Current Affairs of 18 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 जुलै 2016)

चालू घडामोडी (18 जुलै 2016)

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ :

 • आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ तसा हॉकी; पण त्या खेळाचा विसर सध्या भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे.
 • क्रिकेटने सर्वांवर जादू केली आहे. पण क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकमध्ये नाही, याचीसुद्धा सर्वांना कल्पना आहे.
 • ऑलिम्पिक म्हटले, की जगातील क्रीडापटूंना एक कुंभमेळा वाटतो.
 • प्रत्येक देशातील विविध खेळांचे खेळाडू पदक जिंकून आपल्या देशाचा ध्वज तेथे फडकाविण्यासाठी जिवाची बाजी लावतात.
 • प्रत्येक देश आपला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सांघिक प्रकारासाठी सर्वश्रेष्ठ संघ निवडत असतो.
 • अशा या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने निर्विवाद वर्चस्व राखले होते.
 • 1928 ते 1952 या काळात भारतीय संघाने हॉकीवर अधिराज्य गाजविले. अर्थातच याचे सर्व श्रेय जाते ते मेजर ध्यानचंद, लेसली क्लाड्युअस, बलबीर सिंग सिनियर, अजितपाल सिंग, उधम सिंग, के. डी. सिंग बाबू, मोहम्मद शाहिद, शफर इक्बाल यांना.
 • 1928 ते 1956 या काळात भारतीय हॉकी संघाने सलग 6 सुवर्णपदके जिंकली होती. त्यांनी सलग 24 सामने आपल्या नावावर केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 जुलै 2016)

विजेंदरसिंगने आशियाई किताब जिंकला :

 • भारताच्या विजेंदरसिंगने व्यावसायिक बॉक्‍सिंग लढतीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना सुपर मिडलवेट गटातील ‘आशियाई किताब’ (बेल्ट) पटकावला. त्याने प्रतिस्पर्धी केरी होप पराभव करून हा किताब जिंकला.
 • विजेंदरच्या तुलनेत अनुभवी असणाऱ्या केरीने घरच्या मैदानावर विजेंदरला पराभूत करण्याचे वक्तव्य केले होते.
 • प्रत्यक्षात विजेंदरने आपल्या संयमी खेळाला अचूकतेची जोड देत केरीचेच ‘होप’ धुळीला मिळविले.
 • दहा फेऱ्यांच्या लढतीत विजेंदरने तीनही जज्जेसकडून 98-92, 98-92, 100-90 असा विजयी कौल मिळविला.
 • विजेंदरने पदलालित्य सुरेख राखत होपला चेहऱ्यावर समोरून दिलेले पंचेस त्याची अचूकता दाखवणारे होते.

भारतीय जवान दत्तू भोकनळने पटकावले सुवर्णपदक :

 • रिओ ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेला तळेगावरोहीचा जवान दत्तू भोकनळ याने अमेरिकेतही यशाचा डंका कायम राखताना आंतरराष्ट्रीय रोर्इंग (नौकानयन) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
 • चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील मूळ रहिवासी असलेल्या व लष्करात जवान म्हणून कार्यरत असलेल्या दत्तू भोकनळ याने बीजिंगमध्ये असलेल्या आशियाई रोर्इंग (नौकानयन) अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला होता.
 • (दि.16) रोजी पार पडलेल्या आणि 20 देशाच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय युएसए रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने कामगिरीत सातत्य कायम राखतांना बाजी मारली.
 • स्पर्धेतील अन्य सहा स्पर्धकांचे आव्हान मोडून काढतांना त्याने प्रथम क्रमांक मिळवण्यासह सुवर्णपदकावर नाव कोरले.

तुर्कस्तान मध्ये भारतीय खेळाडूंची जिगरबाज कामगिरी :

 • ट्रॅपझोन (तुर्कस्तान) येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत भारतीय शालेय क्रीडापटूंनी आपापल्या क्रीडा प्रकारांत 10 सुवर्ण, 18 रौप्य व 25 कांस्य, असे एकूण 53 पदके जिंकली आहेत.
 • तसेच पदक तालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • तुर्कस्तानमध्ये झालेल्या लष्करी उठावाने निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचे कोणतेही दडपण न घेता भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
 • मुलींच्या गटात सिद्धी हिरे, संगीता शिंदे, रोजलिन लुईससेमश्री या चौघींनी 200-400-600-800 मीटर मिडले रिलेमध्ये (दि.17) रौप्यपदक जिंकले.

आता टॅबपासून मिळणार आरोग्यविषयक माहिती :

 • विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या उद्देशाने टॅबची संकल्पना समोर आली.
 • सध्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, प्रश्न-उत्तरे, मार्गदर्शन, डिक्शनरी यांचा समावेश आहे.
 • लवकरच या टॅबमध्ये सुधारणा करून त्यात पावसाळ्यातील आजारांविषयी जनजागृती करणारे आणि आरोग्यविषयक काळजी व सूचनांचे सदर, शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान, हुतात्मा आणि क्रांतिकारकांची महती सांगणारे ‘वंदे मातरम्’ आदी सदरांचा अंतर्भाव करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
 • दिंडोशी येथे स्थानिक शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्यामार्फत सलग दुसऱ्या वर्षी खासगी शाळांतील 800 विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले.
 • दिंडोशीच्या विभाग क्रमांक 3 मधील टॅब वितरण आणि अन्य विकासकामांनिमित्त सुनील प्रभू यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दिनविशेष :

 • 1830 : उरुग्वे संविधान दिन.
 • 1918 : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
 • 1968 : इंटेल कंपनीची स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जुलै 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.