Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 25 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 जुलै 2016)

चालू घडामोडी (25 जुलै 2016)

पहिला ग्रीन ट्रेन कॉरिडॉर वाहतुकीसाठी खुला :

 • देशातला पहिला बहुप्रतीक्षित ग्रीन कॉरिडॉर रामेश्वरम ते मनामदुराईदरम्यानच्या रेल्वे मार्गावर खुला करण्यात आला आहे. या ग्रीन कॉरिडॉरचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे.
 • ग्रीन कॉरिडॉरमुळे भारताच्या पूर्वेकडील वाहतूक आणखी जलद होणार असून, प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
 • तसेच या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आता बायो-टॉयलेट बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ट्रॅकवर होणारं मलविसर्जन आता बंद होणार आहे.
 • रेल्वेमध्ये 35,104 बायो-टॉयलेट लावणार असून, त्यातील जवळपास 30 हजारांहून अधिक बायो-टॉयलेटस यंदाच्या आर्थिक वर्षात बसवणार असल्याची घोषणा सुरेश प्रभूंनी केली.
 • गुगलच्या सहकार्यानं चेन्नई स्टेशनवर मोफत वाय-फाय सुविधाही पुरवण्यात आली आहे. ही वाय-फाय सेवा पुरवणं हा नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमाचाच एक भाग असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.  
 • सुरेश प्रभूंनी तामिळनाडू सरकारला रेल्वेला अत्याधुनिक बनवण्यासाठी सामंजस्य करार करण्याचं आवाहन केलं आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जुलै 2016)

नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांचा राजीनामा :

 • अल्पमतात आल्याने अडचणीत सापडलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांनी (दि.24) अविश्‍वास ठरावाला सामोरे न जाताच राजीनामा दिला.
 • तसेच त्यांच्या या राजीनाम्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
 • नेते प्रचंड यांच्या सीपीएन-माओवादी पक्षाने आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर केला होता.
 • तसेच त्यांनी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी कॉंग्रेसने ओली यांच्याविरोधात संसदेमध्ये अविश्‍वास ठराव मांडला होता.
 • मागील दोन दिवसांपासून या ठरावावर चर्चा सुरू होती. मात्र, मधेशी पीपल्स राइट फोरम आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी या दोन सहकारी पक्षांनी या अविश्‍वास ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओली यांनी या ठरावाला सामोरे न जाताच नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
 • के.पी. ओली यांनी गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती.
 • राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर नेपाळमध्ये गेल्या दहा वर्षांत सत्तेवर आलेले हे आठवे सरकार होते.

आता रेल्वे प्रवासातही एफएम रेडिओ सुविधा :

 • रेल्वे प्रवासाचा आनंद आता आपली आवडती गाणी व संगीत ऐकण्यासह प्रवाशांना लुटता येणार आहे.
 • लोकप्रिय एफएम रेडिओ स्टेशन्स प्रवासी आता डब्यात लावू शकतील.
 • प्रवासात करमणूक व्हावी, या उद्देशाने रेल्वे मंत्रालय रेल रेडिओ सेवा सुरू करणार आहे.
 • राजधानी, शताब्दी, दुरांतोसह ही सेवा एक हजार रेल्वे आणि एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वेंमध्ये उपलब्ध केली जाईल.
 • प्रवाशांना केवळ डब्यांमध्येच लोकप्रिय गाणी व संगीत ऐकायला मिळेल असे नाही, तर दर तासाला रेल्वेशी संबंधित ताजी माहितीही दिली जाईल.
 • कोणत्याही संकटप्रसंगी किंवा आणीबाणीच्या वेळी रेल रेडिओ सावधगिरीचा इशाराही देईल.
 • संगीत आणि गाण्यांशिवाय रेल रेडिओवरून विनोद, फलज्योतिष्य आणि इतर गमतीजमती, भारतीय रेल्वेचा इतिहास आणि महत्त्वाच्या उपक्रमांची माहितीही प्रवाशांना मिळेल.

भारताचा अ‍ॅथलिट नीरज चोप्राची विश्वविक्रम नोंद :

 • भारताचा ज्युनिअर स्टार अ‍ॅथलिट नीरज चोप्राने मुलांच्या भालाफेक प्रकारात 86.48 मीटर भाला फेकून आयएएएफ जागतिक 20 वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनिअर गटात विश्वविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.
 • नीरजने लॅटव्हियाच्या जिगिस्मंड सिरमायसचा 84.69 मीटरचा विक्रम मोडीत काढला.
 • जागतिक विक्रमासह त्याने वरिष्ठ गटात राष्ट्रीय विक्रमाचीसुद्धा नोंद केली.
 • चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत असलेल्या नीरज ज्युनिअर व सीनिअर गटात विश्वविक्रम नोंदविणारा पहिला भारतीय अ‍ॅथलिट ठरला आहे.
 • नीरजने त्याच्या पहिल्या संधीत 79.66 मीटर भाला फेकला. त्यानंतर हरियानाच्या या खेळाडूने आपल्या दुसऱ्या संधीत 86.48 मीटर भाला उंच हवेत फेकून विश्वविक्रमाची नोंद केली.
 • नीरजने या फेकीत सीनिअर गटात राजिंदर सिंह यांचा 82.23 मीटरचा राष्ट्रीय विक्रमसुद्धा मोडीत काढला.

‘शी वॉक, शी लीडस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा :

 • एका अहवालानुसार केवळ 25 टक्के महिलाच नोकरी करतात, असे निदर्शनास आले.
 • मात्र माझ्या मते देशातील सर्वच महिला विविध क्षेत्रात काम करत असून त्या सर्वच क्षेत्रात अव्वल आहेत, असे प्रतिपादन नीता अंबानी यांनी ‘शी वॉक, शी लीडस्’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी केले.
 • उद्योजक आणि लेखिका गुंजन जैन यांच्या ‘शी वॉक, शी लीडस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा (दि.21) ताजमहाल पॅलेस येथे पार पडला.
 • तसेच या सोहळ्यात नीता अंबानी यांनी आपले हे मत व्यक्त केले. पुस्तकाविषयी त्या म्हणाल्या की, देशात विविध क्षेत्रात महिला स्थान टिकवून आहेत. हे पुस्तक त्याचीच साक्ष आहे.
 • महिला आणि पुरुष असा भेद करणाऱ्यांसाठी ती एक चपराक आहे. येत्या काही वर्षांमध्ये महिला अधिक सक्षम होतील.

दिनविशेष :

 • गॅलिशिया(स्पेन) गॅलिशिया दिन.
 • पोर्तोरिको संविधान दिन.
 • 1868 : वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
 • 1908 : किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
 • 1909 : लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जुलै 2016)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World