Current Affairs of 26 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 जून 2017)

चालू घडामोडी (26 जून 2017)

श्रीकांतने पटकाविले ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद :

  • इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियातही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
  • ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगचा 22-20, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.  
  • आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील श्रीकांतचे हे चौथे सुपरसीरिज विजेतेपद आहे. याआधी त्याने 2014 साली चीन ओपन, 2015 साली इंडिया ओपन, 2017 साली इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद त्याने पटकावले होते.
  • तसेच श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जून 2017)

भारतीय कर्णधार मिताली राजचे नवीन पराक्रम :

  • महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात मिताली राजने 73 चेंडूंत 8 चौकारांसह 71 धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली.
  • मिताली राजने सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. मितालीने गेल्या सहा वनडे डावांत नाबाद 62, 54, नाबाद 51, नाबाद 73, 64 आणि नाबाद 70 धावा केल्या.
  • महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी मिताली पहिली क्रिकेटपट्टू ठरली आहे.
  • मितालीआधी एकालाही हा रेकॉर्ड करता आलेला नाहीये. मितालीने ठोकलेल्या सात अर्धशकांमध्ये चार अर्धशतके दक्षिण आफ्रिकेविरोधात तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरोधात प्रत्येकी एक अर्धशतकी खेळी केली आहे.

महाराष्ट्राच्या दिया चितळेला सुवर्ण पदक :

  • महाराष्ट्राच्या दिया चितळेने चमकदार कामगिरी करताना मध्य विभाग राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या सब ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी, प्रिथा वर्तीकर हिला मुलींच्या कॅडेट गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • इंदोर येथील अभय प्रसाद बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दियाने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मुनमुन कुंडूचा सहज पराभव केला. तीने सलग चार गेम जिंकताना 6-11, 11-8, 11-2, 11-4, 11-9 असे दिमाखदार जेतेपद पटकावले.

संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ.बी.एम. हिर्डेकर कुलसचिव :

  • अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ.बी.एम. हिर्डेकर यांची नियुक्ती झाली. विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन डॉ. हिर्डेकर यांचे स्वागत केले.
  • संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सची अल्पावधीत झालेली नेत्रदीपक प्रगती, वर्ल्ड क्‍लास इन्फ्रा, नॅककडून ‘अ’ दर्जा, एनबीए मानांकन, आयएसओ मानांकन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असणारा प्राध्यापक वर्ग यांचे परीक्षण करून शासनाने विद्यापीठाला मान्यता दिली आहे.
  • गेल्या 40 वर्षांपासून डॉ. हिर्डेकर शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक ते प्राचार्य अशा पदांवर काम करत त्यांनी शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव, परीक्षा नियंत्रक म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे.

दिनविशेष :

  • 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे.
  • 26 जून 1945 मध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना झाली.
  • पुणे महापालिकेचा कारभार मराठी भाषेतून करण्याचा ठराव 26 जून 1958 मध्ये मंजुर करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.