Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 24 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2017)

उत्तर कोरियानंतर आता इराणचे अमेरिकेला आव्हान :

 • उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला आव्हान दिले असून इराणने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली.
 • अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराणने क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
 • हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. इराणने नियमाला अनुसरुनच क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा केला आहे.
 • तर इराणने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केला असा अमेरिकेचा दावा आहे.
 • जुलै 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे पाच कायम सदस्य, युरोपियन युनियन आणि इराण यांच्यात अणुप्रश्नाविषयी सर्वसहमती झाली होती.
 • यानंतर इराणवरील आर्थिक आणि राजकीय बंधने उठवण्यात आली होती.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच इराणवर निर्बंध घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती.
 • यानुसार इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणारे आणि या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी आर्थिक हितसंबंध असलेल्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता

पाकिस्तानकडून अरबी समुद्राच्या उत्तर भागात क्षेपणास्त्र चाचणी :

 • पाकिस्तानच्या नौदलाने अरबी समुद्राच्या उत्तर भागात एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.
 • ‘एअर टू सरफेस’ अर्थात हवेतून जहाजाकडे मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.
 • अँटी शिप मिसाईलची (जहाज नष्ट करणारे क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी करण्यात आली.
 • या क्षेपणास्त्राची चाचणी एका हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आली असल्याची माहिती पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्याने दिली आहे.
 • हेलिकॉप्टरद्वारे या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याने आम्हाला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी चांगली मदत होऊ शकणार आहे असेही नौदलाने म्हटले आहे.
 • पाकिस्तानच्या युद्ध क्षमतेला या चाचणीमुळे वेगळी उंची लाभली आहे असेही नौदल अधिकारी जकाउल्लाह यांनी म्हटले.

निवडणुकांमध्ये आता व्हीव्हीपेएटीचा वापर होणार :

 • गुजरात आणि हिमाचल प्रदेशात या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफिबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपेएटी)चा वापर करण्यात येणार आहे.
 • मात्र, या दोन्ही राज्यांमध्ये या मतदान पावत्यांची मोजणी होईलच असे नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
 • निवडणुकांमध्ये पूर्णपणे व्हीव्हीपेएटीचा वापर होणारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही देशातील पहिली राज्ये ठरणार आहेत.
 • यापूर्वी गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काही भागात व्हीव्हीपेएटीचा वापर करण्यात आला होता.
 • गेल्या काही काळात सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे ईव्हीएम मशिन्सची विश्वासार्हता ढासळू लागली होती.
 • त्यामुळेच निवडणूक आयोगाने आता अधिक काटेकोर धोरणे अवलंबली असून त्यासाठी नवे तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे.
 • या पार्श्वभूमीवर, व्हीव्हीपेएटीचा वापर केल्यास मतदात्याला आपण दिलेल्या मतदानाची पावती मिळणार आहे.
 • यावर आपण कोणाला मतदान केले याची माहिती असणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेतील फेरफार रोखता येईल.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World