Current Affairs of 23 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 23 july 2015

चालू घडामोडी 23 जुलै 2015

जीएसटी अहवाल सभागृहाला सादर :

 • देशाच्या अप्रत्यक्ष करप्रणालीत व्यापक बदल प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित वस्तू व सेवाकर विधेयकाबाबत (जीएसटी) राज्यसभेच्या निवड समितीने आपला अहवाल सभागृहाला सादर GSTकेला.
 • या समितीने या घटनादुरुस्ती “जीएसटी” विधेयकातील बहुतांश भाग मान्य करतानाच तीन दुरुस्त्या सुचविल्या आहेत.
 • भाजपचे भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभा निवड समितीने “जीएसटी” विधेयकावरील हा अहवाल सादर केला.
 • तसेच या समितीत अनिल देसाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रफुल्ल पटेल, दिलीप तिर्की, के. एन. बालगोपाल, डी. राजा, नरेश गुजराल, के. सी. त्यागी आदी सदस्य होते.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जुलै 2015)

परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी ब्रेकथ्रू लिसन हा प्रकल्प सुरू :

 • रशियाचे इंटरनेट उद्योजक युरी मिलनर यांनी परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी ब्रेकथ्रू लिसन हा प्रकल्प सुरू केला आहे.
 • तर त्याला प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पाठिंबा दिला आहे.
 • तसेच आता रशियन अब्जाधीश मिलनर यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या पाठिंब्याने परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्याचा हा मोठा प्रकल्प राबवला असून त्यासाठी ते 10 कोटी डॉलर्स खर्च करणार आहेत.
 • जगातील सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणी परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीकडून येणाऱ्या संभाव्य रेडिओ संदेशांचा वेध घेतील तसेच खगोलशास्त्रज्ञ लाखो तारका समूहांकडून पृथ्वीपर्यंत आलेले संदेश ऐकतील.
 • किमान शंभर दीर्घिका आपल्या जवळ असून त्यांच्याकडे संदेश पाठवण्यात आलेले नाहीत.
 • डॅन वेर्थीमर हे या प्रकल्पाचे सल्लागार असून माहितीचा अर्थ लावण्यासाठी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सहकार्यही लाभणार आहे. या प्रकल्पाला वर्षांसाठी 20 लाख डॉलर्स खर्च येणार आहे.
 • यात काही अब्ज रेडिओ कंप्रतेच्या लहरींचा अभ्यास केला जाणार आहे.

कुराणाची सर्वात जुनी प्रत बर्मिंगहॅम विद्यापीठात असल्याचा दावा :

 • मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र ग्रंथाची, म्हणजे कुराणाची सर्वात जुनी प्रत बर्मिंगहॅम विद्यापीठात असल्याचा दावा करण्यात आला आहे. kuran
 • कार्बन डेटिंग पद्धतीद्वारा या प्रतीचे आयुष्य मोजल्यानंतर ती 1370 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर आली आहे.
 • ही प्रत लिहिणारी व्यक्ती प्रेषित मोहंमद पैगंबरांना भेटली असण्याची शक्यताही यानंतर व्यक्त होत आहे.
 • तसेच कुराणाची ही प्रत ग्रंथालयामध्ये मध्यपूर्वेतील प्राचीन कागदपत्रे आणि ग्रंथांसमवेद तशीच ठेवली गेली होती.
 • कुराणाचे काही अंश चर्मपत्रावर, पामच्या पानांवर, तसेच दगडांवरही लिहिले गेले आणि नंतर त्याचे पुस्तक रूपात सन 650 च्या आसपास एकत्रीकरण झाल्याची शक्यता थॉमस यांनी व्यक्त केली आहे.
 • सन 610 ते 632 या काळामध्ये पे्रषित पैगंबरांना साक्षात्कार प्राप्त झाला व त्यातून कुराणाची निर्मिती झाली असे मानले जाते.

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे होणार कमी :

 • शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाने आदेश जारी केला असून, पहिल्या वर्गातील मुलांच्या दप्तराचे वजन 2 किलो तर आठव्या वर्गातील bagमुलांच्या दप्तराचे वजन 4.2 किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये, असे आदेश देण्यात आले आहे.
 • दप्तराचे वजन या मर्यादेत राहील हे पाहणे ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे.
 • राज्य सरकारने दप्तराचे वजन कमी करण्याकरिता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती.
 • त्यांनी केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 20 ते 30 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.

सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर :

 • ताज्या आकडेवारीनुसार देशात सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांक असल्याचे जाहीर झाले आहे.cyber
 • तसेच मागील तीन वर्षांत सायबर क्राईमच्या सर्वाधिक तक्रारी व गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असून अटकेच्या कारवाईत मात्र उत्तरप्रदेश अव्वल आहे.

भूसंपादन विधेयक अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ :

 • वादग्रस्त भूसंपादन विधेयकाशी संबंधित विविध पैलूंची समीक्षा करण्यासाठी गठित संसदीय संयुक्त समितीस आपला अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा एकदा 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
 • बुधवारी लोकसभेत समितीचे अध्यक्ष एस.एस. अहलुवालिया यांनी मुदवाढीबाबतचा प्रस्ताव ठेवला.
 • चालू अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या समितीला आपला अहवाल सादर करायचा होता.

दिनविशेष :

 • 1856 – भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, प्राच्यविधी पंडित, भगवद्गितेचे भाष्यकार, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म.
 • 1906 – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतीलक्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म.
 
 
 
 
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.