Current Affairs (चालू घडामोडी) of 21 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | खाणी आणि खनिज पदार्थ विधेयक राज्यातही मंजूर |
2. | केंद्र सरकारचे कर्मचारी करणार योगासन |
3. | चावदार तळ्याचा 88 वा वर्धापन दिन |
4. | कृष्णराव साबळे यांचे निधन |
5. | रामराजे निंबाळकर यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड |
खाणी आणि खनिज पदार्थ विधेयक राज्यातही मंजूर :
- खाणी आणि खनिज पदार्थ विधेयकास शुक्रवारी राज्यसभेतही मंजूर मिळाली.
- विधेयक राज्यसभेमध्ये 117 विरुद्ध 69 मतांनी मंजूर करण्यात आले आहे.
- या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची मंजूरी मिळाल्यामुळे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर केंद्रसरकारने यासंदर्भात काढलेल्या वटहुकूमाचे रूपांतर कायद्यात होईल.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकारचे कर्मचारी करणार योगासन :
- 1 एप्रिल पासून देशभरातील केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचार्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी योगासनाचे वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.
- पर्सोनेल व प्रशिक्षण खात्याने शुक्रवारी या संदर्भात आदेश काढला आहे. तर रविवारी व सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवस हे वर्ग घेण्यात येणार आहेत.
- यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी किंवा शुल्क असणार नाही.
चावदार तळ्याचा 88 वा वर्धापन दिन :
- महाड येथे शुक्रवारी चावदार तळ्याचा 88 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांती घडवली होती.
कृष्णराव साबळे यांचे निधन :
- प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे शुक्रवारी मुंबईमध्ये निधन झाले.
- ते 94 वर्षाचे होते.
रामराजे निंबाळकर यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड :
- राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी पदासाठी शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा……….