Current Affairs of 25 August 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2016)
साक्षी मलिक ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची ब्रँड ऍम्बेसिडर :
- रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिला हरियाना सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेची ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- साक्षीला हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते अडीच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला.
- साक्षीचे (दि.24) पहाटे भारतात आगमन झाले असून, दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
- साक्षी ही हरियानातील रोहतक जिल्ह्यातील मोखरा खास गावातील रहिवाशी आहे.
- साक्षीच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री खट्टर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
- साक्षीने 58 किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळविले होते.
Must Read (नक्की वाचा):
ईटीसी केंद्राला डी.एल.शाह सुवर्ण पुरस्कार :
- महानगरपालिकेचे ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करते.
- भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या गुणवत्तेचे मानांकन ठरविणाऱ्या नामांकित संस्थेमार्फत डी.एल.शाह सुवर्ण पुरस्कार 2016 या राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथील विशेष समारंभात ईटीसी केंद्राला गौरविण्यात आले आहे.
- भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष आदिल झैनुलभाई व डी.एल. शहा ट्रस्टचे अध्यक्ष हरी तनेजा यांच्या शुभहस्ते ईटीसी केंद्र संचालिका डॉ. वर्षा भगत यांनी स्वीकारला.
- क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत दिला जाणारा डी.एल.शाह पुरस्कार शासकीय संस्था, खाजगी संस्था, निमशासकीय संस्था, शिक्षण क्षेत्र, आर्थिक क्षेत्र अशा पंधरा विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तसेच बहुकौशल्य कार्यप्रणाली राबवित माहिती तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणाऱ्या संस्थांना प्रदान करण्यात येतो.
- महानगरपालिकेच्या ई.टी.सी. केंद्राला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या 11 व्या राष्ट्रीय बैठकीत पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्या कार्याचे माहितीप्रद सादरीकरण करण्याचा बहुमान देण्यात आला.
समाजकल्याण अधिकारी संदीप यादव सेवेतून बडतर्फ :
- रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संदीप यादव यांना तत्काळ सेवेतून कमी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरगांबाद खंडपीठाने दिले आहेत.
- तसेच यादव यांनी धारण केलेले महिला व बालकल्याण अधिकारी पद राज्य सरकारने भरण्यासाठी तातडीने जाहिरात प्रसिध्द करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
- सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र यादव यांनी सादर केले होते. त्यांची सेवा मॅटने 21 ऑगस्ट 2015 च्या आदेशाने खंडित केली होती.
- तसेच त्यानंतर यादव हे या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने मॅटचा आदेश कायम केल्याने यादवची गच्छंती झाली आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदीप यादव हे सेवेतून कमी होणार असले तरी त्यांच्या कार्यकालामधील गैरव्यवहारांबाबत जी चौकशी सुरू आहे ती थांबवू नये अशी मागणी केली जात आहे.
गृहमंत्री राजनाथसिंह काश्मीरच्या दौऱ्यावर :
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज (दि.25) जम्मू-काश्मीरमधील सुरक्षास्थितीचा आढावा घेतला.
- राजनाथसिंह यांचे दोनदिवसीय दौऱ्यासाठी येथे आगमन झाले असून, खोऱ्यातील विविध पक्षनेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. यासाठी त्यांनी काश्मिरियत, इन्सानियत आणि जम्हूरियतमध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना निमंत्रित केले आहे.
- काश्मीर खोऱ्यातील सद्यःस्थितीविषयी उच्च प्रशासकीय, लष्करी, पोलिस आणि निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांनी राजनाथसिंह यांना माहिती दिली.
- 8 जुलै राजी हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्यानंतर गेल्या 47 दिवसांपासून खोऱ्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
- दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सच्या सहा सदस्यांच्या शिष्टमंडळाने राजनाथसिंह यांची भेट घेऊन पॅलेट गनच्या वापरावर तातडीने बंदी घालण्याची तसेच काश्मीरबाबतीत सर्व पक्षांशी चर्चेला सुरवात करावी, अशी मागणी केली.
कायद्याचे उल्लंघन करू नका :
- तालुका व रेल्वे स्थानक परिसरात सणांदरम्यान वाढीव पोलीस गस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील.
- सर्व नागरिकांनी उत्सवांचा आनंद जरूर लुटावा परंतु कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी केले.
- तर आपल्या परिसरात समाजात तेढ निर्माण करणारे प्रसंग उद्भवल्यास अशा प्रसंगी सामोपचाराची भूमिका शांतता समितीच्या सदस्यांनी घ्यावी अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी व्यक्त केली.
- रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्याची शांतता समितीची सभा संपन्न झाली.
- अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी रोहा शहरातील वाहतूक समस्या तसेच रोहा रेल्वे स्थानक परिसरात सणांदरम्यान वाढीव पोलीस गस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.
दिनविशेष :
- 1609 : गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
- 1718 : न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
- 1768 : जेम्स कूक आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
- 1923 : मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ, गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा