Current Affairs of 24 August 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2016)
श्रीमंत देशांमध्ये भारत 7 व्या स्थानी :
- जगातील 10 श्रीमंत देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे.
- भारतातील एकूण व्यक्तीगत संपत्ती 5600 अब्ज डॉलर्स आहे.
- तसेच अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
- न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार टॉप टेन श्रीमंत देशांच्या यादीत भारत 7 व्या स्थानावर आहे.
- कॅनडा 8, ऑस्ट्रेलिया 9 आणि इटली 10 व्या स्थानावर आहे.
- पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत एकूण व्यक्तीगत संपत्ती 48,900 अब्ज डॉलर्स आहे.
- चीन दुस-या आणि जापान तिस-या स्थानावर आहे. चीनमध्ये एकूण व्यक्तीगत संपत्ती 17,400 अब्ज डॉलर्स आणि जापानमध्ये 15,100 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
- तसेच या यादीत इंग्लंड 4,जर्मनी 5 व्या आणि फ्रान्स 6 व्या स्थानावर आहे.
Must Read (नक्की वाचा):
तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष :
- लालबागमधील सुप्रसिद्ध असलेले तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
- 1967 साली स्थापन झालेले हे मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक जाणिवेतून सांस्कृतिक वारसा जपत आहे.
- तसेच या मंडळाचा बाप्पा दरवर्षी वेगवेगळ्या रूपात विराजमान होतो.
- 1972-73 साली मूर्तिकार विठ्ठल झाड हे या बाप्पाची मूर्ती साकारत होते. त्यानंतर मूर्ती घडविण्याची जबाबदारी गेली अनेक वर्षे त्यांचे पुत्र मूर्तिकार राजन झाड यांनी स्वीकारली आहे.
- बुद्धीची देवता असलेली नयनरम्य व सुबक मूर्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त दूरवरून येत असतात.
- ‘संकल्पपूर्ती राजा तेजुकायाचा’असे या मंडळाचे ब्रीदवाक्य आहे.
- पारंपारिक वाद्यांच्या गजरात 28 ऑगस्ट रोजी या बाप्पाचा आगमन सोहळा रंगणार आहे.
आर. अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला :
- रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध 2-0 ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.
- रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शतके लगावत 17 बळीही घेतले.
- अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
- अश्विनने या मालिकेत दोन शतकाच्या मदतीने 235 धावा काढल्या. डावात दोनदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेताना एकूण 17 विकेट घेतल्या.
- अश्विन कसोटी मालिकेत सहाव्यांदा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
- सामनावीर पुरस्काराच्या शर्यतीत त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.
जेनिफर लॉरेन्स जगभरात सर्वात जास्त कमावणारी अभिनेत्री :
- हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स पुन्हा एकदा जगभरात सर्वात जास्त कमावणारी अभिनेत्री ठरली आहे. गेल्यावर्षी 2015 मध्येही तिचे नाव ‘टॉपटेन’च्या यादीत होते.
- फोर्ब्सने 2016 मध्ये सर्वांत जास्त कमाई करणा-या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे.
- पहिल्या क्रमांकावर ऑस्कर विजेती जेनिफर लॉरेन्स आहे. दुस-या क्रमांकावर मेलिसा मॅक्कथी आहे.
- तसेच, विशेष म्हणजे यंदाच्या फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा आहे. यामध्ये दीपिका पादुकोण दहाव्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्राला 13.8 टीएमसी पाणी :
- महाराष्ट्रातील प्राणहिता, गोदावरी व पैनगंगा या नद्यांवरील तुमडीहेटी, मेडिगट्टा आणि चनाखा-कोर्टा असे तीन बंधारे (बॅरेज) बांधण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
- तसेच यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 13 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 20 गावांची मिळून 264 हेक्टर नदीकाठची जमीन कायमची पाण्याखाली जाणार आहे.
- महाराष्ट्राला 13.8 टीएमसी, तर तेलंगणला तब्बल 161.2 टीएमसी पाणी मिळणार आहे.
- तेलंगणसाठी गेमचेंजर ठरणारा हा निर्णय महाराष्ट्रातील पाण्यावर घेतला जाणार आहे. या तीनही नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत.
- गेल्यावर्षी गोदावरीतील 1 हजार टीएमसी पाणी वाहून गेले. याबाबत बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, तीन बंधाऱ्यांमुळे राज्यातील एकही गाव पाण्याखाली जाणार नाही. जास्तीत जास्त पाणी नदीपात्रात साठवले जाईल.
- तसेच नदीकाठच्या बुडीत होणाऱ्या जमिनीचा मोबदला नवीन भूसंपादन कायद्यानुसार दिला जाणार आहे.
इंटरनेट सर्विसला 25 वर्ष पूर्ण :
- 1991 मध्ये (दि.23) या दिवशी इंटरनेट सगळ्यासाठी खुले करण्यात आले होते.
- तेव्हांपासून आजतागत इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे आणि भविष्यातही ती संख्या वाढतच जाणार आहे.
- इंटरनेट हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्चे चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. त्याला World Wide Web (WWW) असे म्हटले जाते.
- 1969 मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले.
- जगातील छोट्या नेटवर्कला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय.
- 1992 मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (WWW) आपल्या पर्यंत पोहचले.
- तसेच यापूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स, एनीमेशन, ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते.
- वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले आणि इंटरनेट 21 व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचे प्रभावी साधन बनले.
- इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे. तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब.
80 वर्षापूर्वी अॅडॉल्फ हिटलरच्या हस्ते सिद्धनाथ काणेंना प्लॅटिनम मेडल :
- रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूच्या पदकाकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले असताना यवतमाळकरांच्या 80 वर्षापूर्वी झालेल्या ऑलिम्पिकच्या आठवणी ताज्या झाल्या.
- 1936 साली जर्मनीच्या बर्लिंन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये यवतमाळच्या तरुणांनी यशाचा झेंडा रोवला होता.
- जर्मनीचा हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलर यांनी स्वस्तिक आकाराचे प्लॅटिनम मेडल स्वत:च्या हाताने यवतमाळच्या खेळाडूंना प्रदान केले होते.
- तसेच ते खेळाडू बंधू म्हणजे डॉ.सिद्धनाथ कृष्णाजी काणे व श्रीपाद दत्तात्रय काणे होय.
- यवतमाळचे धनवंतरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मधुसुदन काणे यांचे वडील असलेल्या सिद्धनाथ काणे यांनी आपल्या अंगभूत क्रीडा गुणांच्या कौशल्याने बर्लिंनमध्ये हिटलरलाही प्रभावित केले होते.
- बर्लिंनमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताला कबड्डी, मलखांब व आट्यापाट्या या खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आमंत्रित केले होते.
- तसेच या अस्सल देशी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्याची जबाबदारी अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळावर होती. त्यांनी बर्लिंनला जाण्यासाठी 25 खेळाडूंचे पथक तयार केले. या पथकाचे नेतृत्व डॉ. सिद्धनाथ काणे यांच्याकडे होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा