Current Affairs (चालू घडामोडी) of 23 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. राजेंद्र सिंह यांना पाणी पुरस्कार घोषित
2. 317 कोटींचा खर्च मोदींच्या प्रदेशदौर्‍यावर
3. आता सातही दिवस दुकाने खुली
4. पाठवा पैसे आता फेसबूक मेसेंजरवरूनही
5. नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविणार
6. रामकृष्णन होणार रॉयल सोसायटीचे अध्यक्ष

 

 

 

राजेंद्र सिंह यांना पाणी पुरस्कार घोषित :

 • राजेंद्र सिंह यांना 2015 चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
 • पाणी पुरस्कार नोबेलसारखाच समजला जातो.
 • भारतीय जल संवर्धंनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
 • 150,000 डॉलर आणि विशेष मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • तसेच 26 ऑगस्ट रोजी जागतिक जल सप्ताहादरम्यान त्यांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 • 2001 मध्ये राजेंद्र सिंह यांना रेमन ‘मॅगेसेसे‘ने गौरविण्यात आले होते.

317 कोटींचा खर्च मोदींच्या प्रदेशदौर्‍यावर :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रदेश दौर्‍यावर सरकारी तिजोरीतून 317 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
 • यूपीए 2 मधील मंत्रिमंडळाच्या परदेशी दौर्‍यापेक्षा मोदी सरकारच्या परदेश दौर्‍यावरील खर्चात 58 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आता सातही दिवस दुकाने खुली :

 • राज्यातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील 365 दिवसही आपली दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे.
 • याआधी दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुट्टी बंधनकारक होती.
 • तसेच महिला कर्मचार्‍यांचा वेळ दीड तासाची सवलत देत 9.30 असा करण्यात आला आहे याआधी तो 8 वाजेपर्यंतच होता.

पाठवा पैसे आता फेसबूक मेसेंजरवरूनही :

 • फेसबुक मेसेंजरमध्ये आता एक नवे फीचर अॅड केले जाणार असून आता फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून तुम्ही पैसे ट्रान्स्फर करू शकता.
 • महितींनुसार फेसबुक मेसेंजरमधून पैसे ट्रान्स्फर करण्याचे फीचर सध्या अमेरिकेतील फेसबूक यूजरसाठीच उपलब्ध केले जाणार आहे.
 • या फीचरचा लाभ घेण्यासाठी डेबिट कार्डची नोंद करावी लागणार आहे.

नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविणार :

 • 4.50 लाख रूपयांएवजी 6 लाख रुपये नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा होणार आहे.
 • याची अमलबजावणी ह्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.

रामकृष्णन होणार रॉयल सोसायटीचे अध्यक्ष :

 • भारतीय वंशाचे नोबेल परितोषिक विजेते वेंकटरमन रामकृष्णन यांची रॉयल सोसायटीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 • 1 डिसेंबर 2015 ला ते सोसायटीचे अध्यक्षपदाचा पदभार सांभाळणार आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.