Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 26 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2016)

वर्ल्ड बॅंकच्या अध्यक्षपदी पुन्हा जिम योंग किम :

 • जागतिक बॅंकेचे (वर्ल्ड बॅंक) अध्यक्ष जिम योंग किम यांचे नाव पुन्हा अध्यक्षपदासाठी अमेरिकेने जाहीर केले आहे.
 • दारिद्य्र आणि हवामान बदलच्या आव्हानांना नावीन्यपूर्ण सामोरे जाण्याची क्षमता किम यांच्यात आहे, असे अमेरिकेचे मत आहे.
 • अमेरिकेचे कोषागार विभागाचे मंत्री जॅकब जे लू यांनी किम यांच्या नावाची घोषणा केली.
 • लू म्हणाले, ‘किम’ त्यांच्या कारकीर्दीत जागतिक विकासासमोरील आव्हानांना नावीन्यपूर्ण पद्धतीने सामोरे गेले आहेत.
 • दारिद्य्र, असमानता आणि हवामान बदलाबाबतही त्यांनी पावले उचलली आहेत.
 • ‘इबोला’ आणि निर्वासित यासारखे मोठे प्रश्‍न त्यांनी हाताळले आहेत.
 • तसेच, जागतिक बॅंकेत सुधारणा करण्याचे काम ते करीत असून, वित्तीय स्त्रोतांचा वापर ते वाढवीत आहेत.
 • जागतिक बॅंकेत अमेरिका सर्वांत मोठा भागीदार देश आहे. त्यामुळे अमेरिकेकडून किम यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांची पुन्हा निवड निश्‍चित मानली जात आहे.
 • जुलै 2012 मध्ये किम यांनी जागतिक बॅंकेचे बारावे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2016)

मानवतावादी समाजसेविका मदर तेरेसा यांची जयंती :

 • थोर मानवतावादी समाजसेविका मदर तेरेसा यांची आज (26 ऑगस्ट) जयंती आहे.
 • भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिलाशांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी असलेल्या मदर तेरेसा यांचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू हे आहे.
 • 26 ऑगस्ट 1910 साली रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात त्यांचा जन्म स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला.
 • वयाच्या अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात त्यांनी प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे इंग्रजी भाषेचा अभ्यास केला.
 • तसेच त्यानंतर त्यांनी जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त त्या भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाल्या.
 • 1929 स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने त्यांचे नामांतर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे त्या ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

नसिरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्राचे मराठीत रूपांतर :

 • खलनायक, नायक व चरित्र अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी लिहिलेले आत्मचरित्र ‘ऍण्ड देन वन डे’ मराठीत अनुवादित करण्यात आले आहे.
 • ‘आणि मग एक दिवस’ असे या पुस्तकाचे नाव असून सई परांजपे यांनी हा अनुवाद केला आहे.
 • नुकतीच मुंबईत याविषयी एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या वेळी अभिनेते नसिरुद्दीन शाह, सई परांजपेपॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित होते.
 • तसेच या मराठी अनुवादाचे प्रकाशन 2 सप्टेंबरला प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी अभिनेते सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.

ई-मेल आयडी आता मराठीत सुरू :

 • स्टार्ट-अप कंपनी दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीने देवनागरी लिपित ई-मेल देण्याची सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा मोफत नाही. तथापि, ती लवकरच मोफत उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
 • तसेच ही सेवा मोफत सुरू झाल्यास भारतात जी-मेल, आऊटलूक आणि याहू या कंपन्यांच्या ई-मेल आयडी सेवांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
 • हिंदी, मराठी, नेपाळी आदी अनेक प्रमुख भारतीय भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. या भाषा वापरणारे लोक देवनागरी ई-मेल आयडीला पसंती देऊ शकतील.
 • दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अजय दाता यांनी सांगितले की, शे-दोनशे आयडी आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत.
 • ‘डॉट भारत’ या डोमेनवर ते आहेत. आमच्या वेबसाईटवर जाऊन कोणीही देवनागरीतील ई-मेल आयडी विकत घेऊ शकतो. या वेब पत्त्यावरून पाठवलेले मेल जी-मेल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांच्या सेवा यंत्रणांमध्ये स्वीकारले जात आहेत.
 • नेटवर हिंदी देवनागरीची सोय यापूर्वीच झाली आहे. आता देवनागरी लिपीत ई-मेल अ‍ॅड्रेस तयार करण्याची सोय आम्ही दिली आहे.
 • इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने घेतलेल्या एका बैठकीत गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी देवनागरी ई-मेल आयडी स्वीकारण्याचे मान्य केले आहे.

महाराष्ट्रातील एक हजार गावे होणार आदर्श :

 • राज्यातील एक हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हाती घेतला असून कॉर्पोरेट, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा कायापालट पूर्णत्वाला नेला जाणार आहे.
 • राज्यातील 100 गावांचा पथदर्शी कार्यक्रम 2 ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर सुरू करण्याचा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केला.
 • राज्य सरकार खासगी उद्योजकांच्या मदतीने ‘कॉर्पस फंड’ तयार करून त्यातून गावांचा सर्वंकष विकास करण्यावर भर देणार आहे.
 • तसेच या गावांमध्ये पाणी व्यवस्थापन, शिक्षण, कौशल्यविकास अभ्यासक्रम, महिला व बालकल्याण विकास अशा सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्यात येणार आहे.
 • हजार गावे निवडताना 25 टक्‍के गावे आदिवासी भागातील असावीत, तसेच किमान 50 टक्‍के गावे मानवी निर्देशांक अहवालात पिछाडीवर असणारी निवडावीत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 • जल, जंगल आणि जमीन यांचा सुयोग्य वापर करून गावात शाश्‍वत विकासाची ठिकाणे निर्माण व्हावीत यावर भर दिला जाणार आहे.
 • कंपन्यांच्या ‘सीएसआर फंड’मधून होणारे काम तसेच सरकारी उपक्रम एकत्र आणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास करता येईल.

दिनविशेष :

 • 1910 : समाजसेविका; ‘नोबेल पारितोषिक’ आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित मदर तेरेसा यांचा जन्मदिन.
 • 1922 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गणेश प्रभाकर प्रधान यांचा जन्मदिन.
 • 1948 : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, ‘केसरी’चे संपादक स्मृतीदिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2016)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World