Current Affairs (चालू घडामोडी) of 25 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. 62 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा
2. डॉ. माधव गाडगीळ यांना ‘टायलर पुरस्कार’ जाहीर
3. वादग्रस्त कलम ’66 अ’ रद्द

62 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा :

 • दिल्लीत 62 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
 • चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट‘हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोकृष्ट चित्रपट ठरला आहे.
 • तर रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा‘ला सर्वोकृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • मराठी भाषा श्रेणीत किल्ला हा सर्वोकृष्ट चित्रपट तर एलिझाबेथ एकादशी हा सर्वोकृष्ट बालचित्रपट ठरला.
 • हिंदी चित्रपटांमध्ये ‘क्वीन‘ला सर्वोकृष्ट चित्रपट तर कंगणा राणावतला सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला.

डॉ. माधव गाडगीळ यांना ‘टायलर पुरस्कार’ जाहीर :

 • ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि केंद्र सरकारच्या पश्चिम घाट पर्यावरण अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांना ‘टायलर पुरस्कार‘ जाहीर.
 • पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘टायलर पुरस्कार‘ दिला जातो.
 • तसेच अमेरिकी सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. लुबचेंन्को यांनाही हे परितोषिक जाहीर झाले आहे.
 • दोन लाख अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • अमेरिका, भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संवर्धन आणि शाश्वत धोरणांच्या विकासासाठी कार्यरत राहिल्याबद्दल आणि त्यासाठी नेतृत्व केल्या बद्दल दोघांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 • इंटरनॅशनल टायलर प्राईझ एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि अमेरिकेचा साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाचा वतीने हा पुरस्कार दिला जातो.
 • 24 एप्रिल रोजी या दोघांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

वादग्रस्त कलम ’66 अ’ रद्द :

 • सोशल नेटवर्किंग साईट्सवर एखादी आशेपार्ह पोस्ट टाकण्याप्रकरणी दाखल करण्यात येणारे वादग्रस्त कलम ‘66 अ‘ रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे.
 • माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत येणारे हे कलम रद्द करण्यात आले आहे.

दिनविशेष :

 • 1904 – हिंदुस्थानात पहिला सरकार कायदा अस्तित्वात आला.
 • 1983 – जगातील अत्याधुनिक सागरी संशोधन करणारी बोट ‘सागरी कन्या’ हिचे जलावरण.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.