Current Affairs (चालू घडामोडी) of 24 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर |
2. | प्रतापराव पवार यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर |
3. | ली कुआन यू यांचे निधन |
4. | दिनविशेष |
शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर :
- शशी कपूर यांना आज सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- केंद्र सरकारतर्फे भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणार्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.
- शशी कपूर यांनी आजवरच्या कारकिर्दीत नायक, चरित्रनायक, निर्माता व दिग्दर्शक अशी चौफेर वाटचाल केली.
- फाळके पुरस्कार मिळणारे शशी कपूर हे 46 वे व्यक्ती असतील.
- 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण या तिसर्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):
प्रतापराव पवार यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर :
- सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पुरस्करची घोषणा केली.
ली कुआन यू यांचे निधन :
- सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांचे सोमवारी निधन झाले.
- ते 91 वर्षाचे होते.
दिनविशेष :
- 24 मार्च – राष्ट्रीय क्षय दिन
- 1929 – लाहोर कॉग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन
- 1934 – मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेची पुण्यात स्थापना.
- 1977 – मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
- 1968 – संगमणेर सरकारी कारखान्याचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन.