Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 23 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 जून 2017)

चालू घडामोडी (23 जून 2017)

ध्वनिक्षेपकास शांतता क्षेत्रात परवानगी नाही :

 • ‘शांतता क्षेत्रात’ ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी न देण्याचा आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.
 • सरकारने दिलेल्या या माहितीनंतर उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर काढलेली अवमान नोटीस रद्द केली.
 • ‘शांतता क्षेत्रात’ मोडणाऱ्या माहीम पोलीस ठाण्यातच उरूसदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना व साहाय्यक पोलीस आयुक्तांना अवमान नोटीस बजावली. गेल्या सुनावणीत दोन्ही अधिकाऱ्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.
 • मात्र राज्य सरकारकडून ‘शांतता क्षेत्रात’ ध्वनिक्षेपक लावू न देण्यासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने न्यायालयाने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची माफी स्वीकारली नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जून 2017)

साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना जाहीर :

 • मराठी साहित्यासाठीचा यंदाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना तर युवा पुरस्कार राहुल कोसंबी यांना जाहीर झाला.
 • कडू यांना ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीसाठी तर कोसंबी यांना ‘उभा आडवा’ या निबंधासाठी पुरस्कार मिळाला.
 • तसेच ताम्रपत्र50 हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप असून 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात ते प्रदान करण्यात येतील.
 • कोकणी भाषेतील युवा पुरस्कार अमेय विश्राम नाईक यांना (मोग डॉट कॉम हा काव्यसंग्रह) आणि विन्सी क्वाड्रोस यांना (जादूचे पेतुल कादंबरी) बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • अकादमीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत 24 भाषांमधील साहित्याची बालसाहित्य पुरस्कार व युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

नासाकडुन सर्वात छोट्या उपग्रहाचे प्रक्षेपण :

 • तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या एका संघाने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात छोट्या उपग्रहाचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे वजन केवळ 64 ग्रॅम आहे.
 • तामिळनाडूच्या पल्लापट्टी येथील रिफाथ शारुक या विद्यार्थ्याने नासासाठी जगातील सर्वात छोटा आणि हलका उपग्रह तयार केला होता. त्याचे प्रक्षेपण करून रिफाथ व त्याच्या सहकाऱ्यांनी जागतिक अंतराळ क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला.
 • ‘कलामसॅट’ असे या उपग्रहाचे नाव आहे. भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून ते ठेवण्यात आले होते.
 • 21 जून रोजी नासाचे रॉकेट या उपग्रहासह अंतराळात झेपावल्यानंतर इतिहास घडला. भारतीय विद्यार्थ्यांचा अंतराळ प्रयोग नासाने स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ होती.

धूत ट्रान्समिशन स्कॉटलंडची कंपनी खरेदी करणार :

 • जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ‘धूत ट्रान्समिशन’ या कंपनीने स्कॉटलंडमधील ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड’ ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तसेच युरोपमध्ये व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
 • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे धूत ट्रान्समिशनला पश्चिम युरोपातील बाजारपेठेत अधिक जोरकसपणे प्रवेश करणे सुकर होईल. मुंबईस्थित गुंतवणूक बँक सिंगी अ‍ॅडव्हायजर्स हे या व्यवहाराचे सल्लागार आहेत.

दिनविशेष :

 • 23 जून 1927 रोजी भारतीय नभोवाणी प्रारंभ झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जून 2017)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World