Current Affairs of 23 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2017)

भारतातर्फे ‘न्यूटन’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत :

 • अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ या चित्रपटाची निवड 2018 मध्ये होणाऱ्या अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी झाली आहे.
 • भारतातर्फे हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असेल. ‘परकी भाषेतील उत्कृष्ट चित्रपट’ विभागातून हा चित्रपट शर्यतीत उतरेल.
 • तसेच ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या समितीने 22 सप्टेंबर रोजी ही घोषणा केली.
 • ही माहिती देताना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव सुप्राण सेन म्हणाले, ‘ऑस्करला चित्रपट पाठवला जावा म्हणून एकूण 26 प्रवेश अर्ज आले होते. त्यापैकी सर्वांनीच एकमताने ‘न्यूटन’ची निवड केली. या चित्रपटात न्यूटनकुमारची भूमिका राजकुमार राव याने केली आहे.
 • रघुवीर यादव, पंकज त्रिपाठी, अंजली पाटील यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
 • 4 मार्च 2018 मध्ये होणाऱ्या 90 व्या ॲकॅडमी ॲवॉर्डसाठी हा चित्रपट आता पात्र ठरला आहे.

मुलींच्या जन्मदरवृद्धीत औरंगाबाद तिसऱ्या स्थानी :

 • जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिल्याने मुलीच्या जन्मदरवृद्धीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
 • एवढेच नव्हे तर उद्दिष्टाच्याही पलीकडे काम केल्याने औरंगाबाद जिल्हा मुलींचा जन्मदर वाढवण्यात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. एक हजार मुलांमागे 929 एवढी मुलींची संख्या आहे.
 • बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी सांगितले, की जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर दरहजारी किमान 880 पर्यंत वाढवावा, असे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.
 • जिल्ह्यात ‘बेटी बचाव बेटी पढाव’, ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजना राबवून मुलींच्या जन्मदरवृद्धीसाठी प्रबोधन करण्यात आले. मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, मुलीच्या आहाराकडे लक्ष पुरवणे यासारखे उपक्रम या विभागातर्फे राबवण्यात येतात. परिणामी मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन तो 929 पर्यंत पोचला आहे. या कामाबद्दल केंद्र सरकारनेही जिल्ह्यातील कामांची प्रशंसा केली आहे.

उबर टॅक्सी लंडनमधून हद्दपार होणार :

 • ‘उबर’ या अमेरिकी कंपनीला लंडनमधील परिवहन विभागाने दणका दिला. ‘उबर’च्या लंडनमधील टॅक्सी सेवेच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यास परिवहन विभागाने नकार दिला आहे.
 • 30 सप्टेंबरला ‘उबर’चा लंडनमधील परवाना संपणार असून परिवहन विभागाच्या निर्णयाला ‘उबर’ला न्यायालयात आव्हान देता येणार आहे.
 • ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी ‘उबर’ ही अमेरिकेतील कंपनी असून जभरातील विविध शहरांमध्ये ‘उबर’तर्फे टॅक्सी सेवा दिली जाते.
 • ‘उबर’ कंपनी लंडनमध्ये टॅक्सी सेवा देण्यास सक्षम नाही असे परिवहन विभागाने म्हटले आहे. या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे ‘उबर’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • ‘उबर’ला 21 दिवसांच्या आत या निर्णयाला आव्हान देता येणार आहे. ही प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत ‘उबर’ला लंडनमध्ये टॅक्सी सेवा सुरु ठेवता येईल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया प्रथम स्थानी :

 • कोलकाता येथे झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया 50 धावांनी सहज लोळवल्यानंतर आयसीसी क्रमवारीतही प्रगती करताना थेट अव्वल स्थानी झेप घेतली. यासह, आता कसोटीसोबतच, एकदिवसीय क्रमवारीमध्येही भारतीय संघ अव्वल स्थानी पोहचला आहे.
 • या सामन्याआधी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेहून एका स्थानाने मागे व्दितीय स्थानी होता. त्याचवेळी, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाची तिस-या स्थानी घसरण झाली होती. जर, भारताने दुसरा सामना गमावला असता, तर त्यांची थेट तिसर्‍या स्थानी घसरण झाली असती आणि ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान काबिज केले असते.
 • तसेच नव्या क्रमवारीनुसार इंग्लंड आणि न्यूझीलंड अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
 • सध्या भारतीय संघाचे एकूण 120 गुण असूनदुसर्‍या स्थानी घसरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे 119 गुण आहेत. तिसर्‍या स्थानवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यामध्ये 114 गुणांची नोंद आहे.

नागपूरमध्ये देशाचे केंद्र होण्याची क्षमता :

  • नागपूरचा विकास गतीने होत आहे. गडकरी व फडणवीस हे दोन्ही नेते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नागपूर स्मार्ट सिटी होणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात नागपूरचा विकास होत आहे. देशाचे हृदयस्थान असलेल्या या शहरात देशाच्या विकासाचे केंद्र होण्याची क्षमता आहे, अशा शब्दात राष्ट्रपती कोविंद यांनी नागपूरचे महत्त्व अधोरेखित केले.
  • नागपूर महापालिकेतर्फे रेशीमबाग मैदानावर उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण व कवी सुरेश भट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.
  • तसेच यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल उपस्थित होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.