Current Affairs of 21 July 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 जुलै 2016)
पहिला भारतीय ‘मिस्टर वर्ल्ड’ रोहित खंडेलवाल :
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मिस्टर वर्ल्ड’ हा किताब हैदराबादच्या रोहित खंडेलवालच्या याच्या रुपाने यावर्षी पहिल्यांदाच भारतीयाने पटकाविला आहे.
- साऊथपोर्ट येथील साऊथपोर्ट थिएटरमध्ये (दि.19) मोठ्या उत्साहात ‘मिस्टर वर्ल्ड 2016’चा कार्यक्रम पार पडला.
- ‘मिस्टर वर्ल्ड 2016’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भव्य सोहळ्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
- तसेच या स्पर्धेत जगभरातील एकूण 47 स्पर्धक सहभागी झाले होते.
- रोहित खंडेलवाल याने या किताबासह 50 हजार डॉलरचे पोरितोषिक मिळविले.
Must Read (नक्की वाचा):
तुर्कस्तानमध्ये 3 महिन्यांसाठी आणीबाणी लागू :
- लष्करी बंडामागे असलेल्या दहशतवादी गटांचा शोध घेण्यासाठी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी तीन महिन्यांची आणीबाणी घोषित केली आहे.
- अंकारा येथील राष्ट्रपती निवासातून देशाला संबोधित करताना एर्दोगन म्हणाले की, लष्करी बंडात सहभागी झालेल्या दहशतवादी संघटनांना शोधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- मौलवी फतेहउल्लाह गुलेन यांच्या समर्थकांचाही बंडात समावेश होता. आतापर्यंत 50 हजार बंडखोरांना अटक करण्यात आलेली आहे.
- राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉकी खेळाडू मोहंमद शाहीद कालवश :
- 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्ण मिळवून देणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य, ‘ड्रिबलिंगचे जादूगार’ म्हणून ख्यातिप्राप्त असलेले महान हॉकी खेळाडू मोहंमद शाहीद यांचे (दि.20) गुडगाव येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 56 वर्षांचे होते.
- शाहीद यांच्या निधनासोबत भारतीय हॉकीचा एक सुवर्ण अध्याय संपला.
- जगातील आक्रमक फळीतील खेळाडूंपैकी एक दिग्गज तसेच ‘ड्रिबलिंगचा बादशाह’ अशी ख्याती असलेले शाहीद यांनी भारतीय संघाला मॉस्कोमध्ये अखेरचे ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले.
- 1982 व 1986 च्या एशियाडमध्ये पदकविजेत्या भारतीय संघाचेदेखील ते सदस्य होते.
- उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 14 एप्रिल 1960 रोजी जन्मलेले शाहीद यांना 1980 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड’ म्हणून गौरविण्यात आले होते.
- 1986 च्या ऑल स्टार आशियाई संघातही त्यांना स्थान मिळाले.
- 1980-81 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार तसेच 1986 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.
भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची बाजी :
- भौतिकशास्त्र विषयाची कसोटी लावणारी 47 वी भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा नुकतीच पार पडली.
- तसेच या स्पर्धेत तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके प्राप्त करीत पाच भारतीय विद्यार्थ्यांनी नाव उंचावले आहे.
- यात मुंबईच्या प्रिय शहाचा समावेश असून, त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
- भौतिकशास्त्रावर दरवर्षी भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा घेण्यात येते. यंदा स्पर्धेचे 47 वे वर्ष होते.
- तसेच ही स्पर्धा 11 ते 17 जुलै या कालावधीत स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे पार पडली.
- स्पर्धेत 84 देशांतील तब्बल 398 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात भारतातील पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दिनविशेष :
- बॉलिव्हिया शहीद दिन.
- गुआम मुक्ती दिन.
- सिंगापुर वांशिक सलोखा दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा