Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 22 July 2015 For MPSC Exams

Current Affaires 22 july 2015

मॉडेल मिलिंद सोमणने ट्रायथॅलॉन स्पर्धा केली यशस्वीरित्या पार :

 • बॉलिवूड अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण याने तंदुरुस्तीची कस लावणारी ट्रायथॅलॉन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केली.

  milind soman

 • ट्रायथलॉन ही जगातील सर्वांत अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाते.
 • झ्युरीचमध्ये झालेल्या या स्पर्धेत 50 वर्षीय मिलिंद सोमण याच्यासह सहा भारतीय नागरिक व देशविदेशातील दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते.
 • ट्रायथलॉनमध्ये 3.8 किमी पोहणे, 180.2 किमी सायकल चालविणे आणि 42.2 किमी धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे तसेच स्पर्धकाने हे सर्व सलग न थांबता करायचे असतात.
 • ही तिन्ही आव्हाने पार करणाऱ्याला “आयर्नमॅन” हा किताब दिला जातो.
 • स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 16 तासांमध्ये पूर्ण करणे गरजेचे असते.
 • मिलिंदने 15 तास 19 मिनिटांमध्ये ती पार केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जुलै 2015)

ब्रिक्‍स बॅंकेच्या (एनडीबी) कामकाजाची शांघायमध्ये सुरुवात :

 • जगात नव्याने उदयास येत असलेल्या अर्थव्यवस्थांना पायाभूत निधी पुरविण्यासाठी ब्रिक्‍स (ब्राझील, रशिया, चीन, भारत व दक्षिण आफ्रिका)brics bankदेशांनी एकत्रितरित्या स्थापन केलेल्या बॅंकेच्या (एनडीबी) कामकाजाची मंगळवार शांघाय येथील मुख्यालयामधून औपचारिक सुरुवात झाली.
 • या उद्‌घाटनाच्या समारंभास चीनचे अर्थमंत्री लोऊ जिवेई, शांघाय शहराचे महापौर यांग शिआँग आणि एनडीबीचे अध्यक्ष के व्ही कामत हे उपस्थित होते.
 • कामत हे एनडीबीचे प्रथम अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.
 • रशियातील उफा येथे नुकत्याच झालेल्या 7 व्या ब्रिक्‍स परिषदेत एनडीबीची घोषणा करण्यात आली होती.
 • सध्या या बॅंकेकडे 50 अब्ज डॉलर्सचे भांडवल असून येत्या दोन वर्षांत हे भांडवल 100 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे तसेच या भांडवलामध्ये प्रत्येक सभासद देशाचा समान वाटा असणार आहे.
 • भारतासहित अन्य 56 देश या बॅंकेचे सभासद आहेत.

वस्तुमानरहित कण शोधण्यात वैज्ञानिकांना यश :

 • एक वस्तुमानरहित कण वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे.
 • त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी प्रगती होणार असून पुंज भौतिकीवर आधारित नवीन संगणक तयार करता येणार आहेत.
 • प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हा वेयल फर्मिऑन नावाचा कण शोधून काढला आहे.
 • त्याची संकल्पना 85 वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती.
 • एलएचसीच्या जीनिव्हा येथील प्रयोगात वैज्ञानिकांनी पेंटाक्वार्कचा शोध लावला होता, त्यानंतर भौतिकशास्त्रातील आता हा दुसरा एक महत्त्वाचा शोध आहे.
 • 1929 मध्ये हेरमान वेयल यांनी या फर्मिऑनची संकल्पना मांडली होती.
 • हेरमान हे गणितज्ञ होते व त्यांनी अणुच्या उपकणांच्या सैद्धांतिक रचना मांडल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक्समध्ये वीजवहनात फार मोठी क्रांती अपेक्षित आहे.
 • फर्मिऑनची वैशिष्टय़े
 • वस्तुमानरहित
 • गतिशीलता अधिक
 • टँटॅलम आर्सेनाइड या कृत्रिम स्फटिकात सापडला
 • इलेक्ट्रॉनमध्ये रूपांतर शक्य
 • वीज’वहन व उष्णता ऱ्हास कमी होणार

अधिकृत संकेतस्थळावर ई-फायलिंग लिंक सुरू :

 • विदेशात ठेवण्यात आलेला बेकायदा पैसा, संपत्तीचा तपशील देण्यासाठी आयकर विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) ई-फायलिंग लिंक सुरू केली आहे.
 • आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ई- फायलिंग पोर्टल ‘एचटीटीपीएस : इन्कमटॅक्सइंडियाफायलिंग डॉट जीओव्ही डॉट इन डॉट’ वर ही लिंक उपलब्ध आहे.
 • विदेशातील बेकायदा संपत्ती, पैसा जाहीर करण्यासाठी फॉर्म 6 चा वापर केला जाऊ शकतो. कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेने ऑनलाईन पाठविलेल्या माहितीची सत्यता पडताळून बघण्यासाठी ‘डिजिटल स्वाक्षरी’ची गरज आहे.

आयसीसी टी-20 वर्ल्डकप क्रिकेटचे सामने भारतात होणार :

 • पुढच्या वर्षी 2016 मध्ये होणा-या आयसीसी टी- 20 वर्ल्डकप क्रिकेटचे सामने भारतात होणार असून या अंतिम सामने कोलकात्यातील ईडनChampions league T-20 गार्डनवर ठेवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने आज सांगितले.  
 • आयसीसी वर्ल्डकप टी-20 क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन 11 मार्च ते 3 एप्रिल 2016 या दरम्यान करण्यात आले असून हे सामने आठ शहरामध्ये ठेवण्यात आले आहेत.
 • यामध्ये मुंबई, बंगळुरु, चेन्नई, धरमशाळा, मोहाली, नवी दिल्ली आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. तर, कोलकातामध्ये अंतिम सामने खेऴविण्यात येणार असल्याचे यावेळी बीसीसीआयने सांगितले.

दिनविशेष :

 • 1900 – भारताचा नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूंने ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे 200 मीटरचे रजत पदक मिळविले.

  lokamaya tilak

 • 1908लोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा.
 • 1947 – भारतीय संविधान समितीने तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून संमत केला.
 • 2012प्रणव मुखर्जी यांनी स्वतंत्र भारताचे 13वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जुलै 2015)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World