Current Affairs of 23 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 जुलै 2016)

चालू घडामोडी (23 जुलै 2016)

देशातील सर्वोत्तम बंदर जेएनपीटी असणार :

 • जेएनपीटीअंतर्गत येणारे बंदर आणि येत्या चार वर्षांत नव्याने तयार होत असलेल्या चौथ्या बंदराला आवश्यक असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 • तसेच भविष्यात देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून जेएनपीटी नावारुपाला येईल.
 • जागतिक स्तरावर व्यापारवाढीसाठी जेएनपीटी बंदरात पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.
 • तसेच यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणाचा समावेश आहे.
 • जेएनपीटी बंदरातून सुलभपणे कंटेनर मालाची वाहतूक करण्यासाठी, चौपदरी रस्ते सहा ते आठ पदरी केले जाणार आहेत.
 • जेएनपीटी, राष्ट्रीय महामार्ग, सिडको यांच्यासमवेत जेएनपीटी पोर्ट रोड कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जुलै 2016)

परदेशात व्दिशतक करणारा एकमेव भारतीय कर्णधार विराट कोहली :

 • विराट कोहलीचे पहिले द्विशतक आणि आर. अश्‍विनच्या शतकामुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 566 धावांचा लक्ष्य दिला आहे.  
 • भारताने 8 बाद 566 धावांवर डाव घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडीजची अवस्था 1 बाद 31 अशी झाली आहे.
 • फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीच्या संधीचे विराटने सोने केले.
 • भारताने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत विराटने आपले पहिले द्विशतक पूर्ण केले.
 • परदेशात द्विशतक करणारा विराट हा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे.

उत्तर कोरियाकडून तीन क्षेपणास्त्रांची चाचणी :

 • उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विरोध झुगारुन पूर्व किनाऱ्यावर तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.
 • तसेच या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 500 ते 600 किलोमीटरपर्यंत आहे.
 • उत्तर कोरियाने नुकतेच पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे.
 • उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे.
 • उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवू शकत नाही, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते डॉ मोहोळकर कालवश :

 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व जनता बँकेचे माजी संचालक डॉ. हरिभाऊ विठ्ठल मोहोळकर (वय 97) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
 • संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेडगेवार यांच्याकडून त्यांनी संघाचे काम करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली.
 • सन 1937 सालापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूरात काम करण्यास सुरुवात केली. ते दंतवैद्य होते.
 • चंद्रभागा वाळवंटामध्ये शाखा सुरु करून तरुणांना संघात काम करण्याची संधी त्यांनी दिली.
 • तसेच आणिबाणीच्या काळात त्यांनी 19 वर्षे कारावास भोगला.
 • गोरगरीबांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी त्यांनी जनता बँकेच्या माध्यमातून काम केले.

भारतातील काही ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा प्राप्त :

 • इस्तंबूल येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत भारतातील शिफारस केलेल्या काही ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.
 • त्यानुसार युनेस्कोने भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केला असून त्यात चंडीगडसिक्कीम नॅशनल पार्क, नालंदा विद्यापीठाचे अवशेष यांचा समावेश आहे.
 • नालंदा महाविहार (नालंदा विद्यापीठ) या बिहारमधील ठिकाणाचा समावेश करण्यात आल्याने बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे.
 • याशिवाय पॅरिस येथील स्थापत्य विशारद ले कोर्बिझीयर यांनी मांडणी केलेल्या चंडीगडला वारसा ठिकाणात स्थान मिळाले आहे.
 • 1950 मध्ये त्यांनी या शहराची रचना केली होती.
 • सिक्कीम नॅशनल पार्कचाही वारसा ठिकाणात समावेश केला आहे.
 • माउंट कांचनजुंगा हे पर्वतशिखर त्यातच येते. काही पौराणिक कथाही त्याच्याशी निगडित आहेत.
 • तसेच या बैठकीत एकूण 7 देशातील 17 ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.

दिनविशेष :

 • इजिप्त क्रांती दिन.
 • 1840 : ऍक्ट ऑफ युनियनच्या अंतर्गत कॅनडा प्रांताची रचना.
 • 1881 : चिली व आर्जेन्टिना मध्ये सीमा तह.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जुलै 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.