Current Affairs of 21 July 2015 For MPSC Exams
हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल व्हॅन ऍस यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी :
- पाच महिन्यांच्या कालावधीतच भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल व्हॅन ऍस यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
- तसेच त्यांच्या हकालपट्टीमागील कुठलेही कारण हॉकी इंडियाने दिलेले नाही.
- वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीबाबत अहवाल देण्यात व्हॅन ऍस यांनी नकार दिला होता.
- संघाच्या कामगिरीबाबत जो प्रशिक्षक अहवाल देऊ शकत नाही, तो संघाबरोबर राहू शकत नाही, असेच कारण त्यांच्या हकालपट्टीमागे दिले जात आहे.
Must Read (नक्की वाचा):
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी जाहिरात केली मोफत :
- ‘दूरदर्शन’च्या किसान वाहिनी (डीडी किसान)च्या प्रचारासाठी सरकारद्वारे अभिनेता अमिताभ बच्चन यांना 6.31 कोटी रुपये दिल्याची बातमी सांगण्यात आली होती.
- मात्र ही जाहिरात मोफत केल्याचा खुलासा अमिताभ यांनी केला आहे.
- अमिताभ यांनी म्हटले आहे, की मी डीडी किसान मोहिमेच्या जाहिरातीसाठी “लोव्ह लिंटास” या एजन्सीसोबत काम केले आहे; पण मी त्यांच्यासोबत कोणताही करार केलेला नाही.
इम्रान रझा अन्सारी यांची जेकेसीए अध्यक्षपदी निवड :
- इम्रान रझा अन्सारी यांची जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेच्या (जेकेसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे.
- माजी मुख्यमंत्री व संघटनेचे माजी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची जागा अन्सारी यांनी घेतली आहे.
- अन्सारी हे भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी यांच्या जम्म-काश्मीरमधील युती सरकारमध्ये क्रीडामंत्री आहेत.
- अन्सारी यांची अध्यक्षपदी तर मेहबूब इक्बाल यांची नवे प्रमुख (चेअरमन) म्हणून निवड करण्यात आली आहे.
दहा रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूला हंपीचा जगप्रसिद्ध रथ घेणार :
- भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नोटांवर असलेल्या प्रतिमा बदलण्याचा निर्णय घेतला असून दहा रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूला असलेल्या वाघ-सिहांच्या प्रतिमांची जागा आता हंपीचा जगप्रसिद्ध रथ घेणार आहे.
- त्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने भारतीय पुरातत्त्व खात्याकडून हंपीतील रथाचे चित्र मागविले आहे.
- जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेली देशातील आठ स्मारके चलनी नोटांवर मुद्रित केली जाणार आहेत.
- देशात चलनात असलेल्या 10 ते 1000 रुपयांच्या नोटांवरील प्रतिमा बदलणार आहेत.
- रिझर्व्ह बॅंकेने ठरविल्याप्रमाणे 20 रुपयांच्या नोटेवर राष्ट्रध्वजासह लाल किल्ला, 50 रुपयांच्या नोटेवर कोणार्कचे सूर्यनारायण मंदिर, 100 च्या नोटेवर ताजमहल, 500च्या नोटेवर गोव्यातील पुरातन चर्च आणि 1000 रुपयांच्या नोटेवर अजंठाची गुहा मुद्रित केली जाणार आहे.
- जागतिक वारसास्थळांची माहिती सर्वांना मिळावी. नव्या पिढीला आपली संस्कृती समजून जागतिक वारसास्थळांचे महत्त्वही समजावे. देशात येणाऱ्या पर्यटकांना वारसास्थळे पाहण्यासाठी कुतूहल निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नोटांवर या प्रतिमांचे मुद्रण केले जाणार आहे.
आता सरोगसीद्वारे मातृत्वासाठीही मिळणार रजा :
- सरकारी सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यास सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती झाली असेल, तर अशी कर्मचारीसुद्धा रजेसाठी पात्र आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणात दिला आहे.
- अशा वेळी रजा नाकारणे हे आई आणि बाळ या दोघांसाठीही हानिकारक आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.
- केवळ स्वतः गर्भवती राहून अपत्यास जन्म देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास रजा देणे म्हणजे विज्ञानाने केलेल्या प्रगतीकडे काणाडोळा करणे ठरेल, असे न्या. राजीव शकधर यांच्या पीठाने स्पष्ट केले.
- एखादी महिला आणि/किंवा तिचा पुरुष जोडीदार यांचे जैविक पालकत्व असले किंवा नसले, तरीही जर एखाद्या महिलेने अपत्यासाठी अन्य महिलेची सेवा घेतली असेल, तर या परिस्थितीचाही ‘मॅटर्निटी’ या शब्दामध्ये अंतर्भाव होतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.
नीरज कुमार मुख्य सुरक्षा सल्लागार :
- दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची बीसीसीआयने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एमएसयू) मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
- मोठ्या स्पर्धेसाठी घोषित केलेल्या आयोजन समितीत डॉ. एम. श्रीधर क्रिकेट संचालनालयाचे महासंचालक असतील. अमृत माथूर यांना मुख्य समन्वयक व आर. पी. शाह यांना मॅनेजर नियुक्त करण्यात आले आहे.
- राव यांना क्रिकेट संचालनालय व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले.