Current Affairs of 24 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 जून 2017)

चालू घडामोडी (24 जून 2017)

दिव्यांगांसाठी विशेष विद्यालय स्थापन होणार :

 • राज्यातील दिव्यांगाना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
 • दिव्यांगांना संगणकीय अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे, यासाठी राज्यात मिशन ‘झीरो पेंडन्सी’ अभियान सुरू करणार आहे, तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष महाविद्यालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
 • अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशदा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ‘आत्ममग्नता जाणीव जागृती कार्यशाळे’चे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
 • तसेच या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अंपग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश डिंगळे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, डॉ. समीर दलवाई, डॉ. अंजली जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जून 2017)

‘नीट’ परीक्षामध्ये अभिषेक डोग्रा राज्यात प्रथम :

 • वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट’च्या निकालात पुण्यातील अभिषेक डोग्रा हा राज्यात पहिला, तर पुण्यातील रुचा हेर्लेकर ही देशात 33 वे स्थान मिळवून राज्यात दुसरी आली आहे.
 • देशपातळीवर पंजाबच्या नवदीप सिंगने अव्वल क्रमांक पटकावला. त्याने 700 पैकी 697 गुण मिळविले. मध्य प्रदेशच्या अर्चित गुप्ताने दुसरा आणि मनीष मुलचंदानीने तिसरा क्रमांक मिळविला.
 • देशातील अंदाजे 11 लाख 38 हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट 2017’ ची परीक्षा दिली. भारतातील सुमारे 470 वैद्यकीय महाविद्यालयांमधील 65 हजार 170 एमबीबीएस जागा आणि 25 हजार 730 दंतवैद्यक (बीडीएस) जागांसाठी प्रवेशप्रक्रिया याच परीक्षेतील गुणांच्या आधारे होईल.
 • तसेच नीट परीक्षा ही 720 गुणांची असून, त्यापैकी 360 गुण हे जीवशास्त्र व प्रत्येकी 180 गुण हे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसाठी आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या प्रवेशासाठी 425 पेक्षा अधिक गुणांची गरज असते.

लंडन मराठी संमेलन 2017 :

 • महाराष्ट्र मंडळ लंडनच्या 85व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त लंडन मराठी संमेलन 2017 थाटामाटात साजरा करण्यात आला. यात ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ च्या विश्वस्त समितीचे आणि सभासदांचे विशेष आभार मानण्यात आले.
 • महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र मंडळ लंडनच्या 85व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त, लंडन मराठी संमेलन 2017 आजोजित करण्यात आले होते.
 • लंडन मराठी संमेलन (एलएमएस 2017) ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली ज्याच्यात 150 होऊन अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित होते.

भारतातील पहिले अंडरवॉटर मेट्रो टनल :

 • हुगली नदीखाली सुरु असलेले बोगद्याचे काम पुर्ण झाले असून लवकरच या मार्गावरुन मेट्रो धावताना दिसणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.
 • कोलकातामध्ये ही मेट्रो धावताना दिसणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. या मार्गावर नदीखालून धावणारी मेट्रो पाहायला मिळणार आहे.
 • कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचे बंधकाम केले आहे. ”या कामगिरीसोबतच भारत काही ठराविक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 1984 मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यानंतर कोलकाताने मिळवलेले हे दुसरे महत्वाचे यश आहे. कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या टीमने ज्यामध्ये परदेशातील अभियंत्यांचाही समावेश आहे, त्यांनी हे अंडरवॉटर टनलचे काम पुर्ण केले आहे”, अशी माहिती कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार यांनी दिली आहे.  

दिनविशेष :

 • इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म 24 जून 1863 मध्ये झाला.
 • 24 जून 1961 रोजी आशियातील पहिले ध्वनी वेगी विमान भारतात तयार झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World