)

समाजकल्याणच्या आणखी दोन योजना मंजूर :

 • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या 1 कोटी 93 लाख रुपयांच्या योजनांसोबतच आणखी 49 लाख रुपयांच्या खर्चातून दोन योजना राबवण्यास समितीच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार रोटाव्हेटर आणि टिनपत्र्यांसाठी 18 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे निश्‍चित केल्याचे सभापती रेखा देवानंद अंभोरे यांनी सांगितले.
 • समाजकल्याण विभागाकडून लाभार्थींच्या योजना गेल्या दोन वर्षांत रखडल्या. त्यामुळे गेल्यावर्षी निवड झाल्यानंतरही लाभार्थींना वस्तूंचे वाटप झाले नाही.
 • चालू वर्षी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांना लाभ कोणत्याही परिस्थितीत मिळणे आवश्यक आहे.
 • तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांसाठी लाभार्थी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 • तसेच यामध्ये लाभार्थींना एचडीपीई पाइप, प्लास्टिक ताडपत्री, पेट्रोकेरोसिन पंप, डीझल पंप, इलेक्ट्रिक पंप, पीव्हीसी पाइप, दिव्यांग लाभार्थींना पिठाची गिरणी, तीनचाकी सायकल, झेरॉक्स मशीनचा पुरवठा करण्याच्या योजनांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2017)

राज्यात होणार मेगा लष्करी भरती :

 • राष्ट्राच्या सेवेमध्ये आदराने आणि शौर्याने सहभागी होण्यासाठी युवकांना लष्कर भरतीची संधी मिळत आहे. यासाठी 1 ते 11 नोव्हेंबर 2017 या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.
 • मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छूक उमेदवारांसाठी अब्दुल कलाम आझाद क्रीडा मैदान, मुंब्रा, जि. ठाणे येथे सैन्य भरती मेळावा होणार आहे.
 • लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
 • लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव नोंदणी प्रक्रिया साधारणपणे 1 किंवा 2 सप्टेंबर 2017 पासून सुरू होणार असून 16 ऑक्टोबर 2017 पर्यंत चालू राहणार आहे.
 • सैन्य भरती मेळाव्याची प्रक्रिया सुलभतेने पार पडावी यासाठी आधी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2017 पासून भरती मेळाव्यासाठी प्रवेशपत्र उमेदवारांना देण्यात येतील.
 • ऑनलाईन अर्जावर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर प्रवेशपत्र उमेदवारांना पाठवली जातील. प्रवेशपत्र डाऊनलोड करून भरती मेळाव्याला उपस्थित राहताना घेऊन येणे आवश्यक आहे.
 • तसेच इच्छूक उमेदवारांनी (www.joinindianarmy.nic.in) या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी.

नऊ वर्षांनंतर कर्नल पुरोहित कारागृहमुक्त :

 • 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लेप्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित हे नऊ वर्षांनी कारागृहाबाहेर पडले.
 • नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून पुरोहितांची सुटका करण्यात आली.
 • प्रसाद पुरोहित यांनी लवकरात लवकर लष्करात रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते मुळचे पुण्याचे रहिवाशी आहेत.
 • 22 ऑगस्ट रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले. सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर पुरोहित तुरुंगाबाहेर आले.

रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष अश्विनी लोहानी :

 • एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे.
 • एकाच आठवड्यात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे बोर्डचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता.
 • दुसरीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला होता. परंतु, मोदींनी त्यांचा राजीनामा फेटाळला आहे.
 • अपघातानंतर सुरेश प्रभूंनी उत्कल एक्स्प्रेसची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. त्यानंतर रेल्वेने मोठी कारवाई करत उत्तर रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आर.एन. कुलश्रेष्ठ आणि दिल्ली विभागाचे  डीआरएम आर.एन. सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते.

दिनविशेष :

 • मराठी साहित्यिककेसरी वृत्तपत्राचे संपादक ‘नरसिंह चिंतामण केळकर’ ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांचा जन्म 24 ऑगस्ट 1872 मध्ये झाला.
 • राममनोहर लोहिया यांनी 24 ऑगस्ट 1955 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.